पाठयपुस्तकातील लेखिका अंजली अत्रे यांनी डोंगराळ भागातील गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद अहमदनगर- पाठयपुस्तकातील लेखिका अंजली अत्रे यांनी पाथर्डी तालुक्यातील डोंगराळ भागातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी २२ मार्च २०२१ रोजी लेखिका विद्यार्थ्यांच्या भेटीला या उपक्रमात संवाद साधून चर्चा करून मार्गदर्शन केले. लेखिका अंजली अत्रे यांनी गुगल मिट अँपद्वारे विद्यार्थ्यांशी ,शिक्षकांशी ,पालकांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधून विविध विषयांवर चर्चा केली .कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण , ऑफलाईन शिक्षण आणि विविध उपक्रम शिक्षकांनी उत्कृष्ट पणे चालू ठेवले आहे .इयता चौथीच्या मराठी विषयाच्या पाठयपुस्तकातील मिठाचा शोध या धड्याच्या लेखिका तसेच अभिनेत्री ,कथाकार अंजली अत्रे यांनी विद्यार्थ्यांशी गुगल मिट अँपवर व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सुमारे दीड तासआनंदाने संवाद साधून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची सवित्तर उ...
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ