शिक्षणातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण नवोपक्रम
पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी शाळेत शिक्षणातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा नवोपक्रम राबविला जातो.पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही आपल्या देशासह जगातील एक मोठी जागतिक समस्या आहे.शाळेतील विद्यार्थी हे उद्याच्या काळात देशाचे भावी नागरिक व आधारस्तंभ आहेत .आपल्या सर्वांना आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची योग्य जडणघडण होऊन त्यांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे समाज व देशहिताचे मूल्य शिक्षणातून रुजणे अत्यंत आवश्यक आहे.म्हणून शिक्षणातून आपल्या देशाची सामाजिक समस्या सोडविण्यासाठी हा नवोपक्रम शाळेत यशस्वीपणे राबविला व तो निरंतर चालू आहे.ही सामाजिक मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यासाठी शाळेत वृक्षारोपन ,वृक्षसंवर्धन ,परसबाग ,प्लास्टिक विरोधी जनजागृती ,परिसर भेट ,शिवार भेट ,क्षेत्रभेट ,वनभोजन ,प्रदूषणमुक्त सणसमारंभ , पर्यावरण संदेशपाट्या ,शाळेत रोपांची नर्सरी तयार करणे ,लोकसहभागातून निसर्गरम्य शाळा तयार करणे ,
विद्यार्थ्यांचे पर्यावरणपूरक वाढदिवस ,झाडांच्या रोपांचे विद्यार्थ्यांना ,पालकांना ,ग्रामस्थांना वाटप ,झाडांशी मैत्री ,सेंद्रिय शेती , ,स्वच्छ सुंदर शाळा , कचरा व्यवस्थापन ,माजी विद्यार्थी मेळावा ,स्वच्छता अभियान,,,,अशा अनेक कृतिशील नवोपक्रमातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत विद्यार्थी ,पालक , ग्रामस्थ यांच्यामध्ये याबाबत वेळोवेळी जनजागृती केली जाते.शाळेमार्फत दरवर्षी दीड ते दोन हजार झाडांची रोपे विद्यार्थी ,ग्रामस्थ ,पालक यांना वाटून त्यांनी लावलेल्या या झाडांबाबत आढावा घेतला जातो.ही सर्व झाडे त्यांनी घराजवळ ,शेताच्या कडेला लावून त्यांचे संवर्धन करतात.गावातील सर्व प्रकारचे प्लास्टिक वेळोवेळी गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते.परसबागेतून विविध प्रकारच्या शेंद्रिय भाजीपाला पिकवला जातो.हा सेंद्रिय भाजीपाला शालेय पोषण आहारात वापरला जातो.त्यामुळे विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व समजले .कचरा कशामुळे होतो याचे मूळ कारण शोधले त्यामुळे विद्यार्थी कचरा होऊ देत नाहीत.ओला व सुका कचरा वेगळा ठेवतात. दोन वर्षांपूर्वी बदलीने हजर झालो तेव्हा शाळेत झाडे नव्हती म्हणून विद्यार्थ्यांना वृक्षारोपनाचे महत्व सांगून त्यांच्यात जनजागृती करून शाळेत प्रचंड प्रमाणात वृक्षारोपण करून त्या सर्व झाडांचे संवर्धन करण्यात आले आहे.विद्यार्थी वेळोवेळी झाडांची देखभाल घेऊन त्यांनी झाडांशी मैत्री केली आहे.विद्यार्थी हवा ,पाणी ,अन्न या आपल्या मूलभूत गरजांचे प्रदूषण करत नाही .या नवोपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे राष्ट्रहिताचे मूल्य रुजविले आहे.
तुकाराम तुळशिराम अडसूळ
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर .
मो-७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा