पाठ टाचण (धडा स्क्रिप्ट. जोडाक्षरे स्लाईड 1 सादरकर्ते सुनिल अडसूळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माथनी तालुका जिल्हा अहिल्यानगर घटक - बालभारती जोडाक्षरे ------------------------------- स्लाईड - 2 • वर्ग: इयत्ता पहिली • विषय: मराठी • घटक: जोडाक्षरे (ओळख आणि वाचन) • एकूण वेळ: 15 मिनिटे अध्ययन निष्पत्ती सर्व अक्षरे व स्वरचिन्हे आणि नेहमी वापरत असलेली बहुवर्णीय शब्द यांचे वाचन करतो. ------------------------------------ स्लाईड 3 वेळ -1 मिनिट प्रस्तावना व पूर्वज्ञान: "नमस्ते बालमित्रांनो! आज आपण एक खूप छान आणि मजेशीर खेळ खेळणार आहोत. त्या खेळाचे म्हणजे पाठाचे नाव आहे जोडाक्षरे तर मग आज आपण जोडाक्षरे पाहू या. --------------------- स्लाईड 4 वेळ -5 मिनिटे जोडाक्षरे व्याख्या पाहू या आता मला सांगा, जेव्हा तुमचे दोन मित्र एकत्र येतात, तेव्हा काय होते? तुमची दोस्ती होते ना? मग दोन अक्षरे एकत्र आल्यावर जोडाक्षरे तयार होतात. तसेच आज आपण अक्षरांची दोस्ती करून पाहणार आहोत!" बालमित्रांनो स आणि त एकत्र आल्यावर काय होते पहा स+त - स्त ही जोडाक्षरे कोठे कोठ...