मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोकसहभागातून विद्यार्थ्यांना प्रिंटर

जिल्हा परिषद अहिल्यानगरचे उपक्रमशील शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब यांनी सुरू केलेल्या मिशन आपुलकी (लोकसहभाग)उपक्रमातून आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारादरी तालुका जिल्हा अहिल्यानगर  शाळेस चेन्नई आणि पुणे येथे सामाजिक कार्य करत असलेले श्री रामनाथन साहेब यांनी  मिशन आरंभ या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका झेरॉक्स काढण्यासाठी नामांकित कंपनीचा प्रिंटर दिला.त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏

आदर्श व्यक्तिमत्व

अतिशय प्रेरणादायी आदर्श व्यक्तिमत्व --------------------------------------------- आपल्या प्राथमिक विभागाचे उपक्रमशील शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब  यांनी आपल्या जिल्ह्यात आपल्या नाविन्यपूर्ण कार्याची एक वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षण क्षेत्रात साहेबांनी केलेले कार्य राज्याला दिशा दर्शक ठरले आहे. एवढे मोठे अधिकारी असले तरी त्यांच्यातील कृतिशील शिक्षक कायम आहे हे साहेबांचे विशेष आहे. आपल्या जिल्ह्याचे भाग्य आहे की असे आदर्श व्यक्तिमत्व जिल्ह्याला लाभले.साहेब सतत कार्यात मग्न असतात. कोणाचीही भेट झाली की साहेब शाळेविषयी आणि शाळेतील लेकरांविषयी माहिती जाणून घेतात आणि चांगल्या कार्यासाठी प्रेरित करतात. साहेबांच्या कार्यामुळे त्यांना राज्य शासनाने बदलीतून दोन वेळा मुदतवाढ दिली हे  पहिल्यांदा पाहिले आहे. साहेबांना विशेष धन्यवाद 👍👍👍👍👍

लोकसहभागातून शाळेसाठी कंपाऊंड

मिशन आपुलकी मधून शाळेला कंपाउंड ---------------------------- अहिल्यानगर जिल्ह्याचे उपक्रमशील शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब यांनी सुरू केलेल्या मिशन आपुलकी मधून आमच्या शाळेला तारेच्या जाळीचे कंपाउंड तयार करण्यात आले. शाळेला फक्त निम्मे   कंपाउंड होते. त्यामुळे भटक्या प्राण्यापासून  विद्यार्थ्यांचे संरक्षण होण्यासाठी ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून ही जाळीचे कंपाऊंड तयार करण्यात आले. तसेच शाळा रोडच्या कडेला असल्यामुळे वाहनांची ये जा चालू असते .या सर्वांपासून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हे जाळीचे  कंपाऊंड तयार केले. सर्व ग्रामस्थांना खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏

शिक्षण मंत्रालय आयोजित निवडक शाळा उपक्रम

🏫 शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य 🌟 ‘नावीन्यपूर्ण व उपक्रमशील शाळांची मालिका’ 🌟  Social Media links   🏫 ✨ नाविन्याची धरली कास... गुणवत्तेचा एकच ध्यास! ✨ ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🙏 सस्नेह नमस्कार, आपल्या मराठी शाळांमध्ये चालणारे नावीन्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण व विद्यार्थीकेंद्रित उपक्रम राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचावेत, मराठी शाळांची पटसंख्या वाढावी आणि शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, या उदात्त उद्देशाने— 💡 मा. ना. श्री. दादाजी भुसे (मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य) आणि 💡 मा. ना. डॉ. पंकज भोयर (राज्यमंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून  आणि शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांच्या सहाय्याने सुरू करण्यात आलेली 🌟 ‘नावीन्यपूर्ण व उपक्रमशील शाळांची मालिका’ 🌟 आणि  या मालिकेअंतर्गत राज्यभरातील विविध उपक्रमशील शाळांचे विशेष व्हिडिओ व Reels  शिक्षण विभागाच्या विविध अधिकृत समाजमाध्यमांवर सुद्धा शेअर करण्यात आले आहेत. प्रभावी अध्यापन, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि आदर्श शाळांची ही प्रेरणादा...

शालेय शिक्षण मंत्रालय उपक्रम

🏫 शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य 🌟 ‘नावीन्यपूर्ण व उपक्रमशील शाळांची मालिका’ 🌟  Social Media links   🏫 ✨ नाविन्याची धरली कास... गुणवत्तेचा एकच ध्यास! ✨ ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🙏 सस्नेह नमस्कार, आपल्या मराठी शाळांमध्ये चालणारे नावीन्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण व विद्यार्थीकेंद्रित उपक्रम राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचावेत, मराठी शाळांची पटसंख्या वाढावी आणि शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, या उदात्त उद्देशाने— 💡 मा. ना. श्री. दादाजी भुसे (मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य) आणि 💡 मा. ना. डॉ. पंकज भोयर (राज्यमंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून  आणि शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांच्या सहाय्याने सुरू करण्यात आलेली 🌟 ‘नावीन्यपूर्ण व उपक्रमशील शाळांची मालिका’ 🌟 आणि  या मालिकेअंतर्गत राज्यभरातील विविध उपक्रमशील शाळांचे विशेष व्हिडिओ व Reels  शिक्षण विभागाच्या विविध अधिकृत समाजमाध्यमांवर सुद्धा शेअर करण्यात आले आहेत. प्रभावी अध्यापन, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि आदर्श शाळांची ही प्रेरणादा...

इंधन भाजीपाला अनुदान

*राष्ट्रीयकॄत बॅंकेतील शापोआ अनुदान जमा रक्कम* 🟣 आर्थिक वर्ष -2025-26🟣  *२४/६/२०२५* इंधन भाजीपाला अनुदान माहे-मार्च -२०२५ माहे-एप्रिल-२०२५ *१५/१०/२०२५* इंधन भाजीपाला अनुदान माहे - जून, जुलै २०२५ *१६/१०/२०२५* इंधन भाजीपाला अनुदान माहे - अॉगस्ट, सप्टेंबर २०२५ *२५/१२/२०२५* इंधन भाजीपाला अनुदान माहे - अॉक्टोबर २०२५ *०१/०१/२०२६* इंधन भाजीपाला अनुदान माहे - नोव्हेंबर २०२५ *१८/०२/२०२६* इंधन भाजीपाला अनुदान माहे - डिसेंबर २०२५ *७/०३/२०२६* इंधन भाजीपाला अनुदान माहे -  जानेवारी २०२६ *३१/०३/२०२६* इंधन भाजीपाला अनुदान माहे -  फेब्रुवारी २०२६ *२७/०६/२०२६* इंधन भाजीपाला अनुदान माहे -  मार्च २०२६ आज दिनांक 24/10/26 इंधन भाजीपाला  एप्रिल 2026 ते  जुलै 2026 अहिल्यानगर  तालुक्याचे अनुदान वर्ग करण्यात आलेले आहे

प्रश्नपेढी

प्रति,  मा. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व) मा. शिक्षणाधिकारी, (प्राथमिक / माध्यमिक), (सर्व) *विषय- प्रश्नपेढीचा वापर करणेबाबत..* शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी तयार केलेल्या विषयनिहाय व इयत्तानिहाय प्रश्नपेढी परिषदेच्या https://drive.google.com/drive/folders/1wWRCQMXz5B6kti_ANB6TJqYNJw0ZiWqU?usp=drive_link या  वेबसाईटवरील वरील लिंकद्वारे इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपेढी आपणास उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तरी सदरील प्रश्नपेढीचा वापर शिक्षक व विद्यार्थ्यांना वर्गामध्ये सराव करण्यासाठी वापरण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करावे. *मा. संचालक महोदय यांच्या सूचनेनुसार..*

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या पोर्टलवर सुनील अडसूळ यांचे व्हिडिओ अपलोड

https://www.facebook.com/share/v/1FRZ1REZxb/

PME Vidya Chanal Vedio

पाठ टाचण (धडा स्क्रिप्ट. जोडाक्षरे स्लाईड 1 सादरकर्ते सुनिल अडसूळ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माथनी तालुका जिल्हा अहिल्यानगर  घटक - बालभारती जोडाक्षरे  ------------------------------- स्लाईड - 2 • वर्ग: इयत्ता पहिली • विषय: मराठी • घटक: जोडाक्षरे (ओळख आणि वाचन) • एकूण वेळ: 15 मिनिटे अध्ययन निष्पत्ती सर्व अक्षरे व स्वरचिन्हे आणि नेहमी वापरत असलेली बहुवर्णीय शब्द यांचे वाचन करतो. ------------------------------------ स्लाईड 3 वेळ -1 मिनिट प्रस्तावना व पूर्वज्ञान:   "नमस्ते बालमित्रांनो! आज आपण एक खूप छान आणि मजेशीर खेळ खेळणार आहोत.  त्या खेळाचे म्हणजे पाठाचे नाव आहे जोडाक्षरे  तर मग आज आपण जोडाक्षरे पाहू या. --------------------- स्लाईड 4 वेळ -5 मिनिटे जोडाक्षरे व्याख्या पाहू या आता मला सांगा, जेव्हा तुमचे दोन मित्र एकत्र येतात, तेव्हा काय होते? तुमची दोस्ती होते ना? मग  दोन अक्षरे एकत्र आल्यावर जोडाक्षरे तयार होतात. तसेच आज आपण अक्षरांची दोस्ती करून पाहणार आहोत!" बालमित्रांनो स आणि त एकत्र आल्यावर काय होते पहा स+त - स्त  ही जोडाक्षरे कोठे कोठ...

वाचनाचे उपयोग

*वाचन कां आवश्यक आहे ?* 📖 * 📚 *एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद वाचनात आहे. तेव्हा रोज एक तरी पान वाचत जा.* ........................... *श्रीमंत माणसेच वाचन करतात असे नसुन वाचन करणारेच श्रीमंत होतात जसे शरीरासाठी दिवसातून दोन वेळा जेवण आवश्‍यक असते तसे उत्तम मेंदूसाठी दररोज दोन तास वाचन करणे आवश्यक असते. दररोज वाचनामुळे माणूस भानावर येतो.* ........................... *जगाचा आतापर्यंत जो विकास झाला आहे तो वाचनामुळे आणि जगाचा आता र्‍हास होणार आहे तो टी.व्ही मोबाईलमुळे.* ........................... *पुस्तक वाचणारा माणूस व्यसन करत नाही आणि टी.व्ही मोबाईल हेच मुळी व्यसन आहे.* ........................... *वाचनामुळे ज्ञानात भर पडते, टि.व्ही मोबाईल मुळे माणूस ॲडीक्टेड होतो.* ........................... *टी.व्ही साठी मोबाईल साठी नेटवर्क लागते, वाचनासाठी फक्त माणूस जागेवर लागतो.* .......................... *वाचन करणारी माणसं मनाने विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात.* ...............