पाठ टाचण (धडा स्क्रिप्ट. जोडाक्षरे
स्लाईड 1
सादरकर्ते सुनिल अडसूळ
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माथनी तालुका जिल्हा अहिल्यानगर
घटक - बालभारती जोडाक्षरे
-------------------------------
स्लाईड - 2
• वर्ग: इयत्ता पहिली
• विषय: मराठी
• घटक: जोडाक्षरे (ओळख आणि वाचन)
• एकूण वेळ: 15 मिनिटे
अध्ययन निष्पत्ती सर्व अक्षरे व स्वरचिन्हे आणि नेहमी वापरत असलेली बहुवर्णीय शब्द यांचे वाचन करतो.
------------------------------------
स्लाईड 3
वेळ -1 मिनिट
प्रस्तावना व पूर्वज्ञान:
"नमस्ते बालमित्रांनो! आज आपण एक खूप छान आणि मजेशीर खेळ खेळणार आहोत.
त्या खेळाचे म्हणजे पाठाचे नाव आहे जोडाक्षरे
तर मग आज आपण जोडाक्षरे पाहू या.
---------------------
स्लाईड 4
वेळ -5 मिनिटे
जोडाक्षरे व्याख्या पाहू या
आता मला सांगा, जेव्हा तुमचे दोन मित्र एकत्र येतात, तेव्हा काय होते? तुमची दोस्ती होते ना? मग
दोन अक्षरे एकत्र आल्यावर जोडाक्षरे तयार होतात.
तसेच आज आपण अक्षरांची दोस्ती करून पाहणार आहोत!"
बालमित्रांनो
स आणि त एकत्र आल्यावर काय होते पहा
स+त - स्त
ही जोडाक्षरे कोठे कोठे येतात ते पाहू या
मस्त
जास्त
पुस्तक
यानंतर
म आणि ह एकत्र आल्यावर काय होते ते पाहू या
म+ ह - म्ह
ही जोडाक्षरे कोठे कोठे येतात ते पाहू या
म्हण
म्हणून
म्हणजे
आता
त आणि या
एकत्र आल्यावर पहा
त +या _त्या
ही जोडाक्षरे कोठे कोठे ते पाहू या
त्याला ,
आत्या
कोणत्या
____________________
स्लाईड 5
वेळ -4
आता आपण इतर जोडाक्षरे वाचन करू या
च +या _ च्या
ही जोडाक्षरे कोठे येतात ते पाहू या
चमच्या
चमच्याने आपण काय करतो
खाऊ खातो ना.
ड +या _ ड्या
हे जोडाक्षर कोठे येते
होड्या
कागदाच्या आपण काय बनवतो होड्या
ट+या_ ट्या
हे जोडाक्षर कोठे येते
वाट्या
वाटीत आपण खाऊ खातो ना.
______________
स्लाईड 6
वेळ 4 मिनिटे
आता आपण
जोडाक्षरे असलेले शब्द वाचन करूया
घोडा कोणी कोणी पाहिला
तर मग हा शब्द वाचा पाहू
घोड्याचा
आपण आनंद झाल्यावर काय वाजवतो
टाळ्या
फुलाच्या अगोदर झाडाना काय येतात
कळ्या
आपल्या वडिलांना आपण काय म्हणतो
पप्पा
आपल्या घराची राखण कोण करतो
कुत्रा
आपल्या आईला आपण काय म्हणतो
मम्मी
म्याँव म्याँव कोण करते
मांजर
मग हा शब्द वाचा पाहू
मांजराच्या
शाब्बास बालमित्रांनो
-------------------------------
स्लाईड 7
वेळ 1 मिनिट
गृहपाठ
तर मग
आज आपण जोडाक्षरे म्हणजे काय ते शिकलो .
जोडाक्षरांची ओळख करून घेतली.
जोडाक्षरे वाचन केली.
आता तुम्ही पुस्तकातील कोणतेही पाच जोडाक्षरे वाचा आणि लिहा
पुन्हा भेटू या अशाच नवीन पाठात .तोपर्यंत धन्यवाद
---------------
स्लाईड 8
धन्यवाद.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा