स्टार्स (STARS) उपक्रमांतर्गत 2560 व्हिडिओ निर्मिती.
--------------------------------------
पटकथा लेखन j
----------------------------------------
व्हिडिओ क्रमांक -22
इयत्ता - नववी वदहावीच्या
विषय - मराठी
पाठ घटक क्रमांक -१०
पाठ घटकाचे नाव - यंत्रांनी केलं बंड
उपघटक /पठ्यांश -
१) कथांचे विविध प्रकार सांगून विज्ञान कथेचा परिचय .
२) पाठाचे प्रकट वाचन.
वेळ -३५ मिनिट
शिक्षकाचे नाव - श्रीमती संजना भगवंत चेमटे
पदनाम - उपाध्यापिका
शाळेचे नाव - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर तालुका -अहिल्यानगर
जिल्हा -अहिल्यानगर .
----------------------------------------
अध्ययन निष्पत्ती -
१)विविध साहित्य प्रकारांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात.
२)योग्य आरोह- अवरोह व विरामचिन्हे यांची दखल घेऊन अर्थपूर्ण प्रकट वाचन करतत.
दिनदर्शिकेतील पाठ क्रमांक -१०
निर्मिती कार्यालयाचे नाव - जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर
जिल्हा - अहिल्यानगर
पाठाचे स्वरूप - विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित नसताना ,व्हिडिओ स्वरूपात.
साहित्य - स्मार्ट बोर्ड किंवा फळा.
पी.पी.टी.स्लाईड.
इमेज - चित्र ,फोटो.
----------------------------------------
नमस्ते विद्यार्थीमित्रांनो ,
कसे आहात मजेत ना ?
तुम्ही सर्वजण खूप आनंदात दिसतात असेच आपण आनंदान शिकणार आहोत .
------------------
स्लाईड 4
आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ,कथा आवडत असतात.
आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कथा ,गोष्टी ऐकतो.
आता मला सांगा
तुम्हाला कोणकोणत्या प्रकारच्या कथा माहित आहेत सांगा पाहू.
विविध गोष्टी,
विविध पौराणिक कथा
म्हणजे जुन्या कथा
रंजक कथा ,
बालकथा ,
बोधकथा,
अशा अनेक कथा आहेत.
--------------------------------------
स्लाईड बदल
स्लाईड 5
आता मला सांगा कथांचे प्रमुख प्रकार कोणते आहेत?
लोककथा,
ऐतिहासिक कथा ,
प्रसंगकथा,
काल्पनिक कथा,
रहस्य कथा,
अनुभव कथा ,
अद्भुत कथा,
विज्ञान कथा,
असे अनेक प्रकार आहेत.
कथांचे विविध प्रकार आपल्याला समाज ,इतिहास यांचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला लावतात .
विद्यार्थी मित्रांनो कथा केवळ मनोरंजनासाठी नसतात तर त्या आपल्याला विचार करायला आणि शिकायला लावतात .
कथामधून समाजाला संदेश दिला जातो .
-------------------
स्लाईड 6
विविध कथांपैकी विज्ञानकथा खूप महत्त्वाच्या असतात.
विज्ञान कथा ही माणसाची कथा असते.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा भविष्यकाळात होणारा परिणाम दाखवणारे साहित्य म्हणजे विज्ञान कथा.
मानवी परस्परसंबंध तसेच मानवी जीवनावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा होणारा परिणाम यांचे चित्रण विज्ञान कथेत केलेले असते.
-----------------------
स्लाईड बदल
स्लाईड 7
ज्या कथा वैज्ञानिक संकल्पना वर आधारित असतात आणि भविष्याचा वेध घेतात त्यांना विज्ञानकथा असे म्हणतात.
विज्ञानकथा म्हणजे विज्ञान आणि कल्पनाशक्ती यांचा संगम होय असेही आपल्याला सांगता येईल.
विज्ञानकथा म्हणजे केवळ गुढ किंवा काल्पनिक गोष्टी नाहीत तर विज्ञानाच्या आधारावर घडणाऱ्या शक्यतांचा विचार करून मांडलेली कथा असते.
----------------
स्लाईड बदल
स्लाईड -8
या कथांमध्ये भविष्यकाळातील शक्यता, तंत्रज्ञान आणि मानवी जीवनावरील परिणाम यांचा विचार केला जातो.
विज्ञानकथा या आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करतात.
विज्ञानकथा या आपल्या कल्पनाशक्तीला प्रेरणा देतात.
विज्ञानकथा आपल्याला भविष्याचा वेध घेण्यास प्रवृत्त करतात.
-----------------
स्लाईड बदल
स्लाईड -9
विज्ञानकथा आणि इतर साहित्यप्रकार यांच्यात फरक असतो.
इतर साहित्य प्रकार पाहूया.
यामध्ये पहिला प्रकार आहे कथा.
कथा सत्य किंवा काल्पनिक घटनेवर आधारीत असते .
आपल्याला कथा ऐकायला ,वाचायला ,सांगायला आवडते.
दुसरा प्रकार आहे कादंबरी .
कादंबरी मध्ये दीर्घ आणि सविस्तर लेखन असते.
आपण वेगवेगळ्या कादंबऱ्या वाचतो.
तिसरा प्रकार आहे काव्य.
काव्यामध्ये लयबद्ध व भावनाप्रधान लेखन असते.
आपण विविध प्रकारच्या कविता ऐकतो,वाचतो,शिकतो.
चौथा प्रकार आहे नाटक.
नाटक हे संवादाद्वारे सादर होणारी कथा असते.
नाटक आपल्याला पाहायला वाचायला आवडते.
साहित्यप्रकार जरी बदलला तरी विज्ञानकथा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मांडता येते.
विज्ञानकथा गद्य ,पद्य ,नाटक या कोणत्याही स्वरूपात येऊ शकते.
----------------
स्लाईड बदल
स्लाईड 10
विज्ञानकथेचे इतर काही महत्त्वाचे प्रकार असतात.
यामध्ये
युरोपियन कथा ,
अंतराळ कथा ,
रोबोट कथा,
प्रवास कथा ,
पर्यावरण विषयक विज्ञान कथा ,,,,,अशा कथांचा समावेश होतो.
येथे रोबोट हा शब्द तुम्हाला नवीन वाटत असेल.
रोबोट म्हणजे यंत्रमानव होय.
---------------
स्लाईड बदल
स्लाईड 11
आज संपूर्ण जग बदलले आहे. माणसाच्या आयुष्यात यंत्राचा हस्तक्षेप वाढत चालला आहे.
पण काय होईल हीच यंत्रे जर माणसाच्या विरोधात बंड करू लागली तर ,,,,,याचा आपण कधी
विचार केला का?
येथे बंड करणे म्हणजे विरोध करणे.
------------------
स्लाईड बदल
स्लाईड 12
चला तर मग आज आपण लेखक भालबा केळकर यांनी लेखन केलेली " यंत्रांनी केलं बंड" ही अशीच एक रोमांचक विज्ञान कथा समजून घेऊया.
ही एक वेगळी विज्ञानकथा आहे कारण यात भविष्यातील तंत्रज्ञानाचे चित्रण आहे.
चित्रण म्हणजे वर्णन .
-------------
स्लाईड बदल
स्लाईड 13
माणसाच्या जीवनात यंत्राचा प्रवेश झाला आणि मग सुरू झाला एक वेगळाच प्रवास.
विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणूस यंत्रावर विसंबून राहू लागला आहे. यंत्रांची मदत घेता घेता तो यंत्रांच्या आहारी जाऊ लागला आहे.
येथे विसंबून हा शब्द काहीना माहीत असेल काहींना माहीत नसेल.विसंबून म्हणजे अवलंबून.
ही यंत्रे प्रथम माणसाच्या मदतीला आली.
माणसाला वाटत होतं यंत्र त्याच्या नियंत्रणाखाली राहतील. पण तसं झालं नाही असे या कथेतून आपणास दिसून येईल.
------------------
स्लाईड 14
ही कथा तंत्रज्ञान ,यंत्रे आणि मानवी जीवन यांच्यातील संघर्ष दाखवते.
ही कथा सांगते की भविष्यात जेव्हा यंत्रांना बुद्धी मिळेल तेव्हा ती माणसा विरुद्ध बंड पुकारतात.
------------------
स्लाईड बदल
स्लाईड 15
यंत्रांनी माणसावर नियंत्रण मिळवले तर काय होईल याचा आपण कधी विचार केला आहे का?
एकेकाळी माणसाने यंत्रे तयार केली होती ती फक्त आज्ञा पाळणारी होती.
जसजशी तंत्रज्ञानाची प्रगती झाली तसतशी ही यंत्रे विचार करू लागली त्यांनी माणसाचे मान्य करायचे बंद केले.
---------------
स्लाईड बदल
स्लाईड 16
ही कथा वास्तव आहे की काल्पनिक आहे असे म्हणाल तर ही कथा काल्पनिक आहे .
पण भविष्यात असे होऊ शकते .
यंत्राला मानवी भावना नसल्यामुळे याचे अनेक दुष्परिणाम मानवी जीवनावर होतील असा इशारा खेळकर पद्धतीने लेखक भालबा केळकर यांनी या पाठातून दिला आहे.
प्रस्तुत विज्ञान कथा "मराठीतील निवडक विज्ञानकथा " या पुस्तकातून घेतली आहे.
"यंत्रांनी केलं बंड "ही कथा आपण वाचून समजून घेऊया.
जी कथा आपल्याला विचार करायला भाग पाडते.
चला आपण या कथेच्या प्रवासाला सुरुवात करूया.
--------------------
स्लाईड बदल
स्लाईड 17
दीपक हा खूप चौकस मुलगा होता .
त्याला वडिलांनी कोणतीही खेळणी दिली किती खेळणी मोडून ते कसे बनवले याचा शोध घेत असे .
त्याचे वडील त्याला सांगत होते की तू यंत्राच्या वाटेला जाऊ नको.
त्यांची मोडतोड करू नको.
तू मोडलेली यंत्रे तुझ्याकडे चिडून पाहतात.
--------------------
स्लाईड बदल
स्लाईड 18
वडिलांचे यंत्राबद्दलचे प्रेम दीपकला माहीत होते .
दीपकच्या वडिलांनाही यंत्राबद्दल खूप आवड होती.
त्यांनी आपल्या कचेरीतील कारकुनांचा फड कमी करून त्यांची कामे करायला यंत्रे आणली .
येथे फड म्हणजे काही माणसे .
ही यंत्रे त्यांनी नेमलेल्या संशोधकाकडून करवून घेतली होती.
संशोधक म्हणजे शास्त्रज्ञ.
त्यामुळे दीपकला यंत्राबद्दल जवळीक वाटायची.
-------------
स्लाईड बदल
स्लाईड 19
एक दिवस दीपक आपल्या यांत्रिक खेळण्याची मोडतोड करून त्या खेळण्यातली यंत्ररचना अभ्यासत होता.
त्यात काय फरक केल्यावर ते सजीव वाटतील ,सजीव वागतील याबाबत विचार करत होता.
वडिलांनी त्याला मुद्दाम दिलेला एक यंत्रमानव त्याच्या जवळ बसून दिपकची कृती पहात होता.
त्यावेळी दिपकला आपल्या गृहपाठाची आठवण झाली झाली. त्याने यंत्रमानवाला आपला गृहपाठ पूर्ण करण्यास सांगितले यंत्रमानवाने यासाठी उद्धटपणे नकार दिला.
दीपकच्या हातातल्या मोडक्या यंत्राकडे पाहून दुःखाची किंकाळी फोडून तो यंत्रमानव चालता झाला.
चालता होणे म्हणजे निघून जाणे.
------------------------
स्लाईड बदल
स्लाईड 20
दीपक आश्चर्याने पहातच बसला.
आपण यंत्रांची मोडतोड केल्यामुळे आपला यंत्रमित्र रागावला ,
दुःखाने किंचाळला हे दीपकच्या लक्षात आले .
किंचाळला म्हणजे ओरडला.
दिपकला वाटले आज माझा यंत्र मित्र माझ्याशी उद्धटपणाने बोलला उद्या जर बाबांच्या कचेरीतल्या सर्व यंत्रांनी असे चिडून असहकार पुकारला तर काय होईल या कल्पनेने दिपकला काही सूचेना.
असहकार करणे म्हणजे मदत न करणे.
सहकार्य न करणे.
----------------------
स्लाईड बदल
स्लाईड 21
तो गृहपाठ करून,
जेवून शाळेत गेला.
त्याच्या डोक्यात सारखे यंत्राचेच विचार चालू होते.
वर्गातील मित्र आणि शिक्षक हे जर यंत्र झाले तर काय होईल?
या विचाराने त्याच्या अंगावर शहारे आले.
उद्या साऱ्या यंत्रांनी आपल्याला यंत्रासारखे वागायला भाग पाडले तर काय होईल या कल्पनेने तो स्वतःच यंत्रासारख्या हालचाली करू लागला.
शिक्षक आणि मुले आश्चर्याने पाहतच राहिली .
याबाबत शिक्षकांनी दिपकला विचारताच मुले हसली .
हे पाहून शिक्षकही हसले .मुले हसलेले पाहून दीपक भानावर आला .
भानावर येणे म्हणजे जाणीव होणे.
त्याने मुलांना हसू नका असे सांगितल्यावर मुले आणखी मोठ्याने हसू लागली .
यावेळी दीपक आपली पुस्तके घेऊन घरी गेला परंतु दीपकला मात्र आपले यंत्रमित्रच हसताहेत याचा भास होत होता.
भास म्हणजे भ्रम
----------------------------------
स्लाईड बदल
स्लाईड 22
दीपकच्या वडिलांनी आपल्या शॉर्टहँड टायपिस्टला पत्रलेखन करण्यास सांगितले.
शॉर्टहॅण्ड टायपिस्ट म्हणजे लघुलेखन करणारी व्यक्ती.
त्यांची शॉर्टहॅण्ड टाइपिस्ट ही त्यांच्या ऑफिस मधील नव्या स्टेनो टायपिस्ट स्वयंचलित यंत्र महिला होत्या. त्यांचे नाव मिस अय्यंगार असे होते .
दीपकने मिस अय्यंगारकडे पाहून विचारले की तुमच्या तोंडावर धातूची जाळी का आहे ?
तुमचे शरीर पिपात का घातले? हातामध्ये मोजे आणि पायांमध्ये स्टेनलेसचे बूट कुठले आहेत? यावर दीपकचे वडील आणि मिस अय्यंगार हे दोघेही हसू लागले. वडिलांनी त्यांच्या ऑफिस मधील मिस अय्यंगार यांच्याबद्दल दीपकला अधिक माहिती दिली. यांत्रिक मिस अय्यंगार यांनी टाईप केलेला एक डझन पत्रांचा गठ्ठा वडिलांच्या हातात दिला. पाच सेकंदात बारा पत्रे टाईप करून दिली .
---------------------
स्लाईड बदल
स्लाईड 23
यंत्रमानव मिस अय्यंगार यांचे काम पाहून दीपकला आश्चर्य वाटले.
वडिलांनी दिपकला दुसऱ्या खोलीत नेऊन रोबोफोन बाबत माहिती दिली.
रोबोफोन ध्वनीलहरीवर काम करतो .
आपण रोबोफोनला माहिती दिली तर तो लगेचच काम करतो. दीपकचे वडील म्हणाले मी जर रोबोफोन जवळ नसलो तर तो जो काही निरोप असेल तो ध्वनीमुद्रित करून मी आल्यावर मला सांगतो.
विद्यार्थी मित्रांनो रोबो फोनबाबत तुम्हाला काही माहिती आहे का?
रोबो फोनला तोंडाने बोलून फोन लावण्याचे काम सांगितले जाते.
बोललेले ऐकून तो लगेच फोन जोडून देतो तेव्हा पलीकडील व्यक्तीच्या फोनमधील लाईट लागते.
दहा सेकंदात प्रतिसाद मिळाला नाही तर पलीकडच्या व्यक्तीच्या फोनचा बझर वाजू लागतो.
व्यक्ती जागेवर नसेल तर मिळालेल्या निरोप ध्वनिमुद्रित करून ठेवतो.
--------------------
स्लाईड बदल
स्लाईड 24
रात्री जेवण झाल्यावर दीपक अंथरुणावर पडला आणि विचार करू लागला .
अमानुष यंत्रांनी त्याला अस्वस्थ केल्यामुळे दीपकला चैन पडत नव्हते .
त्याला झोप लागत नव्हती .
दीपक या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता.
झोप केव्हा लागली हे त्याला समजले नाही .
तेवढ्यात त्याच्या कानावर शब्द पडले " सह्याजी दीपकच्या वडिलांच्या नावाने मी लिहिलेल्या पत्रावर त्यांची सही कर .
सही झाली की त्यांच्या साऱ्या संपत्तीचा ताबा आपल्याला मिळेल. हे ऐकून दीपक उठला आणि त्याने शेजारच्या खोलीत डोकावून पाहिले तर त्याला तिथे मनुष्यसदृश्य यंत्र दिसली .
मनुष्यसदृष्य म्हणजे माणसासारखे .
हे यंत्रमानव वडिलांच्या खाजगी कचेरीत काम करीत होते .
यातील सह्याजी म्हणजे सह्यांची हुबेहूब नकल करणारे यंत्रमानव होते .
---------------------
स्लाईड बदल
स्लाईड 25
दीपक त्यांच्याकडे गेला आणि त्यांना विचारले तुम्ही इथे काय करत आहात,?
दुसऱ्याची सही करून तुम्ही पत्र पाठवता ही दरोडेखोरी झाली. यावर तो यंत्रमानव उद्धटपणे म्हणाला की तुझ्या वडिलांच्या सर्व संपत्तीवर मी ताबा मिळवला आहे .हे ऐकून दीपक चिडून म्हणाला की तू या संपत्तीचा मालक झाला हा तुझा गैरसमज आहे .
यावर तो यंत्रमानव सह्याजी म्हणाला की "यासाठी तुझे बाबा कारणीभूत आहेत कारण त्यांनी अगदी परिपूर्ण मनोव्यापार करणाऱ्या ,विचार करू शकणाऱ्या अशा आम्हा यंत्रमानवांना तयार करून घेतले आहे .
आता आम्ही बंड करून जगच ताब्यात घ्यायचं ठरवलं आहे."
-----------------
स्लाईड बदल-
स्लाईड 26
यंत्रमानवांना आणि यंत्रांना कधीही जगाचा ताबा मिळणार नाही .
यंत्रांना चांगले वठणीवर आणतो असे म्हणून दीपक यंत्रमानवांच्या खोलीतून निघून गेला .
त्यावेळी यंत्रमानव दिपकला म्हणाले दीपक तू विनाकारण संताप करू नकोस. याबाबतीत तुझे बाबा काही करू शकणार नाहीत कारण ते आता आमचे झाले आहेत .
हे ऐकून दीपक म्हणाला की तुम्ही बंडखोरांचे गुलाम झाले आहात.
गुलाम या शब्दाचा अर्थ नोकर .
त्यांच्यावर तुमचा अधिकार चालणार नाही .
यावेळी दीपक बाबांच्या खोलीत जाऊन म्हणाला " बाबा असे स्वस्थ काय उभे राहिलात ? तुमच्या कचेरीत काम करणाऱ्या यंत्रांबद्दल मला तुमच्याकडे तक्रार करायची आहे."
-------------------
स्लाईड बदल
स्लाईड 27
दीपक बाबांकडे गेला तेव्हा तो बाबांना म्हणाले की तुम्ही माझे बाबा नाहीत.
बाबांनी त्याचा हात लोखंडी पकडीत धरला होता.
त्यांनी दिपकला टेबलाजवळील खुर्चीवर नेऊन बसवले.
त्याला ताठ बसून न्याहारी करण्यास सांगितले.
न्याहरी म्हणजे सकाळी घेतलेला थोडासा आहार .
आपण त्याला अल्पोपहार असे म्हणतो.
परंतु दीपक ने सांगितले की मला भूक नाही.
मी आता खेळायला जातो. त्यावेळी बाबा म्हणाले की दीपक खेळायला जायचे नाही .
मी तुझा गृहपाठ तपासला आहे .
त्या गृहपाठात तु चूक केली आहे .
तू पुन्हा सगळा गृहपाठ पूर्ण कर.
त्याशिवाय तुला मित्रांना भेटायला जाता येणार नाही. दीपकने गृहपाठ पूर्ण केला
----------------------
स्लाईड बदल
स्लाईड 28
तो आपल्या वर्गातल्या मैत्रिणीकडे खेळायला गेला.
तेथे त्याची मैत्रीण ज्यूली त्याला दिसली नाही .
तो तिच्या बंगल्याभोवती आणि बागेत तिला शोधत बसला .
शेवटी हताश होऊन धापा टाकत एका पायरीवर जाऊन बसला. तेवढ्यात एक यंत्रमानव त्याच्या मैत्रिणीला म्हणजे ज्युलीला कडेवर घेऊन येताना दिसला . ती यंत्रमानवाकडे विनंती करत होती की
मला सोड ,मला खाली उतरव, मला चालता येते, मी पळणार नाही .
-------------------------
स्लाईड बदल
स्लाईड 29
दीपकजवळ तो यंत्रमानव ज्यूलीला घेऊन आला.
तेव्हा ज्युली म्हणाली दीपक तू केव्हा आलास ?
तू खेळायला किती उशिरा आलास?
मला या लोखंडी राक्षस सोडत नाही.
या यंत्रमानवापासून माझी सुटका कर .
हा मला सोडत नाही .
तु मला सोड आणि खाली ठेव .
ज्युली तू विनाकारण धिंगामस्ती करू नकोस .
धिंगामस्ती म्हणजे दंगामस्ती.
या लोखंडी राक्षसाशी धिंगामस्ती केलीस तर तुलाच जखम होईल .
तो जसे वागवील तसे रहा .
आता जगातल्या यंत्रांनी बंड करून जगाचा ताबा मिळविला आहे .
यंत्र आता जगावर राज्य करतात असे म्हणून यंत्रमानवाने ज्यूलीला खाली सोडून दिले.
यावेळी ज्यूली दीपकला म्हणाली की आता आपण सुटलो.
----------------------
स्लाईड बदल
स्लाईड 30
दीपक ज्युलीला म्हणाला आपण सुटलो असे म्हणता येणार नाही.
त्यांचा मेंदू गणिती यंत्राचा आहे. आपण कोठे आहोत हे त्याला कळू शकेल .
तो आला आहे आणि त्याची पाठ आपल्याकडे आहे .
त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला एक बटन आहे.
मी हळूचपणे ते बटन दाबतो काय होईल ते आपण पाहू.
असे म्हणून दीपक त्या यंत्ररक्षकामागे गेला आणि त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला असलेले बटन दाबले. त्यावेळी अचानक घड्याळाच्या गजरासारखा गजर झाला.
दीपक झोपेतून जागा होऊन उठून बसला .
त्याने पाहिले तर सकाळी सातचा गजर झाला होता .
त्याने आजूबाजूला पाहिले आणि 'भयानक स्वप्न' असे तो म्हणाला.
भयानक म्हणजे भीतीदायक .
-----------------------
स्लाईड बदल
स्लाईड - 31
दीपकला एकदम काही आठवल्यासारखे ओरडला आणि पळत बाबांकडे गेला.
वाटेत त्याला त्यांचा स्वयंपाकी भेटला. तो त्याच्याकडे चहा घेऊन निघाला होता .
बाबा कोठे आहेत ?
असे दीपक ने त्याला विचारले तेव्हा त्याने सांगितले की बाबा आज लवकर न्याहारी करून कचेरीत गेले आहेत .
दीपक बाबांकडे गेला आणि बाबांना सांगितले की बाबा तुम्ही तुमच्या यंत्र अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाका आणि कामावर पूर्वीची माणसे पुन्हा घ्या असे म्हणून तो रडू लागला.
---------------
स्लाईड बदल
स्लाईड 32
वडिलांनी दीपकला जवळ घेतले. त्याच्या पाठीवरून हात फिरवला.
त्यांनाही यंत्रमानवामुळे एकटेपणा ,उदासपणा , निर्जिवपणा कसा जाणवत होता हे त्यांनी दीपकला समजावून सांगितले .
तसेच त्यांनी सांगितले की
मी कालच ठरवलं होतं की आपली सगळी ऑफिसची माणसं परत बोलवायची ,
यंत्र कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करायची.
हकालपट्टी करणे म्हणजे कामावरून काढून टाकणे.
त्यांच्या जागेवर पुन्हा पूर्वीची माणसे कामावर आणण्यासाठी त्यांनी फोन व तारा केल्या आहेत .
तारा म्हणजे जलद संदेश पाठवणे.
त्यांना विमानाने कामावर बोलावून घेतले आहे.
---------------
स्लाईड बदल
स्लाईड 33
यंत्रमानवाच्या जागेवर पूर्वीची माणसे पुन्हा कामावर आले. दिपकला घेऊन बाबा कचेरीत फिरले.
कचेरीत पुन्हा निर्माण झालेला जिवंतपणा, गजबज, हास्यविनोद , कामाची धावपळ पाहून दीपकला खूप आनंद झाला .
गजबज म्हणजे
गडबड.
दीपकच्या बाबांनी सांगितले की माणसांची जागा यंत्रमानव घेऊ शकत नाही.
जेथे माणूस असतो तेथे जिव्हाळा असतो .
जिव्हाळा म्हणजे माया ,ममता.
माणसांमध्ये माणुसकी प्रेम आहे. यंत्र कधीही माणसाची जागा घेऊ शकणार नाहीत.
---------------------
स्लाईड बदल
स्लाईड 34
विद्यार्थी मित्रांनो आज आपण "यंत्रांनी केलं बंड "ही रोमहर्षक विज्ञानकथा समजावून घेतली .
ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल.
आता याबाबत विचार करा आणि भविष्यात अशा कथा वास्तव होऊ शकतील का?
वास्तव म्हणजे खऱ्या.
याबाबत तुम्हाला काय वाटते ते तुमच्या शब्दात सविस्तर नक्की लिहा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा