गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी घराजवळ तयार केली परसबाग
अहमदनगर--पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी गितेवाडी शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या घराजवळ पालकांच्या मदतीने परसबाग तयार केली आहे .गितेवाडी शाळेत शिक्षणातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा उपक्रम नेहमी राबविला जातो .विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण मूल्य रुजविले आहे.शाळेतून सर्व विद्यार्थ्यांना , पालकांना व विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या देशी झाडांची सुमारे दीड ते दोन हजार रोपे वृक्षारोपणासाठी वाटप केले जातात .त्या सर्व रोपांचे घराजवळ ,शेताच्या कडेला वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन केले जाते.तसेच गितेवाडी प्राथमिक शाळेत सेंद्रिय शेतीची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून माहिती देण्यासाठी व त्यासंबंधी मूल्य रुजविन्यासाठी पर्यावरण संवर्धन नवोपक्रमात परसबाग तयार केलेली आहे.या परसबाग मध्ये विविध प्रकारचा सेंद्रिय भाजीपाला केला जातो .आपल्याला आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे .त्यामुळे विद्यार्थ्यांना परसबागेचे महत्व समजले . त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने परसबाग तयार करून त्यात विविध प्रकारचा सेंद्रिय भाजीपाला केला आहे.या परसबागेची ते वेळोवेळी देखभाल घेतात .त्यामुळे पालकांनाही परसबाग , सेंद्रिय शेती ,पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण महत्व समजले.तसेच विद्यार्थी घरी रोपे तयार करतात . अनेक कार्यक्रमात ते झाडाचे रोप एकमेकांना भेट देतात असे मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ यांनी सांगितले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा