मुख्य सामग्रीवर वगळा

गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांची फटाकेमुक्त प्रदूषणमुक्त दिवाळी

गितेवाडी शाळेतील  विद्यार्थ्यांनी घेतली फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा व त्याप्रमाणे अंमलबजावणी--

अहमदनगर--पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळीची प्रतिज्ञा घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे. या शाळेत शिक्षणातून पर्यावरण संवर्धन प्रदूषण हा नवोपक्रम यशस्वीपणे राबविला गेला आहे.यामध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे रक्षण ,हवा ,पाणी ,अन्न  ध्वनी व इतर बाबींचे प्रदूषण कधीही करू नये .याबाबत शाळेतून शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी  कृतिशील मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली.विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे राष्ट्रहिताचे मूल्य रुजविले.त्यांना प्रदूषणाचे दुष्परिणाम समजावून दिले.तसेच सर्व पालकांना व ग्रामस्थांना वेळोवेळी पर्यावरण संवर्धन व  प्रदूषण निवारण बाबत मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये जनजागृती केली. कोरोना काळातील शिक्षणासाठी त्यांनी दररोज ऑनलाईन गुगल मिटवर अध्यापन करून अभ्यास तपासणीसाठी नेहमी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षणाबरोबर पर्यावरण रक्षण ,प्रदूषण निवारण ,वृक्षारोपन ,वृक्षसंवर्धन बाबत मार्गदर्शन करून विविध झाडांची रोपे वाटली .विद्यार्थ्यांनी व पालकांनी वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन केले आहे .प्रदूषण हे मानवासह सर्व सजीवांच्या जीवनास घातक आहे.आपल्याला आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी प्रदूषण थांबविणे आवश्यक आहे व ती आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे हे सर्वांना  घरोघरी समजावून दिले .विद्यार्थी व पालक शाळेतील या राष्ट्र व समाजहिताच्या उपक्रमाचे   नेहमी अभिनंदन करून अंमलबजावणी करतात.त्यामुळे दिवाळीत कोणताही विद्यार्थी फटाके वाजवत नाही.सर्व विद्यार्थी दरवर्षी प्रतिज्ञा घेऊन 
प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करतात. वर्षभरातील सर्व सण समारंभ प्रदूषणमुक्त साजरे करतात कारण त्यांना शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी तसे धडे देऊन त्यांच्यामध्ये समहिताचे मूल्य रुजविले आहेत .यावर्षी कोरोनामुळे शाळेला अजून सुट्ट्या आहेत तरीही विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी ही प्रतिज्ञा घेऊन फटाकेमुक्त दिवाळी साजरी करीत आहेत. गावालाही या उपक्रमाचे महत्व समजले त्यामुळे शाळेचा हा उपक्रम गावाचा झाला .त्यांनाही नेहमी शाळेचा अभिमान वाटतो .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

व्हिडिओ निर्मिती - संजना

स्टार्स (STARS) उपक्रमांतर्गत 2560  व्हिडिओ निर्मिती. -------------------------------------- पटकथा लेखन j ---------------------------------------- व्हिडिओ क्रमांक -22 इयत्ता  - नववी वदहावीच्या विषय - मराठी  पाठ घटक क्रमांक -१० पाठ घटकाचे नाव -  यंत्रांनी केलं बंड  उपघटक /पठ्यांश   - १) कथांचे विविध प्रकार सांगून विज्ञान कथेचा परिचय . २) पाठाचे प्रकट वाचन. वेळ -३५ मिनिट शिक्षकाचे नाव - श्रीमती संजना भगवंत चेमटे  पदनाम  - उपाध्यापिका  शाळेचे नाव -  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर तालुका -अहिल्यानगर  जिल्हा -अहिल्यानगर . ---------------------------------------- अध्ययन निष्पत्ती -  १)विविध साहित्य प्रकारांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. २)योग्य आरोह- अवरोह व विरामचिन्हे यांची दखल घेऊन अर्थपूर्ण प्रकट वाचन करतत. दिनदर्शिकेतील पाठ क्रमांक -१० निर्मिती कार्यालयाचे नाव - जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर  जिल्हा -  अहिल्यानगर  पाठाचे स्वरूप  -  विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्...