अहमदनगर --पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मित्र आनापान उपक्रम ऑनलाईन पद्धतीने राबविला जातो.विद्यार्थी आपापल्या घरी सकाळी उठल्यावर दहा मिनिटे शांत बसून ही विपश्यना आणापान करतात.महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग व विपश्यना विशोधन विन्यास यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या मित्र (MITRA --Mind in Training For Right Awareness) या उपक्रमांतर्गत अणापान साधनेचे दिनांक २४ व २५ सप्टेंबर २०२० रोजी दोन तासाचे सकाळी ७ ते ९ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने राज्यातील शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.या प्रशिक्षणासाठी गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ यांनी नावनोंदणी करून २४ सप्टेंबर रोजी हे प्रशिक्षण पूर्ण केले.यावेळी या प्रशिक्षणात राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी या उपक्रमाबाबत माहिती दिली. विपश्यना विशोधन विन्यास मधील व्यक्तींनी या मित्र उपक्रम मधील अनपणा बाबत विशेष कृतिशील मार्गदर्शन केले . यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची एकाग्रता व स्मरणशक्ती वाढविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त असल्याचे सांगितले.आजच्या कोरोनाकाळात हे खूप महत्वाचे आहे.माणसांचे तसेच विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी हा मित्र आनापान उपक्रम उपयुक्त असल्याचे सांगितले .त्यानुसार गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ यांनी ऑनलाईन पद्धतीने मित्र आनापान उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांना कृतिशील मार्गदर्शन केले. त्यानुसार विद्यार्थी सकाळी उठल्यावर शांतपणे दहा मिनिटे बसतात.त्यामुळे त्यांच्या मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होते.त्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते.
*मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन* *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा