उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांना शिक्षण संचालकांच्या हस्ते कृतिशील शिक्षकरत्न पुरस्कार
अहमदनगर- शिक्षण व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ए. टी. एम.परिवार महाराष्ट्राच्या वतीने पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील प्रभारी मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ यांना शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांचे हस्ते जिल्हास्तरीय कृतिशील शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .यावेळी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन शिक्षण संचालक यांनी त्यांचा गौरव केला. ३१ जानेवारी २०२१ रोजी अहमदनगर येथे ए. टी. एम. परिवार आयोजित अहमदनगर जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि विविध पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा राज्याचे नूतन शिक्षण संचालक दिनकर टेमकर ,
नूतन शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोरे ,
अहमदनगर जिल्ह्यातील डाएट चे नूतन प्राचार्य डी.डी.सूर्यवंशी ,
नूतन शिक्षणाधिकारी अरुण धामणे ,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे गुणवत्ता कमिटीचे सदस्य व ए. टी. एम. परिवाराचे राज्य संयोजक विक्रम अडसूळ ,रयत शिक्षण संस्थेचे अधिकारी काकासाहेब वाळुंजकर यांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विविध उपक्रम राबवून शाळेत ,विद्यार्थ्यांमध्ये योग्य परिवर्तन केले.त्यामुळे शाळेत शिक्षणाला पूरक असे निसर्गरम्य वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ झाली.तसेच राष्ट्र व समाजहितासाठी विद्यार्थ्यांवर त्यांनी योग्य असे कृतिशील संस्कार केले.विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारची योग्य अशी मूल्य रुजविण्यासाठी परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट परिवर्तन झाले.विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश मिळविले.त्यांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे राष्ट्रहिताचे मूल्य रुजविले. तसेच कोरोनाकाळात उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्य केले. शाळेत अमूलाग्र बदल झाल्यामुळे गावाला शाळेचा अतिशय अभिमान वाटू लागला.शिक्षण व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य केल्यामुळे त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना ए. टी. एम. परिवार म्हणजे कृतिशील शिक्षक सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने कृतिशील शिक्षरत्न पुरस्कार व कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आला. याबद्दल गावातील लोकांनी , जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनी आणि विविध अधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा