कोरोना काळातील ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण
अहमदनगर शहरात साधारण पाच किमी अंतरावर आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर ही नगर तालुक्यातील एक उपक्रमशील शाळा आहे . या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग व आम्ही तीन शिक्षक कार्यरत आहोत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शाळांना १७ मार्च२०२० पासून सुट्ट्या दिल्यापासून दुसऱ्या दिवसापासून आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणात , अभ्यासात सातत्य आम्ही ठेवलेले आहे. चालू शैक्षणिक वर्ष २०२० - २१ मध्ये तर आमच्या शाळेतील सर्व वर्गातील व्हाट्सअप्प वर विविध प्रकारच्या अभ्यासाचे व्हिडीओ वर ऑनलाईन अध्यापन वर्ग आम्ही नियमितपणे देतो . सर्वांचा वेळोवेळी भेटी फोनद्वारे त्यामुळे दररोज विद्यार्थ्यांशी संपर्क असतो .मागील वर्षी २०१९ -२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळेला सुट्ट्या लागल्याबरोबर आम्ही पालकांचे व्हाट्सअप ग्रुप तयार केले.अभ्यासक्रमाच्या नियोजनानुसार नियमितपणे या ग्रुपवर विद्यार्थ्यांना विविध विषयांचा विविध प्रकारचा अभ्यास दिला.विद्यार्थ्यांनी तो अभ्यास पूर्ण केला की पालक आम्हा शिक्षकांना तपासणीसाठी ग्रुपवर पोस्ट करतात.आम्ही तो अभ्यास तपासून काही दुरुस्ती सांगून मुलांना अभ्यासबाबत ग्रुपवर माहिती देतो.चालू वर्षी
१५ जून पासून सुरू झालेले शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये अभ्यासक्रमाचे, अध्यापनाचे उत्कृष्टपणे वेगळे नियोजन केले. मुलांच्याअभ्यासासाठी ,अध्यापनासाठी ऑनलाईन तास घेण्याची संकल्पना सर्व पालकांना सविस्तरपणे समजावून दिली .यासाठी त्यांना गुगल मिट बाबत सवित्तर माहिती दिली.सर्व पालकांनी त्यास खूप उत्कृष्टपणे प्रतिसाद देऊन गुगल मीट हे अँप डाऊनलोड केले.याबाबत प्रत्येक इयत्तेचे ऑनलाईन तास बाबत नियोजन करून त्यानुसार दररोज आम्ही त्यांना नियोजित वेळेनुसार ऑनलाईन अध्यापन ताससाठी व्हाट्सअप ग्रुपवर लिंक पाठवतो . विद्यार्थी त्या लिंकवर जाऊन ऑनलाईन अध्यापन तासाला आनंदाने जॉईन होतात.प्रत्येक वर्गाचा आम्ही गुगल मिटअँपवर ऑनलाईन अध्यापनाचा तास घेतो.या ऑनलाईन तासाला नव्वद टक्के विद्यार्थी हजर असतात.उर्वरित विद्यार्थ्यांच्या पालकांना अँड्रॉइड मोबाईल नाहीत.ज्यांना अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांना लोक सहभागातून काही अँड्रॉइड मिळण्यासाठी प्रयत्न केले त्यातून काही मदत झाली.त्यातून काहींना मोबाईल उपलब्ध झाले.आता फार थोड्या मुलांना अँड्रॉइड फोन नाही त्यांना फोन करून अभ्यासबाबत मार्गदर्शन करतो .तसेच सर्व पालकांना विद्यार्थ्यांच्या अभ्यास बाबत प्रत्येक इयत्तेची शैक्षणिक दिनदर्शिका दिली आहे.पालक ती दिनदर्शिका पाहून आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी ते जागरूक असतात. ऑफलाईन अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना स्वाध्यापुस्तिका झेरॉक्स करून दिल्या आहेत . विद्यार्थी या स्वाध्यायपुस्तिका नियमितपणे सोडवतात.विद्यार्थ्यांचा
अभ्यास ,स्वाध्याय पाहण्यासाठी आम्ही वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती दक्षता घेऊन त्या विद्यार्थ्यांना अभ्यासबाबत मार्गदर्शन करतो व अभ्यास पाहतो.ज्यांना अँड्रॉइड फोन नाही त्यांना नियमितपणे फोन करून सवित्तर अभ्यास सांगितला जातो व वेळोवेळी त्यांच्या घरी जाऊन हा अभ्यास पाहिला जातो. ऑनलाईन शिक्षणासाठी दररोज गुगल मिट वर ऑनलाईन अध्यापन केल्यामुळे विद्यार्थ्यांशी अभ्यासबाबत संवाद साधला जातो.ऑनलाईन अध्यापनात दररोज नवीन घटक शिकविला जातो.विविध विषयांवर ,घटकांवर विद्यार्थ्यांशी चर्चा केली जाते. विद्यार्थी दररोज ऑनलाईन तास सुरू होण्यासाठी आनंदाने वाट पाहत असतात.तसेच दिक्षा अँप डाऊनलोड करण्याबाबत पालकांना मार्गदर्शन केले .पालकांनी ते डाऊनलोड केले. शासनाची अभ्यासमाला आम्ही नियमितपणे ग्रुपवर पाठवतो .विद्यार्थी दिक्षा अँप वरून ही अभ्यासमाला सोडवतात.तसेच टिलिमिली हा दूरदर्शन वरील शैक्षणिक कार्यक्रम आनंदाने पाहतात. विद्यार्थ्यांना कला ,कार्या ,शा. शिक्षण बाबत विविध उपक्रम व प्रकल्प दिले जातात .आनंदाने ते पूर्ण करतात. तसेच आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील चार विद्यार्थी मी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर करून त्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य दिले आहे.विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाचे सातत्य राहण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही अविरतपणे प्रयत्न करत राहणार आहे.
लेखक
तुकाराम अडसूळ
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर
मो-७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा