डॉ.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशन च्या वतीने गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचा गौरव -दिनांक-१ जाने.२०२१
डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशनच्या वतीने गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचा गौरव
अहमदनगर--पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी १५ ऑक्टोबर २०२० रोजी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमात कृतिशील सहभाग घेतल्याबद्दल तामिळनाडू राज्यातील डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम फौंडेशन रामेश्वरम च्या वतीने ऑनलाईन पद्धतीने विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने १७ मार्च २०२० पासून शाळेला सुट्ट्या दिलेल्या आहेत.शाळा बंद असल्या तरी गितेवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने उत्कृष्टपणे शिक्षण चालू आहे.या शिक्षणाबरोबर विद्यार्थी विविध स्पर्धेत व उपक्रमात आनंदाने कृतिशील सहभाग घेतात.या विद्यार्थ्यांना उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ हे नेहमी सवित्तर मार्गदर्शन करतात.१५ ऑक्टोबर २०२० रोजी गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त निमित्त तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथील डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम फौंडेशन च्या वतीने आयोजित पुस्तके वाचन उपक्रमात कृतिशील सहभाग घेऊन विविध पुस्तकांचे वाचन केले.या पुस्तकातील सारांश स्वतःच्या शब्दात सांगितला. तसेच जागतिक हात धुवादिन सर्व विद्यार्थ्यांनी कृतीशील पणे साजरा केला .विद्यार्थ्यांचे उपक्रमातील फोटो या फौंडेशनला पाठविले होते . त्याची दखल घेऊन या फौंडेशन च्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या उपक्रमाबद्दल ऑनलाईन पद्धतीने विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक तुकाराम अडसूळ हे वेळोवेळी विविध पुस्तके वाचनासाठी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन वाटप करतात.त्यामुळे विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन वाढले आहे.त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली आहे. आठ दिवसाला त्यांना वाचनासाठी वेगळे पुस्तक दिले जाते.तसेच शाळेत बालवाचनालय आहे. कोरोनाकाळात विद्यार्थी आपापल्या घरी ऑनलाईन पद्धतीने विविध उपक्रमात कृतिशील सहभाग घेतात.त्यामुळे शाळा बंद असल्या तरी गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण उत्कृष्ट पणे सुरू असून त्यांचा सर्वांगीण विकास होत आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा