गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा व त्याप्रमाणे अंमलबजावणी--
अहमदनगर--पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळीची प्रतिज्ञा घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे. या शाळेत शिक्षणातून पर्यावरण संवर्धन प्रदूषण हा नवोपक्रम यशस्वीपणे राबविला गेला आहे.यामध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे रक्षण ,हवा ,पाणी ,अन्न ध्वनी व इतर बाबींचे प्रदूषण कधीही करू नये .याबाबत शाळेतून शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी कृतिशील मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली.विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे राष्ट्रहिताचे मूल्य रुजविले.त्यांना प्रदूषणाचे दुष्परिणाम समजावून दिले.तसेच सर्व पालकांना व ग्रामस्थांना वेळोवेळी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये जनजागृती केली. कोरोना काळातील शिक्षणासाठी त्यांनी दररोज ऑनलाईन गुगल मिटवर अध्यापन करून अभ्यास तपासणीसाठी नेहमी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षणाबरोबर पर्यावरण रक्षण ,प्रदूषण निवारण ,वृक्षारोपन ,वृक्षसंवर्धन बाबत मार्गदर्शन करून विविध झाडांची रोपे वाटली .विद्यार्थ्यांनी व पालकांनी वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन केले आहे .प्रदूषण हे मानवासह सर्व सजीवांच्या जीवनास घातक आहे.आपल्याला आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी प्रदूषण थांबविणे आवश्यक आहे व ती आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे हे सर्वांना घरोघरी समजावून दिले .विद्यार्थी व पालक शाळेतील या राष्ट्र व समाजहिताच्या उपक्रमाचे नेहमी अभिनंदन करून अंमलबजावणी करतात.त्यामुळे दिवाळीत कोणताही विद्यार्थी फटाके वाजवत नाही.सर्व विद्यार्थी दरवर्षी प्रतिज्ञा घेऊन
प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करतात. वर्षभरातील सर्व सण समारंभ प्रदूषणमुक्त साजरे करतात कारण त्यांना शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी तसे धडे देऊन त्यांच्यामध्ये समहिताचे मूल्य रुजविले आहेत .यावर्षी कोरोनामुळे शाळेला अजून सुट्ट्या आहेत तरीही विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी ही प्रतिज्ञा घेऊन फटाकेमुक्त दिवाळी साजरी करीत आहेत. गावालाही या उपक्रमाचे महत्व समजले त्यामुळे शाळेचा हा उपक्रम गावाचा झाला .त्यांनाही नेहमी शाळेचा अभिमान वाटतो .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा