मुख्य सामग्रीवर वगळा

गितेवाडी शाळेत पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण उपक्रम कायमस्वरूपी रुजला

गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण नवोपक्रम  कायमस्वरूपी रुजला  

अहमदनगर--पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी शाळेत शिक्षणातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा  समाज व राष्ट्रहिताचा नवोपक्रम उपक्रमशील मुख्याध्यापक  तुकाराम अडसूळ यांनी यशस्वीपणे राबविला . त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे समाजहिताचे मूल्य हे मूल्य कायमस्वरूपी रुजले आहे .पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही आपल्या देशासह एक मोठी जागतिक  समस्या आहे.शाळेतील विद्यार्थी हे उद्याच्या काळात देशाचे भावी नागरिक व आधारस्तंभ आहेत .त्यामुळे त्यांची योग्य जडणघडण होत असताना त्यांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे समाज व देशहिताचे  मूल्य शिक्षणातून रुजणे अत्यंत आवश्यक आहे .मानवासह सर्व सजीवांना  आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी  आणि आपल्या देशाची व समाजाची ही समस्या शिक्षणातून सोडविण्यासाठी आम्ही या नवोपक्रमाची निवड करून तो शाळेत यशस्वीपणे राबविला असल्याचे या शाळेतील उपक्रमशील मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ यांनी सांगितले आहे.तुकाराम अडसूळ यांच्या अगोदर या शाळेत शिक्षणाला पूरक  निसर्गरम्य व आनंददायी वातावरण नव्हते .त्यामुळे त्यांनी या सामाजिक उपक्रमाचे उत्कृष्टपणे नियोजन करून हा उपक्रम यशस्वीपणे राबविला . पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे .या सामाजिक जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊन त्यांनी या सामाजिक कार्यात कृतिशील सहभाग घ्यावा तसेच ही  सामाजिक मूल्य विद्यार्थ्यांमध्ये कायमस्वरूपी रुजण्यासाठी  शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी विद्यार्थ्यांना ,पालकांना ,ग्रामस्थांना  ,गावातील माध्यमिक  माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षारोपनासाठी  सुमारे दीड ते दोन हजार  झाडांची रोपे वाटप केली . झाडे आपल्याला प्राणवायू देतात .या प्राणवायूची किंमत आपल्याला दवाखान्यात गेल्यावर कळते परंतु जी झाडे आपल्याला आयुष्यभर मोफत ऑक्सिजन देतात त्यांचे महत्व आपल्याला समजले पाहिजे .  सर्वांना आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी या उपक्रमाची कायमस्वरूपी गरज आहे .त्यामुळे हा उपक्रम फक्त विद्यार्थ्यांपुरता ,शाळेपुरता मर्यादित न राहता हा उपक्रम सर्व गावाचा झाला पाहिजे म्हणून शिक्षक तुकाराम अडसूळ हे नेहमी याबाबत ग्रामस्थांनमध्ये जनजागृती करतात. दरवर्षी तुकाराम अडसूळ हे झाडांची रोपे वाटप करतात .यावर्षी कोरोनाच्या काळातही  तुकाराम अडसूळ यांनी विद्यार्थ्यांच्या व ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन त्यांना वृक्षारोपणाचे महत्व सांगून जनजागृती करून  वृक्षारोपणासाठी  विविध झाडांच्या रोपांचे वाटप केले .सर्वांनी या रोपांचे वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करीत आहेत. तसेच  त्यांनी  प्लॅस्टिक पिशव्या न वापरणे ,पर्यावरणपूरक पिशव्यांचा वापर करणे ,कचऱ्याचे व्यवस्थापन  करण्यासाठी ओला व सुका कचरा वेगळा करणे , वैयक्तिक व सामूहिक स्वच्छता कायम राखणे ,हवा ,पाणी ,अन्न यांचे प्रदूषण रोखणे ,प्रदूषणमुक्त सणसमारंभ साजरे करणे ,परसबाग तयार करणे , रोपांची नर्सरी ,परिसर भेट ,पर्यावरण सहल ,वनभोजन ,सेंद्रिय शेती ,सेंद्रिय भाजीपाला बाजार ,पर्यावरण संदेश जनजागृती साठी संदेश पाट्या, नातेवाईकांना पर्यावरण संवर्धनाबाबत संदेश पाठविणे ,स्वच्छ शाळा स्वच्छ गाव स्वच्छ भारत ,प्राणी पक्षी यांना चारापाणी , विद्यार्थ्यांचा  वाढदिवस झाडाचे रोप देऊन साजरा करणे ,झाडांचे वाढदिवस साजरे करणे ,कोणत्याही कार्यक्रमात झाडाचे रोप भेट देणे असे अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे मूल्य रुजविले आहे. तसेच माता पालक मेळावे ,पालक मेळावे ,माजी विद्यार्थी मेळावा ,शाळा व्यवस्थापन समिती सभा  मधून  हवा , पाणी , अन्न ,ध्वनी प्रदूषणबाबत चर्चा करून   जनजागृती केली .गावातील सर्व प्रकारचे प्लास्टिक वेळोवेळी गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते.कचरा कशामुळे होतो याचे मूळ कारण शोधले त्यामुळे विद्यार्थी कचरा होऊ देत नाहीत. शाळेत प्रचंड प्रमाणात झाडे लावून शिक्षणाला पूरक असे निसर्गरम्य वातावरण तयार केले.  विद्यार्थी वेळोवेळी झाडांची देखभाल घेऊन त्यांनी झाडांशी मैत्री केली आहे. तसेच शिक्षक तुकाराम अडसूळ हे  समाजात विविध ठिकाणी  पर्यावरण कार्यशाळा ,पर्यावरण संमेलन ,वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रम नेहमी राबवित असतात .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

नवनीत एज्युकेशन लिमिटेडच्या वतीने सन्मानपत्र

नवनीत एज्युकेशन  लिमिटेड मुंबई ही संस्था महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी व शिक्षकांसाठी नेहमी कार्य करते. विद्यार्थ्यांना  विविध शैक्षणिक बाबतीत ज्ञान मिळावे त्यासाठी  विविध मार्गदर्शक पुस्तिका तयार करते. महाराष्ट्र शासनाने राज्यातील 108 शिक्षकांना राज्य पुरस्कार प्रदान केला. राज्यातील या सर्व पुरस्कार्थी शिक्षकांना नवनीत लिमिटेडच्या वतीने आज सन्मानचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे, आज  आमच्या गीतेवाडी येथे मला नवनीत एज्युकेशन लिमिटेड मुंबईच्या वतीने विशेष सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करताना नवनीतचे प्रतिनिधी मा.औटी साहेब ,गीतेवाडी सरपंच मा.भाऊसाहेब पोटे,उपसरपंच राजेंद्र गीते ,धारवाडीचे सरपंच बापूसाहेब गोरे ,अजिंक्य भारत या वृत्तपत्राचे पत्रकार आंबादास गोरे साहेब ,गीतेवाडी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष महादेव गीते ,नवनीतचे  लिमिटेडचे होळकर साहेब .  आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏

Research Paper Tukaram Co -Presentor Sunil Nagpur 15/11/2024 -Writing Skill

Listening, speaking, reading and writing are very important language skills in a child's life. Among them writing skill is very important. In this research paper I have given priority to English writing skill .My Research paper is Development of writing skill of the students using different tools.My school is in a rural area in a poor locality.My school is from 1st to 4th standard.I presented and wrote this research essay to improve the English writing skills in my class IV students.  .I conducted this research essay because the English writing skills of these poor children were not improved as much as they should have been.For this I practiced by creating many materials like letter cards, word cards, sentences cards, paragraph cards and picture cards. Also for this computer ,LED was used effectively to improve students' writing.So the students' English writing improved.A confidence was created in the minds of the students about writing.