गितेवाडी शाळेत महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध स्पर्धा उपक्रम
अहमदनगर--पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन पद्धतीने विविध स्पर्धा ,उपक्रम घेण्यात आले.शाळेत मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ व नवनाथ आंधळे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी शिक्षक तुकाराम अडसूळ व शिक्षक नवनाथ आंधळं यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याची माहिती दिली.विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या विषयी भाषणे केली .शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत आपले काही संदेश सांगितले .शिक्षकांनी स्वच्छतेवर चित्रकला स्पर्धा ,भाषण स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,वृक्षारोपन ,वृक्षसंवर्धन अशा विविध स्पर्धेबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी स्वच्छतेवर निबंधलेखन केले,स्वच्छतेवर सुंदर चित्रे काढली .स्वच्छतेवर भाषणे केली. सुंदर रांगोळ्या काढल्या.स्वच्छतेवर विविध संदेश सांगून त्यांचे व्हिडीओ बनवून पाठविले , विविध झाडांचे वृक्षारोपन केले ,आपल्या घराजवळील परिसर स्वच्छ केला ,कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले. ओला व सुका कचरा वेगळा केला .शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता ,वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन बाबत मूल्य रुजविली आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा बंद असून गितेवाडी शाळेत विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने चालू असून वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने विविध उपक्रम राबविले जातात असे शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ यांनी सांगितले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा