ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शाळेला सुट्ट्या दिल्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आमच्या गितेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ऑनलाईन व ऑफलाईनअशा दोन्हीही पद्धतीने शिक्षण अविरतपणे चालू आहे आहे.
२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात जून २०२० पासून गुगल मिट अँपवर आमचे ऑनलाईन अध्यापन नियोजनानुसार चालू आहे.सर्व पालकांना मी ऑनलाईन शिक्षणासाठी गुगल मिट हे अँप डाऊनलोड करून दिले आहे .आमच्या शाळेतील ७५ टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड फोन आहेत .त्यामुळे दररोज मी दोन वर्गाचे गुगल मिटवर नियमितीपणे ऑनलाईन अध्यापन करतो.विद्यार्थी आनंदाने ऑनलाईन तासाला जॉईन होतात.दररोज विद्यार्थ्यांशी ऑनलाईन तासाला अभ्यासबाबत सविस्तर चर्चा होते त्यामुळे प्रत्यक्ष संवाद साधला जातो.विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती त्यामुळे खूप चांगली झाली आहे. दिलेला ऑनलाईन अभ्यास विद्यार्थी सोडवतात.दिलेली ऑनलाईन चाचणी सोडवतात . दररोज विविध विषयांचे ऑनलाईन अध्यापन करतो . विद्यार्थ्यांना आमचे अध्यापनाचे काही व्हिडीओ करून पाठवतो .विद्यार्थी त्याचा वापर करतात.तसेच त्यांना यू ट्युबवरील काही अभ्यास दिला जातो.विद्यार्थी यू ट्युब वरील अभ्यासाचा वेळोवेळी वापर करतात. यू ट्युबवरील विविध कविता गायन ,नमुना पाठ ,विविध उदाहरणे पाहतात व समजावून घेतात .विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध दिनविशेष ,सणसमारंभ निमित्त विविध स्पर्धा ,उपक्रम ऑनलाईन पद्धतीने राबवितो.विद्यार्थी आनंदाने विविध स्पर्धेत व उपक्रमात कृतिशील सहभाग घेतात.विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षर स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,भाषण स्पर्धा ,पाठांतर स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा ,वेशभूषेनुसार सादरीकरण स्पर्धा ,वैयक्तिक गीत गायन स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेतो तसेच वृक्षारोपण ,वृक्षसंवर्धन , अवांतर वाचन प्रकल्प , वैयक्तिक व सामूहिक स्वच्छता राखणे,आरोग्याबाबत व कोरोनाबाबत दक्षता ,,,,,,,असे विविध कृतिशील उपक्रम ऑनलाईन पद्धतीने राबवितो.
त्यामुळे अभ्यासाबरोबर इतर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे.
हे झाले ऑनलाईन शिक्षणाबाबत .
आमच्या शाळेतील २५ टक्के विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाईल फोन नाही.त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब आहे.त्यांच्यासाठी आम्ही दररोज फोनवर चर्चा करून विविध प्रकारचा अभ्यास देतो. तसेच त्यांना ऑनलाईन तासासाठी ज्या मुलांकडे अँड्रॉईड फोन आहे त्यांच्याकडे सोय केली आहे.तसेच या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी ऑफलाईन शिक्षण पद्धती राबवितो .या विद्यार्थ्यांच्या घरी मी वेळोवेळी जाऊन प्रत्येक विदयार्थ्यांना किमान दोन तास विविध विषयांचे अध्यापन करतो.ऑफलाईन शिक्षणात सर्व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा अभ्यास तपासणी करून त्यांना वैयक्तिकपणे अध्यापन करून मार्गदर्शन करतो.तसेच ऑफलाईन शिक्षणात शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रमवर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी राबवितो .
त्यांना फोनवर व व्हाट्सअपवर दिलेला अभ्यास त्यांच्या घरी जाऊन सविस्तर तपासून वैयक्तिक मार्गदर्शन करतो.विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सर्व विषयाच्या स्वाध्याय पुस्तिका तयार करून आम्ही दिलेल्या आहेत .या स्वाध्याय पुस्तिका विद्यार्थी नियमितपणे सोडवतात.विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन या स्वाध्याय पुस्तिका तपासून मार्गदर्शन करतो . घरी गेल्यामुळे पालकांना खूप आनंद होतो.ते खूप सहकार्य करतात त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होत आहे.विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण दिल्यामुळे विद्यार्थ्यांना सवित्तर मार्गदर्शन करता येते .आपले शिक्षक दररोज ऑनलाईन अध्यापन करतात आणि आपला अभ्यास पाहण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा वेळोवेळी घरी येतात.याचा विद्यार्थ्यांनाही खूप आनंद होतो. विद्यार्थ्यांच्या घरी अध्यापन केल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती कशी आहे हे समजते .त्यामुळे पालकही विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सक्रीय सहभाग घेऊन मदत करतात.अनेक विद्यार्थ्यांच्या जायला चांगले रस्ते नाहीत तरीही विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या ओढीने त्या अडचणीत मार्ग काढून विद्यार्थ्यांच्या घरी वेळोवेळी आनंदाने जातो. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील त्रुटी समक्ष दुरुस्ती करतो. .तसेच या ऑफलाईन अध्यापनाच्या वेळी विद्यार्थ्यांना वाचनासाठी अवांतर पुस्तके वेळोवेळी देत असतो.ही अवांतर पुस्तके विद्यार्थी आनंदाने वाचतात .त्यामुळे त्यांची वाचनात खूप उत्कृष्ट प्रगती होऊन त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली आहे. तसेच वृक्षारोपन ,सेंद्रिय शेती बाबत ग्रामस्थ व पालकांच्या घरी जाऊन जनजागृती करून त्यांना विविध रोपे वाटप केली आहे. आपापल्या घरी ,शेतात वृक्षारोपन केले आहे. काहींनी घराजवळ सेंद्रिय परसबाग केली आहे. विद्यार्थ्यांनी ,ग्रामस्थांनी प्रदूषणमुक्त सणसमारंभ साजरे केले आहे .त्यामुळे कोरोनाकाळात पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण हे राष्ट्रहिताचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविले आहे. अशा प्रकारे मी ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्हीही पद्धतीचे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करीत आहे.
लेखक
तुकाराम तुळशिराम अडसूळ
प्रभारी मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि.अहमदनगर
मो.७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा