गितेवाडी प्राथमिक शाळेत वाचन प्रेरणा दिन व हात धुवादिन ऑनलाईन पद्धतीने उत्साहात साजरा
अहमदनगर--पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए. पी.जे .अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन ऑनलाईन पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ व शिक्षक नवनाथ आंधळे यांनी डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले.शिक्षक तुकाराम अडसूळ व नवनाथ आंधळे यांनी विद्यार्थ्यांशी ऑनलाईन पद्धतीने संपर्क साधून त्यांना डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याची ,वाचन प्रेरणा दिनाची ,जागतिक हात धुवा दिनाची सविस्तर माहिती दिली. शिक्षक तुकाराम अडसूळ ,नवनाथ आंधळे हे गृहभेटीद्वारे विविध प्रकारची पुस्तके वाचनासाठी देतात .यावेळी वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला .शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने वाचनाचे जीवनातील महत्व सांगितले.विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने वाचनाबाबत काही महत्त्वाचे संदेश सांगितले त्याबाबत काही व्हिडीओ बनवून पाठवले.यावेळी विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी एका अवांतर पुस्तकाचे वाचन केले.तसेच ऑनलाईन पद्धतीने हात कसा धुवावा याबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कृतिशील मार्गदर्शन केले.जीवनात हात धुणे व स्वच्छता किती महत्वाची आहे हे सांगितले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने साबणाने हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.विद्यार्थी नेहमी अशा प्रकारे योग्य पद्धतीने साबण लावून हात धुतात.याबाबत शिक्षकांनी वेळोवेळी कृतिशील मार्गदर्शन करून तसे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविले आहे.तसेच हात धुणे व स्वछता यांविषयी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे काही संदेश सांगितले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा