कोरोनाकाळात आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता दिन स्पर्धेत गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचा गौरव
अहमदनगर-- कोरोनाकाळात आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त जागतिक पातळीवर घेण्यात आलेल्या स्पर्धेत पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा ऑनलाईन पद्धतीने विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.जगात नेहमी शांतता व सहकार्याचे वातावरण रहावे म्हणून स्वीडन देशातील इको ट्रेनिंग सेंटरने २१ सप्टेंबर २०२० रोजी आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांसाठी शांततेवर आधारित भाषण स्पर्धा चित्रकला स्पर्धा ,शांततेबद्दल विविध संदेश स्पर्धा ,,,अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या . या स्पर्धेत गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेविषयी संदेश स्पर्धेत कृतिशील सहभाग घेतला होता .त्यानुसार शाळेतील विद्यार्थी रामेश्वर महादेव गिते ,सार्थक शिवाजी गिते,श्रद्धा सदाशिव गिते ,समृद्धी आसाराम गिते या चार विद्यार्थ्यांनी जगाला आपल्या इंग्रजी भाषणातून शांततेचे संदेश दिले .त्याबाबतचे हे इंग्रजी भाषणाचे संदेश व्हिडीओ करून स्वीडन देशातील इको ट्रेनिंग सेंटरला पाठविण्यात आले .स्पर्धा कमिटीने त्याबाबत परीक्षण केले होते. गितेवाडी शाळेतील या चार विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय संदेशाबद्दल इको ट्रेनिंग सेंटरच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.याबद्दल पालक ,ग्रामस्थ ,अधिकारी यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.
या स्पर्धेमुळे जगातील विविध देशातील विद्यार्थ्यांमध्ये शांततेसाठी योग्य परिवर्तन होईल असे गितेवाडी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ यांनी सांगितले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा