पर्यावरण बहुउद्देशीय संस्था भारत कडून शिक्षक तुकाराम अडसूळ यांना राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार
अहमदनगर- पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांना
पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे येथील पर्यावरण बहुद्देशीय संस्था भारत च्या वतीने नुकतेच आदर्श गाव हिवरे बाजार येथे महाराष्ट्र राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान केला . तुकाराम अडसूळ यांनी सध्याची गितेवाडी शाळा आणि यापूर्वीची जेऊर शाळा यामध्ये लोकसहभागातून शाळेत परिवर्तन केले. या दोन्हीही शाळेत प्रचंड प्रमाणात झाडे लावून त्यांचे संवर्धन केले. शाळेत आनंददायी शिक्षणाला पूरक असे निसर्गरम्य वातावरण तयार केले .विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना वृक्षारोपणासाठी विविध झाडांच्या रोपांचे वाटप केले .त्यामुळे विद्यार्थ्यानी व ग्रामस्थांनी अनेक झाडे लावून त्यांचे संवर्धन केले.तसेच आपल्या मूलभूत गरजा हवा ,पाणी ,अन्न यांचे प्रदूषण थांबविण्यासाठी विविध कृतिशील उपक्रम शाळेत राबविले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी प्रदूषणमुक्त सणसमारंभ साजरे केले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे राष्ट्रहिताचे मूल्य रुजविले. पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे कार्य विस्तारित करण्यासाठी राज्यातील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन ,पर्यावरण कार्यशाळा आयोजन करून शिक्षकांना कृतिशील मार्गदर्शन करतात.नोव्हेंबर
२०१८ मध्ये त्यांची पर्यावरण अभ्यास दौऱ्यासाठी जगात पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत आघाडीवर असलेल्या भूतान देशात दहा दिवस निवड झाली होती.भूतान देशात जाऊन त्यांनी विविध गावे ,शहरे ,शाळा ,नद्या ,शेती यांना भेटी देऊन मुलाखती घेऊन चर्चा केली आणि पर्यावरणाचा अभ्यास केला.भारत देशाचे भूतान देशातील राजदूत डॉ.जयदीप सरकार यांनी भूतान देशाची राजधानी थिंपू येथे भारताच्या दूतावासमध्ये त्यांचे स्वागत करून पर्यावरणावर कार्यक्रम आयोजित केला होता.त्यावेळी भारतीय दूतावासमध्ये तुकाराम अडसूळ यांनी पर्यावरणावर आपले विचार मांडून पर्यावरण संवर्धन बाबत सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले .भूतान देशातील पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत राबविलेले उपक्रम ते आपल्या राज्यात राबवित आहेत.
विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत वेळोवेळी मार्गदर्शन करतात .तसेच समाजात विविध ठिकाणी लोकांना पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत वेळोवेळी मार्गदर्शन करतात.नोव्हें बर २०१९ मध्ये ते दिल्ली येथे भारत सरकारच्या सी.सी.आर.टी. प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली होती.दिल्ली येथील प्रशिक्षणात विविध राज्यातील शिक्षकांना तुकाराम अडसूळ यांनी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत वेळोवेळी सवित्तर मार्गदर्शन केले.त्यांच्या या पर्यावरण संवर्धन कार्याचे सी.सी.आर.टी. चे संचालक ऋषीकुमार विशिष्ट यांनी विशेष अभिनंदन केले. शाळेत त्यांनी शिक्षणातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण नवोपक्रम राबवून त्यावर पुस्तक लेखन करून त्याचे पुणे येथे शिक्षण संचालक दिनकर पाटील माजी शिक्षण संचालक वसंत काळपांडे ,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ यांचे हस्ते प्रकाशन केले.
तुकाराम अडसूळ यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.तसेच त्यांना स्वीडन देशातील पर्यावरणाचा जागतिक पुरस्कार मिळाला आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पुणे येथील पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष देवाजी तांबे , या संस्थेचे सल्लागार विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलरावजी जाधव यांनी आदर्श गाव हिवरे बाजार येथे पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते विशेष प्रमाणपत्र ,सन्मानचिन्ह देऊन राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान केला .यावेळी पद्मश्री पोपटराव पवार यांनी तुकाराम अडसूळ यांच्या पर्यावरण कार्याचे विशेष अभिनंदन केले.यावेळी आदर्श गाव हिवरे बाजार च्या नूतन सरपंच विमलताई ठाणगे , विविध मान्यवर व पत्रकार उपस्थित होते. सृष्टीमित्र लतीफ राजे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा