उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांच्या पुस्तकांचे पुणे येथे प्रकाशन
अहमदनगर-अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी येथील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी लेखन केलेल्या उपक्रमातून समृद्धीकडे आणि शिक्षणातून पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण या दोन पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच पुणे येथील ATM परिवाराच्या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात झाले.पुणे येथे नुकताच ATM परिवारातील शिक्षकांचा सन्मान सोहळा व पुस्तक प्रकाशन समारंभ महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे माजी संचालक आणि संचालक बालभारती तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे दिनकर पाटील ,
राज्याचे पूर्व शिक्षण संचालक व शिक्षणतज्ञ डॉ.वसंत काळपांडे ,
राज्याचे शिक्षणमंत्री यांचे माजी ओ.एस. डी.व शिक्षण अभ्यासक प्राची साठे ,औरंगाबाद डाएट चे विशाल तायडे ,गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे ,ATM परिवाराचे राज्य संयोजक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विक्रम अडसूळ ,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ज्योती ताई बेलवले व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी गितेवाडी शाळेत बदलीने हजर झाल्यावर विविध उपक्रम राबवून शाळेचे लोकसहभागातून परिवर्तन केले. शाळेत शिक्षणाला पूरक असे निसर्गरम्य , आनंददायी वातावरण तयार करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवली.गावाला अभिमान वाटावा अशी एक आदर्श शाळा तयार केली.त्यामुळे शाळेचा विद्यार्थी पट वाढला.यावर उपक्रमातून समृद्धीकडे ही पुस्तिका तयार केली.तसेच शाळेत शिक्षणातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा नवोपक्रम यशस्वीपणे राबविला .या उपक्रमात विद्यार्थी ,पालक ,ग्रामस्थ यांचा कृतिशील सहभाग घेऊन त्यांच्यात पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे मूल्य रुजविले.यावर उपक्रमाचे पुस्तक तयार केले.या दोन्हीही पुस्तकांचे प्रकाशन पुणे येथे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सर्व मान्यवरांनी या पुस्तकाची पाहणी करून उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांचे विशेष अभिनंदन केले.या पुस्तकांना राज्याचे संचालक दिनकर पाटील ,पूर्व शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे ,संगमनेर येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डी.डी.सूर्यवंशी यांनी प्रस्तावना व शुभेच्छा आहे.यापूर्वी तुकाराम अडसूळ विविध विषयांवर चार पुस्तकांचे लेखन केले आहे.राज्यातील शिक्षक लेखक झाल्याचा खूप अभिमान वाटतो असे यावेळी संचालक दिनकर पाटील म्हणाले.राज्यातील शिक्षक नेहमी चांगले दर्जेदार लेखन करतात असे यावेळी राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ.वसंत काळपांडे म्हणाले.राज्यातील शिक्षकांच्या लेखनासाठी ATM परिवाराने स्वतःचे ATM प्रकाशन काढले असे ATM चे राज्यसंयोजक विक्रम अडसूळ म्हणाले.या आनंददायी सोहळ्यास राज्यातील ATM परिवारातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा