मुख्य सामग्रीवर वगळा

विज्ञान दिनानिमित्त- शाळेतील विविध विज्ञान प्रयोग -लेख दिनांक - १ /१/२०२१


विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे अध्यापन करताना प्रत्यक्ष कृतीद्वारे अध्यापन व प्रयोग करणे महत्वाचे असते .त्यामुळे त्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो.मी विज्ञान विषयाचे अध्यापन करताना विविध घटकांवर अनेक लहान लहान व सोपे प्रयोग केले .त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीद्वारे शिक्षण मिळाले.त्यांची निरीक्षण ,अनुमान शक्ती वाढीस लागली. परिसर अभ्यास मधील पिण्याचे पाणी हा घटक शिकविताना काही पदार्थ पाण्यात विरघळतात तर काही पदार्थ पाण्यात विरघळत नाही हे प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवून देताना काचेच्या काही बाटल्या घेतल्या .त्या प्रत्येक बाटलीत पाणी टाकले.एका बाटलीत साखर ,दुसऱ्या बाटलीत मीठ ,धुण्याचा सोडा टाकला तर काही बाटलीत वाळू ,लाकडाचा भुसा टाकला .साखर ,मीठ ,धुण्याचा सोडा हे पाण्यात विरघळले तर वाळू ,लाकडाचा भुसा हे पाण्यात विरघळले नाही.यावरून विद्यार्थ्यांना कोणते पदार्थ पाण्यात विरघळतात व कोणते विरघळत नाही हे कृतीद्वारे समजले.
काही वस्तू पाण्यात तरंगतात तर काही वस्तू पाण्यात तरंगत नाहीत.हे प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवून देण्यासाठी एका काचेच्या भांड्यात पाणी घेतले.त्यात खोडरबर ,पेन्सिल ,काड्या ,खडे ,नाणे,पाने ,खिळा अशा एक एक वस्तू पाण्यात टाकल्या असता खोडरबर ,खिळा ,नाणे ,खडे या वस्तू पाण्यात बुडाल्या तर पेन्सिल,काड्या ,पाने या वस्तू पाण्यात बुडाल्या नाहीत.याचे ज्ञान विद्यार्थ्यांना कृतीद्वारे दिले.
 एका ठिकाणी साठवलेले पाणी नळाचा वापर करून निरनिराळ्या ठिकाणी नेता येते हे दाखविण्यासाठी एक प्लॅस्टिक बाटली घेतली.तिचा वरचा निमुळता भाग कापून टाकला .तळापासून काही अंतरावर चार छिद्रे पाडली .एक रिकामी रिफिल घेऊन तिचे चार तुकडे केले.हे चार तुकडे चार छिद्रात घट्ट बसवले .बाटलीत पाणी भरले.सर्व नळ्यामधून पाणी वाहू लागले.त्यामुळे एका ठिकाणी असलेले पाणी विविध ठिकाणी नेता येते हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून समजले. हवा हा पाठ शिकविताना रिकाम्या भांड्यातही हवा असते हे दाखविण्यासाठी एका मोठ्या रिकाम्या भांड्यात पाणी घेतले.त्यानंतर एक उभट रिकामे भांडे घेतले.भांडे उपडे करून पृष्ठभागावर तसेच उभे करून पाण्यात खाली  दाबले .नंतर भांडे तिरपे केले .हवेचे बुडबुडे लगेच पाण्याच्या वर येऊ लागले.यावरून हवा पाण्यापेक्षा हलकी असते.म्हणून भांडे तिरपे झाले हवेचे बुडबुडे पाण्याबाहेर वर येतात  व रिकाम्या भांड्यातही हवा असते हे विद्यार्थ्यांना या प्रयोगातून समजले.
दिवस रात्र कसे होतात हे प्रत्यक्ष कृतीतून समजावून दिले.एक बॅटरी व एक भोवरा घेतला. बॅटरी म्हणजे सूर्य आणि भोवरा म्हणजे पृथ्वी हे विद्यार्थ्यांना सांगितले.बॅटरी व भोवरा समोरासमोर ठेवले . भोवरा फिरवला व बॅटरी चालू करून तिचा प्रकाश भोवऱ्याच्या समोरच्या भागावर पडला.हा प्रकाश म्हणजे दिवस भोवरा फिरत असल्यामुळे पुन्हा उजेडातील भाग अंधारात गेला हा अंधार म्हणजे रात्र हे विद्यार्थ्यांना या प्रयोगातून दाखवून दिले.त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवस रात्र कसे होतात हे प्रत्यक्ष कृतीतून समजले.
विषारी वायू हवेत पसरल्यामुळे हवेचे प्रदूषण होते.त्यामुळे ही दूषित हवा सर्व सजीवांच्या जीवनास घातक असून त्यामुळे श्वसनाचे विविध आजार होतात. विद्यार्थ्यांना हवेत धूर मिसळतो याचे निरीक्षण करण्यास सांगितले.विद्यार्थ्यांना हे समजले त्यांनी आपले व सर्व सजीवांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी  प्रदूषणमुक्त सणसमारंभ साजरे करण्याची प्रतिज्ञा घेतली व प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करतात .हवेचे प्रदूषण होऊ देत नाहीत .पाण्याचे प्रदूषण कसे होते व परिसरातून आपल्या गरजा कशा पूर्ण होतात हे विद्यार्थ्यांना ओढ्यावर  परिसर भेट काढून पाण्याचे निरीक्षण करण्यास सांगून प्रत्यक्ष कृतीसह समजावून सांगितले.विद्यार्थ्यांना प्रदूषणाचे दुष्परिणाम या दूषित पाण्यातून समजावून दिले.त्यांनी पाण्याचे प्रदूषण न करण्याची प्रतिज्ञा घेतली.शाळेतील सर्व विद्यार्थी पाण्याचे प्रदूषण होऊ देत नाहीत. तसेच परिसरातून आपल्या गरजा कशा प्रकारे पूर्ण होतात हे त्यांना परिसरातील विविध  पिके ,झाडे , व इतर  परिसरास भेट देऊन प्रत्यक्ष कृतीतून समजावून दिले . अशा प्रकारे विज्ञानातील विविध बाबी विविध साध्या सोप्या प्रयोगातून समजावून दिले जाते.त्यामुळे विद्यार्थ्यांना कृतिशील शिक्षण मिळून त्यांची निरीक्षण शक्ती वाढीस लागली आणि  त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला.

लेखक
तुकाराम तुळशिराम अडसूळ
प्रभारी मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी
ता.पाथर्डी जि. अहमदनगर
मो.७५८८१६८९४८

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

नवनीत एज्युकेशन लिमिटेडच्या वतीने सन्मानपत्र

नवनीत एज्युकेशन  लिमिटेड मुंबई ही संस्था महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी व शिक्षकांसाठी नेहमी कार्य करते. विद्यार्थ्यांना  विविध शैक्षणिक बाबतीत ज्ञान मिळावे त्यासाठी  विविध मार्गदर्शक पुस्तिका तयार करते. महाराष्ट्र शासनाने राज्यातील 108 शिक्षकांना राज्य पुरस्कार प्रदान केला. राज्यातील या सर्व पुरस्कार्थी शिक्षकांना नवनीत लिमिटेडच्या वतीने आज सन्मानचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे, आज  आमच्या गीतेवाडी येथे मला नवनीत एज्युकेशन लिमिटेड मुंबईच्या वतीने विशेष सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करताना नवनीतचे प्रतिनिधी मा.औटी साहेब ,गीतेवाडी सरपंच मा.भाऊसाहेब पोटे,उपसरपंच राजेंद्र गीते ,धारवाडीचे सरपंच बापूसाहेब गोरे ,अजिंक्य भारत या वृत्तपत्राचे पत्रकार आंबादास गोरे साहेब ,गीतेवाडी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष महादेव गीते ,नवनीतचे  लिमिटेडचे होळकर साहेब .  आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏

Research Paper Tukaram Co -Presentor Sunil Nagpur 15/11/2024 -Writing Skill

Listening, speaking, reading and writing are very important language skills in a child's life. Among them writing skill is very important. In this research paper I have given priority to English writing skill .My Research paper is Development of writing skill of the students using different tools.My school is in a rural area in a poor locality.My school is from 1st to 4th standard.I presented and wrote this research essay to improve the English writing skills in my class IV students.  .I conducted this research essay because the English writing skills of these poor children were not improved as much as they should have been.For this I practiced by creating many materials like letter cards, word cards, sentences cards, paragraph cards and picture cards. Also for this computer ,LED was used effectively to improve students' writing.So the students' English writing improved.A confidence was created in the minds of the students about writing.