ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शाळेला सुट्ट्या दिल्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आमच्या गितेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण अविरतपणे चालू आहे आहे.
२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात जून २०२० पासून गुगल मिट अँपवर आमचे ऑनलाईन अध्यापन नियोजनानुसार चालू आहे.या शाळेत आम्ही दोन शिक्षक आहोत.इयता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग आहेत.
सर्व पालकांना आम्ही विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी गुगल मिट हे अँप डाऊनलोड करून दिले आहे .आमच्या शाळेतील ७५ टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड फोन आहेत .त्यामुळे दररोज आम्ही दोन वर्गाचे नियमितीपणे ऑनलाईन अध्यापन करतो.विद्यार्थी आनंदाने ऑनलाईन तासाला जॉईन होतात.दररोज विद्यार्थ्यांशी ऑनलाईन तासाला प्रत्यक्ष संवाद साधला जातो.विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती खूप चांगली झाली आहे. दिलेला ऑनलाईन अभ्यास विद्यार्थी सोडवतात.दिलेली ऑनलाईन चाचणी सोडवतात .या ऑनलाईन चाचणीत अनेक विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण मिळवितात. आम्ही दररोज विविध विषयांचे ऑनलाईन अध्यापन करतो . विद्यार्थ्यांना आमचे अध्यापनाचे काही व्हिडीओ करून पाठवतो .विद्यार्थी त्याचा वापर करतात.तसेच त्यांना यू ट्युबवरील काही अभ्यास दिला जातो.विद्यार्थी यू ट्युब वरील अभ्यासाचा वेळोवेळी वापर करतात. यू ट्युबवरील विविध कविता गायन ,नमुना पाठ ,विविध उदाहरणे पाहतात व समजावून घेतात .विद्यार्थी मोबाईलचा वेळोवेळी योग्य वापर करतात .विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध दिनविशेष ,सणसमारंभ निमित्त विविध स्पर्धा ,उपक्रम राबवितो.विद्यार्थी आनंदाने विविध स्पर्धेत व उपक्रमात कृतिशील सहभाग घेतात.विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षर स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,भाषण स्पर्धा ,पाठांतर स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा ,वेशभूषेनुसार सादरीकरण स्पर्धा ,वैयक्तिक गीत गायन स्पर्धा तर वृक्षारोपण ,वृक्षसंवर्धन , अवांतर वाचन प्रकल्प , वैयक्तिक व सामूहिक स्वच्छता राखणे,आरोग्याबाबत व कोरोनाबाबत दक्षता ,,,,,,,असे विविध कृतिशील उपक्रम ऑनलाईन पद्धतीने राबवितो त्यामुळे अभ्यासाबरोबर इतर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे.
हे झाले ऑनलाईन शिक्षणाबाबत .आमच्या शाळेतील २५ टक्के विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाईल फोन नाही.त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब आहे.त्यांच्यासाठी आम्ही दररोज फोनवर चर्चा करून विविध प्रकारचा अभ्यास देतो.या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आम्ही ऑफलाईन शिक्षण पद्धती राबवित आहोत.या विद्यार्थ्यांच्या घरी आम्ही वेळोवेळी जाऊन प्रत्येक विदयार्थ्यांना किमान दोन तास विविध विषयांचे अध्यापन करतो.आम्ही ऑफलाईन शिक्षणात शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम राबवितो .
त्यांना फोनवर दिलेला अभ्यास सविस्तर तपासून वैयक्तिक मार्गदर्शन करतो.विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सर्व विषयाच्या स्वाध्याय पुस्तिका तयार करून आम्ही दिलेल्या आहेत .या स्वाध्याय पुस्तिका विद्यार्थी नियमितपणे सोडवतात.विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन या स्वाध्याय पुस्तिका आम्ही तपासून मार्गदर्शन करतो .आम्ही अभ्यास पाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी नेहमी जातो . विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अध्यापन केल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचे घर माहिती झाले. यामुळे पालकांना खूप आनंद होतो.ते खूप सहकार्य करतात त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होत आहे.विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण दिल्यामुळे विद्यार्थ्यांना सवित्तर मार्गदर्शन करता येते .आपले शिक्षक दररोज ऑनलाईन अध्यापन करतात व आपला अभ्यास पाहण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा वेळोवेळी घरी येतात.याचा विद्यार्थ्यांनाही खूप आनंद होतो. विद्यार्थ्यांच्या घरी अध्यापन केल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती कशी आहे हे पालकांना समजते .त्यामुळे पालकही विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सक्रीय सहभाग घेऊन मदत करतात.पालकांनाही शिक्षकांविषयी आणखी आपुलकी निर्माण होते .अनेक विद्यार्थ्यांच्या जायला चांगले रस्ते नाहीत तरीही विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या ओढीने त्या अडचणीत मार्ग काढून विद्यार्थ्यांच्या घरी वेळोवेळी आनंदाने जातो. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील त्रुटी समक्ष दुरुस्ती करता येते .तसेच या ऑफलाईन अध्यापनाच्या वेळी विद्यार्थ्यांना वाचनासाठी अवांतर पुस्तके वेळोवेळी देत असतो.ही अवांतर पुस्तके विद्यार्थी आनंदाने वाचतात .त्यामुळे त्यांची वाचनात खूप उत्कृष्ट प्रगती होऊन त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली आहे.त्यांचे वाचन कौशल्य विकसित झाले आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा नियोजनानुसार अभ्यासक्रम पूर्ण होऊन त्यांची अभ्यासाची उत्कृष्टपणे तयारी झाली आहे.अशा प्रकारे आमच्या शाळेचे ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण उत्कृष्टपणे चालू आहे.
लेखक
तुकाराम तुळशिराम अडसूळ
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि.अहमदनगर
मो.७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा