पर्यावरण संवर्धनासाठी गितेवाडी येथे वेळोवेळी वृक्षारोपण उपक्रम
अहमदनगर--पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या घरी मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारच्या झाडांच्या रोपांचे वृक्षारोपन करण्यात आले. तुकाराम अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली काही विद्यार्थ्यांच्या पालकांच्या घरी त्यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.पर्यावरण संवर्धन व प्रदूषण हा नवोपक्रम गितेवाडी शाळेत नेहमी यशस्वीपणे राबविला जाते.या नवोपक्रमात विदयार्थी व शिक्षकांनी शाळेत खूप झाडे लावून त्यांचे संवर्धन केले आहे. या शाळेतील पर्यावरण प्रेमी उपक्रमशील मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ यांनी गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या बदलीने आल्यानंतर त्यांनी हा उपक्रम खूप यशस्वीपणे राबवून शाळेतील वतावरण निसर्गरम्य व आनंददायी केले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शाळा सुटली तरी घरी जाऊ वाटत नाही . त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण महत्व वृक्षारोपन ,वृक्षसंवर्धन ,कचरा व्यवस्थापन ,प्लॅस्टिक पिशव्या वापर न करता पर्यावरण पूरक पिशव्या वापर याबाबत महत्व पटवून दिले.विद्यार्थ्यांबरोबर पालक व ग्रामस्थ यांनाही पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत वेळोवेळी कृतिशील मार्गदर्शन करून जनजागृती केली.तुकाराम अडसूळ यांनी शाळेतील सर्व विद्यार्थी ,माध्यमिक शाळेचे विद्यार्थी ,उच्च माध्यमिक चे विद्यार्थी ,पालक ,ग्रामस्थ यांना वेळोवेळी विविध प्रकारच्या देशी पाचे ते वीस झाडांच्या रोपांचे दरवर्षी वाटप करतात .सर्वांनी या झाडांचे घराजवळ ,शेताच्या कडेला वृक्षारोपन करून त्यांचे संगोपन केले आहे.त्यामुळे शाळेचा पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा उपक्रम गावाचा झाला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा