उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांना जागतिक पुरस्कार
अहमदनगर--पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील प्रभारी मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ यांना पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण कार्याबद्दल स्वीडन देशातील इको ट्रेनिंग सेन्टर च्या वतीने नुकताच जागतिक पर्यावरण पुरस्कार २०२० प्रदान करण्यात आला आहे.स्वीडन मधील इको ट्रेनिंग सेन्टर च्या वतीने जगातील विविध ३३ देशातील सुमारे शंभर शिक्षकांना पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही एक जागतिक समस्या आहे.पर्यावरणाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.
स्वीडन देशातील इको ट्रेनिंग सेंटर ही संस्था जागतिक पातळीवर पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्याचे कार्य करते.उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ हे अनेक वर्षा पासून या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे.त्यांनी सध्याची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी आणि यापूर्वीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर मध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा उपक्रम यशस्वीपणे राबवून या शाळेत परिवर्तन करून निसर्गरम्य आनंददायी व पर्यावरणपूरक वातावरण तयार केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये कृतिशील संस्कार करून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे राष्ट्रहिताचे मूल्य रुजविले आहे.तसेच ते समाजात विविध ठिकाणी हे कार्य नेहमी करत आहेत.यासाठी ते पर्यावरण संमेलन ,पर्यावरण कार्यशाळा यासाठी परिश्रम घेऊन कृतिशील सहभाग घेतात.पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्यासाठी इतर शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून जनजागृती करतात.त्यांचे विद्यार्थी नेहमी प्रदूषणमुक्त सणसमारंभ साजरे करून हवा ,पाणी ,अन्न व इतर बाबींचे प्रदूषण करत नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा