पाठयपुस्तकातील लेखिका अंजली अत्रे यांनी डोंगराळ भागातील गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद
अहमदनगर- पाठयपुस्तकातील लेखिका अंजली अत्रे यांनी पाथर्डी तालुक्यातील डोंगराळ भागातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी २२ मार्च २०२१ रोजी लेखिका विद्यार्थ्यांच्या भेटीला या उपक्रमात संवाद साधून चर्चा करून मार्गदर्शन केले. लेखिका अंजली अत्रे यांनी गुगल मिट अँपद्वारे विद्यार्थ्यांशी ,शिक्षकांशी ,पालकांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधून विविध विषयांवर चर्चा केली .कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण , ऑफलाईन शिक्षण आणि विविध उपक्रम शिक्षकांनी उत्कृष्ट पणे चालू ठेवले आहे .इयता चौथीच्या मराठी विषयाच्या पाठयपुस्तकातील मिठाचा शोध या धड्याच्या लेखिका तसेच अभिनेत्री ,कथाकार अंजली अत्रे यांनी विद्यार्थ्यांशी गुगल मिट अँपवर व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सुमारे दीड तासआनंदाने संवाद साधून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची सवित्तर उत्तरे दिली.पुढीलप्रमाणे विविध प्रश्न विचारून संवाद साधला .लेखिकेचे बालपण ,शिक्षण ते लेखिका हा प्रवास कसा झाला ?मिठाचा शोध हा धडा इयता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी का लिहिला?या धड्यातून तुम्ही विद्यार्थ्यांना कोणता संदेश द्याल ?
लेखक होण्यासाठी आपण काय केले पाहिजे ? लेखिका होण्यासाठी आपणास कोणी मार्गदर्शन केले ?यासाठी कोणी प्रेरणा दिली ?आपण आणखी कोणकोणती पुस्तके लिहिली आहेत ? भविष्यात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे ?आपण शिक्षण घेतले ती शाळा कशी होती ?आम्ही आणखी कोणकोणते उपक्रम राबविले पाहिजेत ?आपण इतर वर्गातील विद्यार्थ्यांसाठी कोणते लेखन केले आहे ? आम्हाला काही गोष्टी सांगा ,,,,,,अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी आनंदाने संवाद साधून चर्चा केली.लेखिका अंजली अत्रे यांनी विद्यार्थ्यांना आनंदाने अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले. काही गोष्टी विद्यार्थ्यांना सांगून त्यातून अनमोल संदेश दिला .आजचा संवाद विद्यार्थी त्यांच्या जीवनात कधीही विसरणार नाहीत असा आनंददायी झाला .या संवादात विद्यार्थ्यांबरोबर पालकही मोठ्या संख्येने सहभागी झाले. शाळेच्या अनेक उपक्रमात पालकांना सहभागी केले जाते .त्यामुळे शाळेत कोणकोणते उपक्रम राबविले जातात असे विविध उपक्रम पालकांनी लेखकांना सांगितले .शाळेत राबवित असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची पीपीटी शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ यांनी दाखवून शाळेचे लोकसहभागातून केलेले परिवर्तन याबाबत सविस्तर माहिती दिली .शाळेतील विविध उपक्रम पाहून लेखिका अंजली अत्रे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. लेखिका अभिनेत्री अंजली अत्रे या पर्यावरणप्रेमी आहेत .त्यांच्या घराजवळ केलेली विविध रोपांची लागवड त्यांनी विद्यार्थ्यांना दाखवून त्याबाबत माहिती दिली.एक दिवस पर्यावरण पूरक गितेवाडी शाळेला आवर्जून भेट देण्याचे त्यांनी सांगितले.शाळेतील शिक्षक नवनाथ आंधळे यांनी सर्वांचे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा