मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

व्हिडिओ निर्मिती स्क्रिफ्ट तुकाराम

स्टार्स ( STARS)उपक्रमांतर्गत २५६० व्हिडिओ निर्मिती पटकथा लेखन ------------------------------------------- व्हिडिओ क्रमांक २० इयत्ता -  नववी  विषय - मराठी पाठ घटक क्रमांक -९  पाठाचे/ घटकाचे नाव - कविता क्रमांक (९)मी वाचवतोय  उपघटक /पाठ्यांश -१) कवीचा परिचय  २)कविता वाचन   वेळ -३५ मिनिट  शिक्षकाचे नाव - श्री .तुकाराम तुळशीराम अडसूळ  पदनाम -उपाध्यापक  शाळेचे नाव- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी तालुका -पाथर्डी जिल्हा- अहिल्यानगर  अध्ययन निष्पत्ती- १) गीते, समूहगीते ,कविता व त्यांची भाषणे व विविध साहित्य प्रकाराच्या ध्वनिफिती समज पूर्वक ऐकता येणे   २)गाणी, कविता, समूहगीते स्वरा घातासह म्हणता येणे. दिनदर्शिकेतील पाठ क्रमांक -९ निर्मिती कार्यालयाचे नाव -  जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर जिल्हा अहिल्यानगर पाठाचे स्वरूप -  विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित नसताना ,व्हिडिओ स्वरूपात  साहित्य -  स्मार्ट बोर्ड किंवा फळा , पी.पी.टी.स्लाईड, ईमेज चित्र /फोटो. ------------------------------------------- स्लाईड 1...

स्लाईड 1निसर्गचित्रनमस्ते विद्यार्थी मित्रांनो कसे आहात?खूप आनंदी दिसतात .तुम्ही दररोज नवनवीन गोष्टी आनंदाने शिकत आहात.असेच आपण आज आनंदाने शिकणार आहोत.स्लाईड 2(साहित्य कविता गीत)साहित्य, कविता आणि गीतांचा आपल्या जिवनावर मोठा प्रभाव असतो.स्लाईड 3(कविता - विचार करणे,समाजातील वास्तव,विविध संदेश)कविता ही केवळ शब्दांची जुळवा जुळव नसते तर ती मनाला विचार करायला भाग पाडते.कवितांच्या माध्यमातून कवी समाजातील वास्तव मांडतात विचार करायला लावतात आणि हृदयाला भिडणारे संदेश देतात.शब्द हे केवळ उच्चारले जात नाहीत तर ते काळजाला भिडतात.मराठी साहित्य विश्वात अनेक प्रतिभावान संवेदनशील कवी होऊन गेले.स्लाईड 4(कवी - सतीश काळसेकर नाव व फोटो)आज आपण अशाच एका संवेदनशील कवीची ओळख करून घेणार आहोत.ते म्हणजे "मी वाचवतोय " या कवितेचे कवी सतीश काळसेकर होय.स्लाईड 5( महाराष्ट्र नकाशात सिंधुदुर्ग दाखविणे)कवी सतीश काळसेकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील कळसे येथे १२ फेब्रुवारी १९४३ मध्ये झाला.त्यांचे शालेय शिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले.स्लाईड 6(सतीश काळसेकर लेखन करताना फोटो )सतीश काळसेकर हे मराठी साहित्य विश्वातील महत्त्वाचे कवी ,लेखक व विचारवंत होते.इंद्रियोपनिषद ,साक्षात ,विलंबित हे त्यांचे कवितासंग्रह आहेत.त्यांच्या कवितांमध्ये समाजाच्या वास्तवाचे प्रतिबिंब दिसते.' कविता लेनिसाठी ' या लेनिनवरच्या जगभरातील कवितांच्या अनुवादांच्या संग्रहाचे त्यांनी संपादन केले .स्लाईड 7(विविध पुस्तके ग्रंथालय फोटो)'तात्पर्य ' ' मागोवा ' 'लोकवाङ्मय ' या नियतकालिकांच्या संपादनात त्यांचा सहभाग होता.त्यांच्याकडे विविध पुस्तके , वृत्तपत्रे, नियतकालिके यांचा प्रचंड साठा होता.स्लाईड 8(महाराष्ट्र नकाशात रायगड मध्ये पेण दाखवणे)मुंबई येथे पुस्तकांसाठी घर कमी पडले म्हणून ते रायगड जिल्ह्यातील पेन येथे निसर्गाच्या सानिध्यात पुस्तकांसाठी घर बांधून राहू लागले. स्लाईड 9(कवी लेखन करताना फोटो)त्यांचे लेखन हे समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे आहे.कवी सतीश काळसेकर हे परिवर्तनवादी विचाराचे कवी होते .स्लाईड 10(वाचन लेखन महत्व)(ग्रंथालय ,वाचताना फोटो)ज्ञानाच्या अमर्याद कक्षा वाढविण्यासाठी पुस्तकाची गरज असते. माझे घर पुस्तकांनी भरलेले आहे.आपल्या जीवनात वाचन - लेखन खूप महत्त्वाचे आहे.आपण प्रकट होण्यासाठी वाचन केले पाहिजे.वाचन केल्याशिवाय चांगले भाषण व लेखन येत नाही.माझ्याकडे पुस्तके वाचायला वेळ नाही असे म्हणू नका यासाठी कोणतीही सबब सांगू नका.ज्या दिवशी माझे वाचन थांबेल त्या दिवशी माझा श्वास थांबेल असे ते वेळोवेळी म्हणायचे.स्लाईड 11(लेखन करताना फोटो)(लेखन - वास्तव ,परिवर्तनवादी)त्यांचे लेखन समाजातील वास्तव दाखवणारे आणि परिवर्तनवादी विचार मांडणारे आहे.स्लाईड 12(कविता -वास्तव बदलण्याचे सामर्थ्य,सामाजिक संदेश )सतीश काळसेकर यांची कविता केवळ शब्दांचा खेळ नसतो ते वास्तव बदलण्याचं सामर्थ्य बाळगते.त्यांच्या कवितेत सामाजिक संदेश आहे.स्लाईड 13(कविता वाचन फोटो.)(कविता वाचून समजून घेणे ,मार्ग दाखवणे) त्यांची कविता फक्त वाचण्याची नाही तर समजून घेण्याची आणि कृतीत आणणे महत्त्वाचे आहे.त्यांच्या शब्दांचा प्रकाश आपल्याला नेहमी मार्ग दाखवत राहील.त्यांच्या कवितांमध्ये समाजाच्या वास्तवाचे प्रतिबिंब दिसते.स्लाईड 14(ग्रंथालय व कवी फोटो)त्याच्या पुस्तकांनी मराठी साहित्य समृद्ध केले.स्लाईड 15(वाचनाऱ्याची रोजनिशी - पुरस्कार ,गाजलेल्या पुस्तकांचा परिचय "वाचणाऱ्याची रोजनिशी " या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.वाचणाऱ्यांची रोजनिशीतून त्यांनी जगभरातील गाजलेल्या पुस्तकांचा परिचय करून दिला.त्यांनी देश विदेशातील अनेक महत्त्वाच्या कवींचा मराठी वाचकांना परिचय करून दिला.स्लाईड 16(विविध पुरस्कार नावे)तसेच त्यांना सोवियत लँड नेहरू पुरस्कार, लालजी पेंडसे पुरस्कार, बहिणाबाई पुरस्कार ,कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, महाराष्ट्र शासन पुरस्कार ,कैफी आजमी पुरस्कार ,महाराष्ट्र शासनाचा कृष्णराव भालेकर पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार असे अनेक मिळाले.स्लाईड 17(९.मी वाचवतोय )(सामाजिक बदल ,(हरवणाऱ्या परंपरा ,जीवनशैलीवर ताण,माझी आई,माझी भाषा ,माझी भूमी ,संस्कृती वाचवणे)"मी वाचवतोय" ही कविता सामाजिक बदलांची प्रतिबिंब आहे .कवीने हरवणाऱ्या परंपरा , बोलीभाषा ,मातीशी असलेले नाते आणि जीवनशैलीवर होणारा ताण यांची वेदनादायक जाणीव शब्दबद्ध केली आहे .कवितेतून कवी नुसते वर्णन करत नाहीत तर हरवत चाललेल्या संस्कृतीसाठी एक हाक देतात. माझी आई ,माझी बोली आणि माझी भूमी यांचे रक्षण करण्याचे आवाहन कवितेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले गेले आहे. ही कविता फक्त भावनिक नाही तर विचार प्रवर्तकही आहे.स्लाईड -18(आधुनिकीकरण - चित्र संगणक , मोबाईल ,संगणक खेळताना पाहताना फोटो) भाषा ,संस्कृती ,माणुसकी)आधुनिकतेच्या प्रवाहात भाषा, संस्कृती आणि माणुसकी हरवण्याच्या संकटाचा वेध घेत ही कविता त्यांचे महत्त्व अधोरेखित करते.स्लाईड 19(संवाद चित्र )(संवाद - शब्द भाषा ,संवेदना माणुसकी)शब्द हे संवादाचे माध्यम आहे.मी शब्द वाचवतो.पण तेच आता हरवत चालले आहे.भाषा, संवेदना , माणुसकी आणि संस्कृती हरवत चालली आहे.मी संस्कृती वाचवतोय कारण तीच आपली ओळख आहे.मी माणुसकी वाचवतोय कारण तीच मला माणूस बनवते.स्लाईड 20कविता - मूल्य संवर्धन)ही कविता संपूर्ण जीवन मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देते.या कवितेतून कवी अनेक बाबी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.स्लाईड -21(वेगाने बदल वास्तव चित्रसमाज प्रबोधन)वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव चित्र प्रस्तुत कवितेतून कवीने रेखाटले आहे.ही कविता म्हणजे आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे वास्तव दर्शविणारा आरसा आहे तिच्या प्रत्येक ओळीत समाज प्रबोधनाचा विचार आहे.स्लाईड 22(जुने खेळ फोटो)(जुने व्यवसायजुने खेळ)समाजाचे वास्तव वेगाने बदलत चालले आहे .जुने व्यवसाय, जुने खेळ काळाच्या पडद्याआड गेले आहेत.ही कविता समाजातील बदलत्या परिस्थितीची जाणीव करून देते व वाचवण्याच्या प्रयत्नांची गरज दर्शविते. कवी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचवू इच्छितात .महानगरी जीवनावरील अस्तित्वाच्या अवकळेचे, भोवतालच्या सामाजिक स्थितीचे चित्रण कवी सतीश काळसेकर यांच्या कवितेत आहे .स्लाईड 23(साधना दिवाळी अंक)प्रस्तुत कविता साधना दिवाळी अंक 2005 या मासिकातून घेतली आहेस्लाईड 24(९.मी वाचवतोय - सतीश काळसेकर)आज आपण कवी सतीश काळसेकर यांच्या लेखणीने साकारलेली" मी वाचवतोय "ही संवेदनशील कविता वाचून समजून घेऊया.बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव शब्दात व्यक्त करताना कवी म्हणतात -स्लाईड 25आई मुल,गाय वासरू चित्र)हाकेतून हद्दपार होतेय आई हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई म्हणजेआई असे हाक आता ऐकू येत नाही .जणू ती सीमेबाहेर गेली आहे. गोठ्यातल्या गाई सुद्धा आता हंबरणे विसरल्या आहेत .त्या आता वासरासाठी हंबरत नाहीत.स्लाईड 26(किराणा दुकान ,भुसार दुकान ,सुपर मार्केट, मॉल फोटो)हरवत चाललाय किराणा आणि भुसार सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर.याचा अर्थमोठमोठे मॉल्स व सुपर मार्केट निर्माण झाल्यामुळे त्यांच्या झगमगाटी दुनियेत आता पूर्वीच्या किराणा व भुसाराची दुकाने हरवून जात आहेत.स्लाईड 27(लोहार भाता कुंभार आवा फोटो)लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा निघून चाललाय गावगाड्या सोबत मोकाट.म्हणजेपूर्वीच्या गावच्या संस्कृतीत असलेले जुने व्यावसायिक लोहार ,कुंभार नि त्यांचे भाते व चाके गावगाड्याबरोबरच निमुटपणे नाहीसे होत आहेत.लोहापासून लोखंडी वस्तू बनवतो त्या भट्टीला लोहाराचा भाता म्हणतात.कुंभार चाकावर मातीच्या वस्तू बनवतो त्याला आवा म्हणतात.स्लाईड 28(कल्हई भांडी , चुलीवरील पदार्थ ,गॅस वरील पदार्थ फोटो)कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली मागच्या धगीवर रटरटणारीआमटी राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवरयाचा अर्थपूर्वीच्या भांड्यांची कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली आहे .चुलीच्या जाळावर शिजत असलेली आमटी राखेसहित दूर गेली .आता ही आमटी गॅस शेगडीवर शिजत असलेली दिसते.स्लाईड 29 (विटी दांडू खेळ,लगोरी खेळ,आटया पाट्या , पिंगा खेळ ,परकर घातलेल्या मुली खेळ फोटो)बोला चालीतून निघून चाललीय माझ्या आईची बोली सुटीत आता खेळत नाहीत मुलं विटी दांडू आणि लगोऱ्या थांबून गेलाय त्यांचा दंगा. आट्यापाट्या आणि पिंगा परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ.म्हणजेसंभाषणातून -संवादातून हल्ली मातृभाषा म्हणजे आईची बोली निघून चालली आहे . आता मुले सुट्ट्यांमध्ये पूर्वीसारखी विटी दांडू व लगोरीचे खेळ खेळत नाहीत .त्यांचा गिल्ला आता थांबलाय. आता आट्या पाट्या किंवा पिंगा असले जुने खेळ नाहीसे झाले आहेत. परकर घालणाऱ्या लहान मुली आता पूर्वीचे मातीतले खेळ खेळताना दिसत नाहीत.स्लाईड 30( विद्यार्थी टी.व्ही.क्रिकेट पाहताना फोटो )पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम- थ्रिलरयाचा अर्थ आता मुले दूरदर्शनच्या चॅनेलवर क्रिकेटची मॅच पाहण्यात रमून जातात आणि गुन्हेगारी विश्वातील मालिका बघत असतात.स्लाईड 31(लिहिताना फोटो)लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते शब्द बापुडे केवळ वारा तसे विरून जातायत.म्हणजेआता कोणाकडूनही पूर्वीसारख्या गोष्टी लिहिल्या जात नाहीत .लिहिणाऱ्या हातांचा सराव थांबलाय .शब्द केविलवाणे होऊन फक्त वाऱ्यासारखे विरून जातात.स्लाईड 32(आईचे चित्र)मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत.याचा अर्थ अशा या बदलत्या भयानक वास्तवात मी माझी कविता सांभाळतोय आणि कविते सोबतच माझी आई ,माझी भाषा आणि माझी भूमी यांचा मी या आधुनिक वास्तवापासून बचाव करतो आहे.विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही कविता नक्कीच आवडली असेल.यामधून आपण आपल्या अनेक जुन्या चांगल्या गोष्टी वाचवूया आणि आपल्या संस्कृतीचे जतन करूया .या कवितेच्या पुढील भागात पुन्हा भेटूया.धन्यवाद.

स्लाईड 1 निसर्गचित्र नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कसे आहात? खूप आनंदी दिसतात .तुम्ही दररोज नवनवीन गोष्टी आनंदाने शिकत आहात.असेच आपण आज आनंदाने शिकणार आहोत. स्लाईड 2 (साहित्य  कविता  गीत) साहित्य, कविता आणि गीतांचा आपल्या जिवनावर मोठा प्रभाव असतो. स्लाईड 3 (कविता -  विचार करणे, समाजातील वास्तव, विविध संदेश) कविता ही केवळ शब्दांची जुळवा जुळव नसते तर ती मनाला विचार करायला भाग पाडते. कवितांच्या माध्यमातून कवी समाजातील वास्तव मांडतात विचार करायला लावतात आणि हृदयाला भिडणारे संदेश देतात. शब्द हे केवळ उच्चारले जात नाहीत तर ते काळजाला भिडतात. मराठी साहित्य विश्वात अनेक प्रतिभावान संवेदनशील कवी होऊन गेले. स्लाईड 4 (कवी - सतीश काळसेकर  नाव व फोटो) आज आपण अशाच एका संवेदनशील कवीची ओळख करून घेणार आहोत. ते म्हणजे "मी वाचवतोय " या कवितेचे कवी सतीश काळसेकर होय. स्लाईड 5 ( महाराष्ट्र नकाशात सिंधुदुर्ग दाखविणे) कवी सतीश काळसेकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील कळसे येथे १२ फेब्रुवारी १९४३ मध्ये  झाला. त्यांचे शालेय शिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यात  आणि महाविद्यालयी...

स्क्रिप्ट व्हिडियो निर्मिती

स्टार्स ( STARS)उपक्रमांतर्गत २५६० व्हिडिओ निर्मिती पटकथा लेखन ------------------------------------------- व्हिडिओ क्रमांक २० इयत्ता -  नववी  विषय - मराठी पाठ घटक क्रमांक -९  पाठाचे/ घटकाचे नाव - कविता क्रमांक (९)मी वाचवतोय  उपघटक /पाठ्यांश -१) कवीचा परिचय  २)कविता वाचन व काव्य प्रकारची ओळख.  वेळ -३५ मिनिट  शिक्षकाचे नाव - श्री .तुकाराम तुळशीराम अडसूळ  पदनाम -उपाध्यापक  शाळेचे नाव- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी तालुका -पाथर्डी जिल्हा- अहिल्यानगर  अध्ययन निष्पत्ती- १) गीते, समूहगीते ,कविता व त्यांची भाषणे व विविध साहित्य प्रकाराच्या ध्वनिफिती समज पूर्वक ऐकता येणे   २)गाणी, कविता, समूहगीते स्वरा घातासह म्हणता येणे. दिनदर्शिकेतील पाठ क्रमांक -९ निर्मिती कार्यालयाचे नाव -  जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर जिल्हा अहिल्यानगर पाठाचे स्वरूप -  विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित नसताना ,व्हिडिओ स्वरूपात  साहित्य -  स्मार्ट बोर्ड किंवा फळा , पी.पी.टी.स्लाईड, ईमेज चित्र /फोटो. ------------------------------------...

नवोपक्रम स्पर्धा निकाल 2024-25

महाराष्ट्र शासन  ------------------------------------- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आयोजित. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा --------------------------------------- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर जिल्हा अहिल्यानगर जिल्हास्तरीय निकाल  *२०२४ -२०२५* ---------------------------------------- *पारितोषिक विजेते* - प्राथमिक शिक्षक गट -  🏆प्रथम क्रमांक  - राज्यस्तर पात्र  *श्रीमती स्मिता सुधाकर धनवटे* (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी तालुका - अकोले) नवोपक्रम -  घेऊ स्पर्शाचे ज्ञान, राहू अन्यायापासून लांब | 🏆द्वितीय क्रमांक  - राज्यस्तर पात्र  *श्री.अभिजित राजेंद्र दळवी*  (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळगाव  तालुका - श्रीगोंदा )  नवोपक्रम -  मोबाईल बाबांचा,  अभ्यास माझा | 🏆तृतीय क्रमांक  - राज्यस्तर पात्र  *श्री.श्रीनिवास भूमराज एल्लाराम* (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठपिंपरी तालुका - अहिल्यानगर) नवोपक्रम - नवा व्यापार  🏆चतुर्थ क्रमांक  - राज्यस्तर पात्र  *श...

झाडे

🌸    झाडे   🌸 झाडे आपले सखे सोबती त्यांच्याशी आहे आपली नाती  समृद्ध जीवन देई मानवा झाडे लावा झाडे जगवा ,,,,,,|| १ || झाडे देती फळे फुले  जीवसृष्टी आनंदी डुले  झाडे देती औषध मानवा  झाडे लावा झाडे जगवा ,,,,,,||२|| पाखरे घेती जिथे निवारा  तीच फुलवती हवेत गारवा  झाडे देती पाऊस मानवा झाडे लावा झाडे जगवा ,,,,,|| ३  || कधी पडते उन्हाची काहिली  झाडे देतात मायेची सावली  झाडे  देती प्राणवायू मानवा  झाडे लावा झाडे जगवा ,,,,,,,,|| ४ || झाडांमुळे सुंदर सृष्टी  मानवास मिळे नवी दृष्टी  ध्यानी कायम असू दे मानवा झाडे लावा झाडे जगवा ,,,,,||५|| लेखक     श्री. तुकाराम तुळशीराम अडसूळ प्राथमिक शिक्षक  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी  ता.पाथर्डी जि. अहिल्यानगर मो.7588168948           मो .७५८८१६८९४८

ग्रंथालयाचा ध्यास धरी, वाचन संस्कृती विकसीत करी - जीवन शिक्षण

ग्रंथालयाचा ध्यास धरी ,वाचन संस्कृती विकसित करी. ------------------------------ ----------   आजच्या बदलत्या जगात विद्यार्थ्यांना आनंदाने यशस्वी जीवन जगायचे असेल तर  वाचनाचा छंद प्राथमिक शिक्षणात जोपासला गेला पाहिजे .वाचनाने समाजात वावरण्याचे ज्ञान मिळते.वाचनाने विद्यार्थ्यांचे मन एकाग्र होते.आपण कधीही एकटे नाही, पुस्तके आपले मित्र आहेत ही भावना विद्यार्थ्यांमध्ये  तयार होणे महत्त्वाचे होते. वाचनाने विद्यार्थ्यांच्या  बुद्धीचा विकास होत असतो. वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार होऊन योग्य परिवर्तन होते.संस्काराची शिदोरी वाचनाने मिळते. उदा-श्यामची आई ही कादंबरी वाचल्यावर विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार होतात. ही कादंबरी वाचताना विद्यार्थी तसेच इतर व्यक्ती  भावनिक होतात. विविध मूल्य विद्यार्थ्यांमध्ये  रुजली जातात.अशा  विविध प्रकारच्या बोधकथा वाचनाने विद्यार्थ्यांना जीवनातील व्यवहारज्ञान समजते.तसेच जीवनातील ताणतणाव कमी होऊन   विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य विकसित होते.विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते.नवनवीन गोष्टी शिकायला मिळून जीवन...

E Book माहिती

*इयत्ता पहिली ते बारावी  बालभारती पाठ्यपुस्तक* https://books.ebalbharati.in/  *इयत्ता पहिली ते बारावी एनसीईआरटी पाठ्यपुस्तक*  https://ncert.nic.in/textbook.php *राज्य अभ्यासक्रम आराखाडा - शालेय शिक्षण*  https://www.maa.ac.in/index.php?tcf=shaley_shikshan_2024 *राज्य अभ्यासक्रम आराखडा - पायाभूत स्तर*  https://www.maa.ac.in/documents/SCF%20_FS_Final.pdf *समग्र प्रगती कार्ड (HPC) स्तरनिहाय* *पायाभूत स्तर -* https://ncert.nic.in/parakh/pdf/HPC_foundational.pdf *पूर्वतयारी स्तर -* https://ncert.nic.in/parakh/pdf/HPC_Preparatory.pdf *पूर्व माध्यमिक स्तर* Middle stage  https://ncert.nic.in/parakh/pdf/HPC_middle.pdf *सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शासन निर्णय (CCE) -20 ऑगस्ट 2020* *अभ्यासक्रम व पाठ्यक्रम पायाभूत स्तर* https://www.maa.ac.in/documents/SCERT_Payabhut_Shikshan_Abhyaskram_Arakhada_2024.pdf

पोलीस स्टेशन भेट व माहिती

आपण पोलीस म्हटले की आपण  घाबरतो. आपल्या पाठ्यपुस्तकात पोलीस जनतेचा मित्र आहे.हे विद्यार्थी अभ्यासतात. परंतु प्रत्यक्ष जीवन जगत असताना पोलीस जनतेचा मित्र कसा आहे.हे प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला भेट देऊन त्याबाबत माहिती घेऊन अनुभवले. पोलिसांनी सर्व प्रकारची माहिती विद्यार्थ्यांना दिली.त्यामुळे पोलिस जनतेचा मित्र आहे.हे विद्यार्थ्याना प्रत्यक्ष अनुभवातून समजले. हा उपक्रम सुट्टीच्या दिवशी रविवारी राबविला होता.

विजयदुर्ग किल्ला माहिती

 कोकणपट्टीला विस्तृत असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. अरबी समुद्राच्या सानिध्यात असलेल्या या सागर किनाऱ्यावर पूर्वीपासूनच अनेक किल्ले उभारले गेले होते. साधारणपणे शिलाहार राजांच्या काळापासूनच या भागात किल्ल्यांची उभारणी झालेली होती.. याचा इतिहास साक्षीदार आहे. असाच एक खूप बुलंद आणि काळाचे घाव सोसत उभा राहिलेला प्रबळ किल्ला म्हणजेच *विजयदुर्ग उर्फ घेरिया* हा किल्ला होय. त्या काळी मात्र म्हणजे बाराव्या शतकात हा पूर्णपणे चारही बाजूने पाण्याने वेढलेला होता. त्यामुळे तो जलदुर्ग होता. सध्या मात्र याला पूर्णपणे जलदुर्ग म्हणता येत नाही. याचे कारण याच्या तीन बाजूंना समुद्र आणि एका बाजूला जमीन आहे.  बालपणी दोनदा आणि मोठेपणी तीन वेळा हा किल्ला माझ्या पाहण्यात आला. मुख्य म्हणजे या किल्ल्यावर पद भ्रमण करणे म्हणजे एक नितांतसुंदर अनुभव...!!! बाजूला अथांग समुद्र, त्याच्या उसळणाऱ्या लाटा आणि  आपण तटबंदीवरून चालत जाताना खरोखरच एक प्रचंड विश्वास विस्मयकारक असा अनुभव हा किल्ला आपल्याला देऊन जातो. खरे तर विजयदुर्ग हे नावच पुरेसे आहे. जो किल्ला विजय देऊन जातो तोच विजयदुर्ग..!!!  आपल्याला कोल्...

उन्हाळ्याच्या सुट्टीत ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी नवोपक्रम

वृक्षारोपणाचे महत्त्व  -----------------------------  "झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे "असे आपण ऐकले असेल.या वाक्यातून आपल्याला वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित होते .पर्यावरण संवर्धनात वृक्षारोपण अतिशय महत्त्वाचे आहे .झाडांपासून आपल्याला फुले फळे, सावली असे अनेक उपयोग होतात परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो .या ऑक्सिजनलाच प्राणवायू म्हणतात . झाडामुळे आपले अस्तित्व आहे. झाड आपल्याला जीवन जगण्यासाठी आयुष्यभर मोफत प्राणवायू देण्याचे महत्त्वाचे काम करत असते. या ऑक्सिजनचे महत्त्व आपल्याला दवाखान्यात गेल्यावर समजते परंतु जे झाड आपल्याला आयुष्यभर मोफतऑक्सिजन देते त्याचे महत्त्व आपल्याला समजले पाहिजे. कोरोनाकाळात अनेक माणसांना ऑक्सिजन अभावी आपले प्राण गमवावे लागले हे आपल्याला माहिती आहे. यासाठी झाडे वाढविणे गरजेचे आहे आणि झाडे वाढविण्यासाठी वृक्षारोपण  काळाची गरज आहे. जगातील सर्व संपत्ती एकत्र केली तरी  आपण ऑक्सिजन निर्माण करू शकत नाही किंवा विकत घेऊ शकत नाही .हा ऑक्सिजन निर्माण करण्याचे महत्वाचे काम फक्त झाडच करू शकते. पर्यावरण संवर्धन ही एक जाग...

पर्यावरणीय शिक्षणाचे महत्व

वृक्षारोपणाचे महत्त्व  -----------------------------  "झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे "असे आपण ऐकले असेल.या वाक्यातून आपल्याला वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित होते .पर्यावरण संवर्धनात वृक्षारोपण अतिशय महत्त्वाचे आहे .झाडांपासून आपल्याला फुले फळे, सावली असे अनेक उपयोग होतात परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो .या ऑक्सिजनलाच प्राणवायू म्हणतात . झाडामुळे आपले अस्तित्व आहे. झाड आपल्याला जीवन जगण्यासाठी आयुष्यभर मोफत प्राणवायू देण्याचे महत्त्वाचे काम करत असते. या ऑक्सिजनचे महत्त्व आपल्याला दवाखान्यात गेल्यावर समजते परंतु जे झाड आपल्याला आयुष्यभर मोफतऑक्सिजन देते त्याचे महत्त्व आपल्याला समजले पाहिजे. कोरोनाकाळात अनेक माणसांना ऑक्सिजन अभावी आपले प्राण गमवावे लागले हे आपल्याला माहिती आहे. यासाठी झाडे वाढविणे गरजेचे आहे आणि झाडे वाढविण्यासाठी वृक्षारोपण  काळाची गरज आहे. जगातील सर्व संपत्ती एकत्र केली तरी  आपण ऑक्सिजन निर्माण करू शकत नाही किंवा विकत घेऊ शकत नाही .हा ऑक्सिजन निर्माण करण्याचे महत्वाचे काम फक्त झाडच करू शकते. पर्यावरण संवर्धन ही एक जाग...

वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन काळाची गरज

वृक्षारोपणाचे महत्त्व  -----------------------------  "झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे "असे आपण ऐकले असेल.या वाक्यातून आपल्याला वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित होते .पर्यावरण संवर्धनात वृक्षारोपण अतिशय महत्त्वाचे आहे .झाडांपासून आपल्याला फुले फळे, सावली असे अनेक उपयोग होतात परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो .या ऑक्सिजनलाच प्राणवायू म्हणतात . झाडामुळे आपले अस्तित्व आहे. झाड आपल्याला जीवन जगण्यासाठी आयुष्यभर मोफत प्राणवायू देण्याचे महत्त्वाचे काम करत असते. या ऑक्सिजनचे महत्त्व आपल्याला दवाखान्यात गेल्यावर समजते परंतु जे झाड आपल्याला आयुष्यभर मोफतऑक्सिजन देते त्याचे महत्त्व आपल्याला समजले पाहिजे. कोरोनाकाळात अनेक माणसांना ऑक्सिजन अभावी आपले प्राण गमवावे लागले हे आपल्याला माहिती आहे. यासाठी झाडे वाढविणे गरजेचे आहे आणि झाडे वाढविण्यासाठी वृक्षारोपण  काळाची गरज आहे. जगातील सर्व संपत्ती एकत्र केली तरी  आपण ऑक्सिजन निर्माण करू शकत नाही किंवा विकत घेऊ शकत नाही .हा ऑक्सिजन निर्माण करण्याचे महत्वाचे काम फक्त झाडच करू शकते. पर्यावरण संवर्धन ही एक जाग...

लेखिका विद्यार्थ्यांच्या भेटीला

इयत्ता चौथी मधील  विषय मराठी पाठ पंधरावा आनंदाचे झाड. या पाठाच्या लेखिका आदरणीय लीलाताई शिंदे विद्यार्थ्यांच्या भेटीला या उपक्रमांतर्गत आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी  लीलाताई शिंदे यांनी विविध बाबींवर संवाद साधून विद्यार्थ्यांशी चर्चा केली होती. पर्यावरणात वृक्षसंवर्धन खूप महत्वाचे आहे.त्यात शेवग्याचे झाड आपल्या आहारात असणे गरजेचे आहे.त्यासाठी आपण सर्वांनी हे झाड लावले पाहिजे.काही लोक या झाडाबद्दल वेगळे मत व्यक्त करतात.परंतु लेखिका आदरणीय लीलाताई शिंदे यांनी या पाठात शेवग्याच्या झाडास आनंदाचे झाड म्हटले आहे.यामुळे विविध पक्षी या झाडावर येतात. एका रविवारी आम्ही ही मुलाखत घेतली होती.  ज्येष्ठ लेखिका आदरणीय लीलाताई शिंदे या पर्यावरण प्रेमी आहेत. तसेच ताई बालस्नेही आहेत. त्या आपल्या ग्रुपमध्ये आहेत. ताईंच्या कार्याबद्दल विशेष अभिनंदन. 👍👍👍👍👍

भारताचा एक महान सुपुत्र डॉ किशोर गोरे

अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांचे वयाच्या 100 व्या वर्षी नुकतेच निधन झाले. एक अभिमानाची बाब आमच्या अहील्यानगर जिल्ह्यातील डॉ.किशोर दादा गोरे हे अमेरिकेत राहून भारतमातेची सेवा करतात.जिमी कार्टर हे अमेरिकेचे अध्यक्ष असताना डॉ.किशोर गोरे यांच्या एका प्रोजेक्टला भेट देऊन अभिनंदन केले होते. अमेरिकेचे अध्यक्ष एका भारतीय युवकाचे अभिनंदन करतात ही खूप मोठी अभिमानाची बाब आहे. डॉ.किशोर गोरे हे आम्हाला नेहमी शाळेत कोणते उपक्रम घेतले पाहिजेत यासाठी मार्गदर्शन करून मदत करतात. दादा आपल्या कार्याबद्दल खूप खूप अभिमान वाटतो