स्लाईड 1निसर्गचित्रनमस्ते विद्यार्थी मित्रांनो कसे आहात?खूप आनंदी दिसतात .तुम्ही दररोज नवनवीन गोष्टी आनंदाने शिकत आहात.असेच आपण आज आनंदाने शिकणार आहोत.स्लाईड 2(साहित्य कविता गीत)साहित्य, कविता आणि गीतांचा आपल्या जिवनावर मोठा प्रभाव असतो.स्लाईड 3(कविता - विचार करणे,समाजातील वास्तव,विविध संदेश)कविता ही केवळ शब्दांची जुळवा जुळव नसते तर ती मनाला विचार करायला भाग पाडते.कवितांच्या माध्यमातून कवी समाजातील वास्तव मांडतात विचार करायला लावतात आणि हृदयाला भिडणारे संदेश देतात.शब्द हे केवळ उच्चारले जात नाहीत तर ते काळजाला भिडतात.मराठी साहित्य विश्वात अनेक प्रतिभावान संवेदनशील कवी होऊन गेले.स्लाईड 4(कवी - सतीश काळसेकर नाव व फोटो)आज आपण अशाच एका संवेदनशील कवीची ओळख करून घेणार आहोत.ते म्हणजे "मी वाचवतोय " या कवितेचे कवी सतीश काळसेकर होय.स्लाईड 5( महाराष्ट्र नकाशात सिंधुदुर्ग दाखविणे)कवी सतीश काळसेकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील कळसे येथे १२ फेब्रुवारी १९४३ मध्ये झाला.त्यांचे शालेय शिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले.स्लाईड 6(सतीश काळसेकर लेखन करताना फोटो )सतीश काळसेकर हे मराठी साहित्य विश्वातील महत्त्वाचे कवी ,लेखक व विचारवंत होते.इंद्रियोपनिषद ,साक्षात ,विलंबित हे त्यांचे कवितासंग्रह आहेत.त्यांच्या कवितांमध्ये समाजाच्या वास्तवाचे प्रतिबिंब दिसते.' कविता लेनिसाठी ' या लेनिनवरच्या जगभरातील कवितांच्या अनुवादांच्या संग्रहाचे त्यांनी संपादन केले .स्लाईड 7(विविध पुस्तके ग्रंथालय फोटो)'तात्पर्य ' ' मागोवा ' 'लोकवाङ्मय ' या नियतकालिकांच्या संपादनात त्यांचा सहभाग होता.त्यांच्याकडे विविध पुस्तके , वृत्तपत्रे, नियतकालिके यांचा प्रचंड साठा होता.स्लाईड 8(महाराष्ट्र नकाशात रायगड मध्ये पेण दाखवणे)मुंबई येथे पुस्तकांसाठी घर कमी पडले म्हणून ते रायगड जिल्ह्यातील पेन येथे निसर्गाच्या सानिध्यात पुस्तकांसाठी घर बांधून राहू लागले. स्लाईड 9(कवी लेखन करताना फोटो)त्यांचे लेखन हे समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे आहे.कवी सतीश काळसेकर हे परिवर्तनवादी विचाराचे कवी होते .स्लाईड 10(वाचन लेखन महत्व)(ग्रंथालय ,वाचताना फोटो)ज्ञानाच्या अमर्याद कक्षा वाढविण्यासाठी पुस्तकाची गरज असते. माझे घर पुस्तकांनी भरलेले आहे.आपल्या जीवनात वाचन - लेखन खूप महत्त्वाचे आहे.आपण प्रकट होण्यासाठी वाचन केले पाहिजे.वाचन केल्याशिवाय चांगले भाषण व लेखन येत नाही.माझ्याकडे पुस्तके वाचायला वेळ नाही असे म्हणू नका यासाठी कोणतीही सबब सांगू नका.ज्या दिवशी माझे वाचन थांबेल त्या दिवशी माझा श्वास थांबेल असे ते वेळोवेळी म्हणायचे.स्लाईड 11(लेखन करताना फोटो)(लेखन - वास्तव ,परिवर्तनवादी)त्यांचे लेखन समाजातील वास्तव दाखवणारे आणि परिवर्तनवादी विचार मांडणारे आहे.स्लाईड 12(कविता -वास्तव बदलण्याचे सामर्थ्य,सामाजिक संदेश )सतीश काळसेकर यांची कविता केवळ शब्दांचा खेळ नसतो ते वास्तव बदलण्याचं सामर्थ्य बाळगते.त्यांच्या कवितेत सामाजिक संदेश आहे.स्लाईड 13(कविता वाचन फोटो.)(कविता वाचून समजून घेणे ,मार्ग दाखवणे) त्यांची कविता फक्त वाचण्याची नाही तर समजून घेण्याची आणि कृतीत आणणे महत्त्वाचे आहे.त्यांच्या शब्दांचा प्रकाश आपल्याला नेहमी मार्ग दाखवत राहील.त्यांच्या कवितांमध्ये समाजाच्या वास्तवाचे प्रतिबिंब दिसते.स्लाईड 14(ग्रंथालय व कवी फोटो)त्याच्या पुस्तकांनी मराठी साहित्य समृद्ध केले.स्लाईड 15(वाचनाऱ्याची रोजनिशी - पुरस्कार ,गाजलेल्या पुस्तकांचा परिचय "वाचणाऱ्याची रोजनिशी " या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.वाचणाऱ्यांची रोजनिशीतून त्यांनी जगभरातील गाजलेल्या पुस्तकांचा परिचय करून दिला.त्यांनी देश विदेशातील अनेक महत्त्वाच्या कवींचा मराठी वाचकांना परिचय करून दिला.स्लाईड 16(विविध पुरस्कार नावे)तसेच त्यांना सोवियत लँड नेहरू पुरस्कार, लालजी पेंडसे पुरस्कार, बहिणाबाई पुरस्कार ,कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, महाराष्ट्र शासन पुरस्कार ,कैफी आजमी पुरस्कार ,महाराष्ट्र शासनाचा कृष्णराव भालेकर पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार असे अनेक मिळाले.स्लाईड 17(९.मी वाचवतोय )(सामाजिक बदल ,(हरवणाऱ्या परंपरा ,जीवनशैलीवर ताण,माझी आई,माझी भाषा ,माझी भूमी ,संस्कृती वाचवणे)"मी वाचवतोय" ही कविता सामाजिक बदलांची प्रतिबिंब आहे .कवीने हरवणाऱ्या परंपरा , बोलीभाषा ,मातीशी असलेले नाते आणि जीवनशैलीवर होणारा ताण यांची वेदनादायक जाणीव शब्दबद्ध केली आहे .कवितेतून कवी नुसते वर्णन करत नाहीत तर हरवत चाललेल्या संस्कृतीसाठी एक हाक देतात. माझी आई ,माझी बोली आणि माझी भूमी यांचे रक्षण करण्याचे आवाहन कवितेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले गेले आहे. ही कविता फक्त भावनिक नाही तर विचार प्रवर्तकही आहे.स्लाईड -18(आधुनिकीकरण - चित्र संगणक , मोबाईल ,संगणक खेळताना पाहताना फोटो) भाषा ,संस्कृती ,माणुसकी)आधुनिकतेच्या प्रवाहात भाषा, संस्कृती आणि माणुसकी हरवण्याच्या संकटाचा वेध घेत ही कविता त्यांचे महत्त्व अधोरेखित करते.स्लाईड 19(संवाद चित्र )(संवाद - शब्द भाषा ,संवेदना माणुसकी)शब्द हे संवादाचे माध्यम आहे.मी शब्द वाचवतो.पण तेच आता हरवत चालले आहे.भाषा, संवेदना , माणुसकी आणि संस्कृती हरवत चालली आहे.मी संस्कृती वाचवतोय कारण तीच आपली ओळख आहे.मी माणुसकी वाचवतोय कारण तीच मला माणूस बनवते.स्लाईड 20कविता - मूल्य संवर्धन)ही कविता संपूर्ण जीवन मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देते.या कवितेतून कवी अनेक बाबी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.स्लाईड -21(वेगाने बदल वास्तव चित्रसमाज प्रबोधन)वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव चित्र प्रस्तुत कवितेतून कवीने रेखाटले आहे.ही कविता म्हणजे आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे वास्तव दर्शविणारा आरसा आहे तिच्या प्रत्येक ओळीत समाज प्रबोधनाचा विचार आहे.स्लाईड 22(जुने खेळ फोटो)(जुने व्यवसायजुने खेळ)समाजाचे वास्तव वेगाने बदलत चालले आहे .जुने व्यवसाय, जुने खेळ काळाच्या पडद्याआड गेले आहेत.ही कविता समाजातील बदलत्या परिस्थितीची जाणीव करून देते व वाचवण्याच्या प्रयत्नांची गरज दर्शविते. कवी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचवू इच्छितात .महानगरी जीवनावरील अस्तित्वाच्या अवकळेचे, भोवतालच्या सामाजिक स्थितीचे चित्रण कवी सतीश काळसेकर यांच्या कवितेत आहे .स्लाईड 23(साधना दिवाळी अंक)प्रस्तुत कविता साधना दिवाळी अंक 2005 या मासिकातून घेतली आहेस्लाईड 24(९.मी वाचवतोय - सतीश काळसेकर)आज आपण कवी सतीश काळसेकर यांच्या लेखणीने साकारलेली" मी वाचवतोय "ही संवेदनशील कविता वाचून समजून घेऊया.बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव शब्दात व्यक्त करताना कवी म्हणतात -स्लाईड 25आई मुल,गाय वासरू चित्र)हाकेतून हद्दपार होतेय आई हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई म्हणजेआई असे हाक आता ऐकू येत नाही .जणू ती सीमेबाहेर गेली आहे. गोठ्यातल्या गाई सुद्धा आता हंबरणे विसरल्या आहेत .त्या आता वासरासाठी हंबरत नाहीत.स्लाईड 26(किराणा दुकान ,भुसार दुकान ,सुपर मार्केट, मॉल फोटो)हरवत चाललाय किराणा आणि भुसार सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर.याचा अर्थमोठमोठे मॉल्स व सुपर मार्केट निर्माण झाल्यामुळे त्यांच्या झगमगाटी दुनियेत आता पूर्वीच्या किराणा व भुसाराची दुकाने हरवून जात आहेत.स्लाईड 27(लोहार भाता कुंभार आवा फोटो)लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा निघून चाललाय गावगाड्या सोबत मोकाट.म्हणजेपूर्वीच्या गावच्या संस्कृतीत असलेले जुने व्यावसायिक लोहार ,कुंभार नि त्यांचे भाते व चाके गावगाड्याबरोबरच निमुटपणे नाहीसे होत आहेत.लोहापासून लोखंडी वस्तू बनवतो त्या भट्टीला लोहाराचा भाता म्हणतात.कुंभार चाकावर मातीच्या वस्तू बनवतो त्याला आवा म्हणतात.स्लाईड 28(कल्हई भांडी , चुलीवरील पदार्थ ,गॅस वरील पदार्थ फोटो)कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली मागच्या धगीवर रटरटणारीआमटी राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवरयाचा अर्थपूर्वीच्या भांड्यांची कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली आहे .चुलीच्या जाळावर शिजत असलेली आमटी राखेसहित दूर गेली .आता ही आमटी गॅस शेगडीवर शिजत असलेली दिसते.स्लाईड 29 (विटी दांडू खेळ,लगोरी खेळ,आटया पाट्या , पिंगा खेळ ,परकर घातलेल्या मुली खेळ फोटो)बोला चालीतून निघून चाललीय माझ्या आईची बोली सुटीत आता खेळत नाहीत मुलं विटी दांडू आणि लगोऱ्या थांबून गेलाय त्यांचा दंगा. आट्यापाट्या आणि पिंगा परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ.म्हणजेसंभाषणातून -संवादातून हल्ली मातृभाषा म्हणजे आईची बोली निघून चालली आहे . आता मुले सुट्ट्यांमध्ये पूर्वीसारखी विटी दांडू व लगोरीचे खेळ खेळत नाहीत .त्यांचा गिल्ला आता थांबलाय. आता आट्या पाट्या किंवा पिंगा असले जुने खेळ नाहीसे झाले आहेत. परकर घालणाऱ्या लहान मुली आता पूर्वीचे मातीतले खेळ खेळताना दिसत नाहीत.स्लाईड 30( विद्यार्थी टी.व्ही.क्रिकेट पाहताना फोटो )पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम- थ्रिलरयाचा अर्थ आता मुले दूरदर्शनच्या चॅनेलवर क्रिकेटची मॅच पाहण्यात रमून जातात आणि गुन्हेगारी विश्वातील मालिका बघत असतात.स्लाईड 31(लिहिताना फोटो)लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते शब्द बापुडे केवळ वारा तसे विरून जातायत.म्हणजेआता कोणाकडूनही पूर्वीसारख्या गोष्टी लिहिल्या जात नाहीत .लिहिणाऱ्या हातांचा सराव थांबलाय .शब्द केविलवाणे होऊन फक्त वाऱ्यासारखे विरून जातात.स्लाईड 32(आईचे चित्र)मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत.याचा अर्थ अशा या बदलत्या भयानक वास्तवात मी माझी कविता सांभाळतोय आणि कविते सोबतच माझी आई ,माझी भाषा आणि माझी भूमी यांचा मी या आधुनिक वास्तवापासून बचाव करतो आहे.विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही कविता नक्कीच आवडली असेल.यामधून आपण आपल्या अनेक जुन्या चांगल्या गोष्टी वाचवूया आणि आपल्या संस्कृतीचे जतन करूया .या कवितेच्या पुढील भागात पुन्हा भेटूया.धन्यवाद.
स्लाईड 1
निसर्गचित्र
नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कसे आहात?
खूप आनंदी दिसतात .तुम्ही दररोज नवनवीन गोष्टी आनंदाने शिकत आहात.असेच आपण आज आनंदाने शिकणार आहोत.
स्लाईड 2
(साहित्य
कविता
गीत)
साहित्य, कविता आणि गीतांचा आपल्या जिवनावर मोठा प्रभाव असतो.
स्लाईड 3
(कविता - विचार करणे,
समाजातील वास्तव,
विविध संदेश)
कविता ही केवळ शब्दांची जुळवा जुळव नसते तर ती मनाला विचार करायला भाग पाडते.
कवितांच्या माध्यमातून कवी समाजातील वास्तव मांडतात विचार करायला लावतात आणि हृदयाला भिडणारे संदेश देतात.
शब्द हे केवळ उच्चारले जात नाहीत तर ते काळजाला भिडतात.
मराठी साहित्य विश्वात अनेक प्रतिभावान संवेदनशील कवी होऊन गेले.
स्लाईड 4
(कवी - सतीश काळसेकर
नाव व फोटो)
आज आपण अशाच एका संवेदनशील कवीची ओळख करून घेणार आहोत.
ते म्हणजे "मी वाचवतोय " या कवितेचे कवी सतीश काळसेकर होय.
स्लाईड 5
( महाराष्ट्र नकाशात सिंधुदुर्ग दाखविणे)
कवी सतीश काळसेकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील कळसे येथे १२ फेब्रुवारी १९४३ मध्ये झाला.
त्यांचे शालेय शिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले.
स्लाईड 6
(सतीश काळसेकर लेखन करताना फोटो )
सतीश काळसेकर हे मराठी साहित्य विश्वातील महत्त्वाचे कवी ,लेखक व विचारवंत होते.
इंद्रियोपनिषद ,साक्षात ,विलंबित हे त्यांचे कवितासंग्रह आहेत.
त्यांच्या कवितांमध्ये समाजाच्या वास्तवाचे प्रतिबिंब दिसते.
' कविता लेनिसाठी ' या
लेनिनवरच्या जगभरातील कवितांच्या अनुवादांच्या संग्रहाचे त्यांनी संपादन केले .
स्लाईड 7
(विविध पुस्तके ग्रंथालय फोटो)
'तात्पर्य ' ' मागोवा ' 'लोकवाङ्मय ' या नियतकालिकांच्या संपादनात त्यांचा सहभाग होता.
त्यांच्याकडे विविध पुस्तके , वृत्तपत्रे, नियतकालिके यांचा प्रचंड साठा होता.
स्लाईड 8
(महाराष्ट्र नकाशात रायगड मध्ये पेण दाखवणे)
मुंबई येथे पुस्तकांसाठी घर कमी पडले म्हणून ते रायगड जिल्ह्यातील पेन येथे निसर्गाच्या सानिध्यात पुस्तकांसाठी घर बांधून राहू लागले.
स्लाईड 9
(कवी लेखन करताना फोटो)
त्यांचे लेखन हे समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे आहे.
कवी सतीश काळसेकर हे परिवर्तनवादी विचाराचे कवी होते .
स्लाईड 10
(वाचन लेखन महत्व)
(ग्रंथालय ,वाचताना फोटो)
ज्ञानाच्या अमर्याद कक्षा वाढविण्यासाठी पुस्तकाची गरज असते.
माझे घर पुस्तकांनी भरलेले आहे.
आपल्या जीवनात वाचन - लेखन खूप महत्त्वाचे आहे.
आपण प्रकट होण्यासाठी वाचन केले पाहिजे.
वाचन केल्याशिवाय चांगले भाषण व लेखन येत नाही.
माझ्याकडे पुस्तके वाचायला वेळ नाही असे म्हणू नका
यासाठी कोणतीही सबब सांगू नका.
ज्या दिवशी माझे वाचन थांबेल त्या दिवशी माझा श्वास थांबेल असे ते वेळोवेळी म्हणायचे.
स्लाईड 11
(लेखन करताना फोटो)
(लेखन - वास्तव ,परिवर्तनवादी)
त्यांचे लेखन समाजातील वास्तव दाखवणारे आणि परिवर्तनवादी विचार मांडणारे आहे.
स्लाईड 12
(कविता -वास्तव बदलण्याचे सामर्थ्य,
सामाजिक संदेश )
सतीश काळसेकर यांची कविता केवळ शब्दांचा खेळ नसतो ते वास्तव बदलण्याचं सामर्थ्य बाळगते.
त्यांच्या कवितेत सामाजिक संदेश आहे.
स्लाईड 13
(कविता वाचन फोटो.)
(कविता वाचून समजून घेणे ,
मार्ग दाखवणे)
त्यांची कविता फक्त वाचण्याची नाही तर समजून घेण्याची आणि कृतीत आणणे महत्त्वाचे आहे.
त्यांच्या शब्दांचा प्रकाश आपल्याला नेहमी मार्ग दाखवत राहील.
त्यांच्या कवितांमध्ये समाजाच्या वास्तवाचे प्रतिबिंब दिसते.
स्लाईड 14
(ग्रंथालय व कवी फोटो)
त्याच्या पुस्तकांनी मराठी साहित्य समृद्ध केले.
स्लाईड 15
(वाचनाऱ्याची रोजनिशी - पुरस्कार ,
गाजलेल्या पुस्तकांचा परिचय
"वाचणाऱ्याची रोजनिशी " या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
वाचणाऱ्यांची रोजनिशीतून त्यांनी जगभरातील गाजलेल्या पुस्तकांचा परिचय करून दिला.
त्यांनी देश विदेशातील अनेक महत्त्वाच्या कवींचा मराठी वाचकांना परिचय करून दिला.
स्लाईड 16
(विविध पुरस्कार नावे)
तसेच त्यांना
सोवियत लँड नेहरू पुरस्कार, लालजी पेंडसे पुरस्कार, बहिणाबाई पुरस्कार ,
कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, महाराष्ट्र शासन पुरस्कार ,
कैफी आजमी पुरस्कार ,
महाराष्ट्र शासनाचा कृष्णराव भालेकर पुरस्कार,
आचार्य अत्रे पुरस्कार असे अनेक मिळाले.
स्लाईड 17
(९.मी वाचवतोय )
(सामाजिक बदल ,
(हरवणाऱ्या परंपरा ,
जीवनशैलीवर ताण,
माझी आई,
माझी भाषा ,
माझी भूमी ,
संस्कृती वाचवणे)
"मी वाचवतोय" ही कविता सामाजिक बदलांची प्रतिबिंब आहे .कवीने हरवणाऱ्या परंपरा , बोलीभाषा ,मातीशी असलेले नाते आणि जीवनशैलीवर होणारा ताण यांची वेदनादायक जाणीव शब्दबद्ध केली आहे .कवितेतून कवी नुसते वर्णन करत नाहीत तर हरवत चाललेल्या संस्कृतीसाठी एक हाक देतात. माझी आई ,माझी बोली आणि माझी भूमी यांचे रक्षण करण्याचे आवाहन कवितेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले गेले आहे. ही कविता फक्त भावनिक नाही तर विचार प्रवर्तकही आहे.
स्लाईड -18
(आधुनिकीकरण - चित्र संगणक , मोबाईल ,संगणक खेळताना पाहताना फोटो)
भाषा ,संस्कृती ,माणुसकी)
आधुनिकतेच्या प्रवाहात भाषा, संस्कृती आणि माणुसकी हरवण्याच्या संकटाचा वेध घेत ही कविता त्यांचे महत्त्व अधोरेखित करते.
स्लाईड 19
(संवाद चित्र )
(संवाद - शब्द
भाषा ,
संवेदना
माणुसकी)
शब्द हे संवादाचे माध्यम आहे.
मी शब्द वाचवतो.
पण तेच आता हरवत चालले आहे.
भाषा, संवेदना , माणुसकी आणि संस्कृती हरवत चालली आहे.
मी संस्कृती वाचवतोय कारण तीच आपली ओळख आहे.
मी माणुसकी वाचवतोय कारण तीच मला माणूस बनवते.
स्लाईड 20
कविता - मूल्य संवर्धन)
ही कविता संपूर्ण जीवन मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देते.
या कवितेतून
कवी अनेक बाबी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.
स्लाईड -21
(वेगाने बदल
वास्तव चित्र
समाज प्रबोधन)
वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव चित्र प्रस्तुत कवितेतून कवीने रेखाटले आहे.
ही कविता म्हणजे आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे वास्तव दर्शविणारा आरसा आहे तिच्या प्रत्येक ओळीत समाज प्रबोधनाचा विचार आहे.
स्लाईड 22
(जुने खेळ फोटो)
(जुने व्यवसाय
जुने खेळ)
समाजाचे वास्तव वेगाने बदलत चालले आहे .
जुने व्यवसाय, जुने खेळ काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
ही कविता समाजातील बदलत्या परिस्थितीची जाणीव करून देते व वाचवण्याच्या प्रयत्नांची गरज दर्शविते.
कवी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचवू इच्छितात .
महानगरी जीवनावरील अस्तित्वाच्या अवकळेचे, भोवतालच्या सामाजिक स्थितीचे चित्रण कवी सतीश काळसेकर यांच्या कवितेत आहे .
स्लाईड 23
(साधना दिवाळी अंक)
प्रस्तुत कविता साधना दिवाळी अंक 2005 या मासिकातून घेतली आहे
स्लाईड 24
(९.मी वाचवतोय
- सतीश काळसेकर)
आज आपण कवी सतीश काळसेकर यांच्या लेखणीने साकारलेली" मी वाचवतोय "ही संवेदनशील कविता वाचून समजून घेऊया.
बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव शब्दात व्यक्त करताना कवी म्हणतात -
स्लाईड 25
आई मुल,गाय वासरू चित्र)
हाकेतून हद्दपार होतेय आई हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई
म्हणजे
आई असे हाक आता ऐकू येत नाही .
जणू ती सीमेबाहेर गेली आहे. गोठ्यातल्या गाई सुद्धा आता हंबरणे विसरल्या आहेत .
त्या आता वासरासाठी हंबरत नाहीत.
स्लाईड 26
(किराणा दुकान ,
भुसार दुकान ,सुपर मार्केट, मॉल फोटो)
हरवत चाललाय किराणा आणि भुसार
सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर.
याचा अर्थ
मोठमोठे मॉल्स व सुपर मार्केट निर्माण झाल्यामुळे त्यांच्या झगमगाटी दुनियेत आता पूर्वीच्या किराणा व भुसाराची दुकाने हरवून जात आहेत.
स्लाईड 27
(लोहार भाता कुंभार आवा फोटो)
लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा
निघून चाललाय गावगाड्या सोबत मोकाट.
म्हणजे
पूर्वीच्या गावच्या संस्कृतीत असलेले जुने व्यावसायिक लोहार ,कुंभार नि त्यांचे भाते व चाके गावगाड्याबरोबरच निमुटपणे नाहीसे होत आहेत.
लोहापासून लोखंडी वस्तू बनवतो त्या भट्टीला लोहाराचा भाता म्हणतात.
कुंभार चाकावर मातीच्या वस्तू बनवतो त्याला आवा म्हणतात.
स्लाईड 28
(कल्हई भांडी , चुलीवरील पदार्थ ,गॅस वरील पदार्थ फोटो)
कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली
मागच्या धगीवर रटरटणारीआमटी
राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर
याचा अर्थ
पूर्वीच्या भांड्यांची कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली आहे .
चुलीच्या जाळावर शिजत असलेली आमटी राखेसहित दूर गेली .
आता ही आमटी गॅस शेगडीवर शिजत असलेली दिसते.
स्लाईड 29
(विटी दांडू खेळ,लगोरी खेळ,
आटया पाट्या , पिंगा खेळ ,परकर घातलेल्या मुली खेळ फोटो)
बोला चालीतून निघून चाललीय माझ्या आईची बोली
सुटीत आता खेळत नाहीत मुलं विटी दांडू आणि लगोऱ्या
थांबून गेलाय त्यांचा दंगा. आट्यापाट्या आणि पिंगा
परकऱ्या मुली खेळत नाहीत आता
आधीचे मातीतले खेळ.
म्हणजे
संभाषणातून -संवादातून हल्ली मातृभाषा म्हणजे आईची बोली निघून चालली आहे .
आता मुले सुट्ट्यांमध्ये पूर्वीसारखी विटी दांडू व लगोरीचे खेळ खेळत नाहीत .
त्यांचा गिल्ला आता थांबलाय. आता आट्या पाट्या किंवा पिंगा असले जुने खेळ नाहीसे झाले आहेत.
परकर घालणाऱ्या लहान मुली आता पूर्वीचे मातीतले खेळ खेळताना दिसत नाहीत.
स्लाईड 30
( विद्यार्थी टी.व्ही.क्रिकेट पाहताना फोटो )
पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर
बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम- थ्रिलर
याचा अर्थ
आता मुले दूरदर्शनच्या चॅनेलवर क्रिकेटची मॅच पाहण्यात रमून जातात आणि गुन्हेगारी विश्वातील मालिका बघत असतात.
स्लाईड 31
(लिहिताना फोटो)
लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते
शब्द बापुडे केवळ वारा
तसे विरून जातायत.
म्हणजे
आता कोणाकडूनही पूर्वीसारख्या गोष्टी लिहिल्या जात नाहीत .
लिहिणाऱ्या हातांचा सराव थांबलाय .
शब्द केविलवाणे होऊन फक्त वाऱ्यासारखे विरून जातात.
स्लाईड 32
(आईचे चित्र)
मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई
आणि माझी बोली
आणि माझी भूमी
कवितेसोबत.
याचा अर्थ
अशा या बदलत्या भयानक वास्तवात मी माझी कविता सांभाळतोय आणि कविते सोबतच माझी आई ,माझी भाषा आणि माझी भूमी यांचा मी या आधुनिक वास्तवापासून बचाव करतो आहे.
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही कविता नक्कीच आवडली असेल.
यामधून आपण आपल्या अनेक जुन्या चांगल्या गोष्टी वाचवूया आणि आपल्या संस्कृतीचे जतन करूया .
या कवितेच्या पुढील भागात पुन्हा भेटूया.
धन्यवाद.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा