🌸 झाडे 🌸
झाडे आपले सखे सोबती
त्यांच्याशी आहे आपली नाती
समृद्ध जीवन देई मानवा
झाडे लावा झाडे जगवा ,,,,,,|| १ ||
झाडे देती फळे फुले
जीवसृष्टी आनंदी डुले
झाडे देती औषध मानवा
झाडे लावा झाडे जगवा ,,,,,,||२||
पाखरे घेती जिथे निवारा
तीच फुलवती हवेत गारवा
झाडे देती पाऊस मानवा
झाडे लावा झाडे जगवा ,,,,,|| ३ ||
कधी पडते उन्हाची काहिली
झाडे देतात मायेची सावली
झाडे देती प्राणवायू मानवा
झाडे लावा झाडे जगवा ,,,,,,,,|| ४ ||
झाडांमुळे सुंदर सृष्टी
मानवास मिळे नवी दृष्टी
ध्यानी कायम असू दे मानवा
झाडे लावा झाडे जगवा ,,,,,||५||
लेखक
श्री. तुकाराम तुळशीराम अडसूळ
प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी
ता.पाथर्डी जि. अहिल्यानगर
मो.7588168948
मो .७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा