अहमदनगर - शिर्डी येथे येत्या २९ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर रोजी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहावे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन ‘आदर्श सरपंच’ भास्कर पेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. २९ ऑक्टोबर (शनिवार) रोजी सकाळी साडेदहा वाजता संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री ना. उदय सामंत, खा. सुजय विखे पाटील, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत(आय. ए. एस.) अहमदनगरच्या उप वनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने (भा.व.से.) यांची उपस्थिती असेल. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण मंडळाच्या कार्याचे ‘वनश्री’ विशेषांकाचे प्रकाशन होईल. संमेलनाचा उद्घाटन समारंभ २९ ऑक्टोबर (शनिवार) रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वा. संपन्न होईल. राज्यभरातील प्रतिनिधी पहिल्या दिवशी शुक्रवारी (२८) सायंकाळी शिर्डीत दाखल हो...
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ