📙📘📕📙📘📕📙📘📕
📘 गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर संस्कारयुक्त शिक्षण अतिशय महत्वाचे 📙
*श्यामची आई आणि नरकचतुर्दशी*
*श्यामच्या आईचे कुटुंब गरिबीतून वाटचाल करीत असताना दिवाळीसाठी भाऊबीज म्हणून यशोदाबाईंना त्यांचा भाऊ पैसे पाठवतो. त्या पैशातून ती स्वत:ला साडी न घेता श्यामला वडिलांसाठी धोतर आणायला सांगते. नरकचतुर्दशीला अभ्यंगस्नान झाल्यावर वडील त्यांचे फाटके धोतर शोधू लागतात. तेव्हा श्यामची आई म्हणते मी त्या धोतराचे पायपुसणे केले. वडील चिडून म्हणतात की “अगं,आता मी काय घालू ? ”तेव्हा ‘श्यामची आई’ कुंकू लावून ते नवीन धोतर हातात देवून चकित करते. श्यामचे वडील तिला म्हणतात, अगं, भाऊबीजेच्या पैशावर तुझा हक्क आहे आणि तुझीही साडी फाटलेली आहे..."यावर श्यामची आई म्हणते “हो.पण तुम्हाला बाहेर जावे लागते ना ?”*
*हा छोटासाच प्रसंग पण मुलांना त्यातून नात्यात एकमेकांसाठी काय करायचे असते याचे भान येते. हे अभावातले आनंद श्यामची आई मुलांना नकळत शिकवते. श्यामचा धाकटा भाऊ पुरुषोत्तम शाळेत जाताना कोट हवा म्हणून हट्ट धरतो.गरिबीमुळे तो घेणे शक्य नसते. तेव्हा श्याम खाऊच्या वाचलेल्या पैशातून पुरुषोत्तम ला कोट शिऊन आणतो.नकळत आईने केलेल्या संस्काराचा परिणाम श्यामवर होतो. गरिबीत हे नातेसंबंध उजळून निघतात.त्यातून वस्तूंचे मूल्य अधिक योग्य रितीने पटते.*
*आज आपल्या घरात मुलांसाठी पालक म्हणजे कल्पवृक्ष झाले आहेत असे वाटते. आज कोणतीही वस्तू मागितली की ती वस्तु लगेच समोर हजर होते.त्यातून मुलांच्या संवेदना कशा होत आहेत याचा आपण विचार केला पाहिजे. श्यामच्या घरात धोतर आणि कोट ज्याप्रमाणात नातेसंबंध अधिक बळकट करते ते आज का होत नाही. वस्तूंविषयी पण एक बेफिकीरपणा मुलामध्ये निर्माण होतो आहे असे वाटते.साधे उदाहरण पेनचे घेता येईल.आपल्या लहानपणी किमान २ ते ३ वर्षे एक पेन आपण वापरत असायचो पण आज एका महिन्यात ३ ते ४ पेन मुलांचे होतात. एखादी वस्तु बिघडली की ती दुरुस्त करणे हा प्रकार संपला ती फेकून लगेच दुसरी वस्तु मुलांना हवी असते.अर्थात हा पालक संस्कार आहे. अनेकजण घरातली कोणतीही वस्तु बिघडली की दुरुस्त न करता लगेच दुसरी वस्तु आणली जाते. मुलेही त्याचे अनुकरण करतात.लहानपणी आपण वर्ष संपले की जुन्या वह्यातील कोरी पाने फाडून नव्या वह्या तयार करायचो. आज वर्ष संपले की त्या वह्या फेकल्या जातात. कपडे थोडे वापरले जाताच फेकले जातात. श्यामची आई अभावातले आनंद शिकवते. तिने केलेले संस्कार तितकेच गरजेचे आणि अपरिहार्य वाटतात*.
------------------------ आज अनेक घरांत वस्तू ची मागणी करण्यापूर्वी त्या वस्तू घरात आणल्या जातात....त्यामुळे
त्या वस्तू ची उत्सुकता,गरज किंमत,नाविण्यता, इ. गोष्टीचं अप्रूप वाटत नाही.
'शामची आई ' हे अतिशय दर्जेदार पुस्तक , लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे असं मला वाटते.
सर्वांना दिपावलीच्या पर्यावरणपूरक हार्दिक शुभेच्छा
📙📘📕📙📘📕📙📘📕
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा