मुख्य सामग्रीवर वगळा

शिर्डी येथे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन


अहमदनगर - शिर्डी येथे येत्या २९ ऑक्टोबर  ते ३० ऑक्टोबर रोजी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहावे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन ‘आदर्श सरपंच’ भास्कर पेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. २९ ऑक्टोबर (शनिवार) रोजी सकाळी साडेदहा वाजता संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक  पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब हजारे  यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री ना. उदय सामंत, खा. सुजय विखे पाटील, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत(आय. ए. एस.) अहमदनगरच्या उप वनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने (भा.व.से.) यांची उपस्थिती असेल. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण मंडळाच्या कार्याचे ‘वनश्री’ विशेषांकाचे प्रकाशन होईल. 

संमेलनाचा उद्घाटन समारंभ २९ ऑक्टोबर (शनिवार) रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वा. संपन्न होईल. राज्यभरातील प्रतिनिधी पहिल्या दिवशी शुक्रवारी (२८) सायंकाळी शिर्डीत दाखल होतील. २९ रोजी सकाळच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर दुपारी २.३० ते ३.३० वा. ‘सर्वांगीण ग्रामीण विकास’ या विषयावर WORLD WATER COUNCILचे सदस्य रघुनंदन रामकिसन लाहोटी यांचे व्याख्यान होईल. दुपारी ३.३० ते ४.३० वा. ‘संत साहित्यातील पर्यावरण’ या विषयावर आदिवासी पुरस्कार विजेते कीर्तन-प्रवचनकार ह.भ.प. प्रा. विशाल महाराज फलके मार्गदर्शन करतील. सायंकाळी ५.०० ते ५.४० वा ‘शिर्डीतील पर्यावरण’ या विषयावर Green 'N Clean Shirdi Foundationचे अध्यक्ष अजित पारक, सायंकाळी ५.४० ते ६.१० वा. ‘विदेशातील पर्यावरण संवर्धन काम’ या विषयावर अमेरिकेतून संगीता तोडमल भूमिका मांडतील. रविवारी सकाळी १०.०० ते ११.०० वा. ‘जागतिक पर्यावरण, भारताची स्थिती आणि आपली जबाबदारी’ या विषयावर पर्यावरण विज्ञान विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. बी. जे. भोसले यांचे व्याख्यान होईल. सकाळी ११.०० ते दुपारी १.३० वा. संमेलनाचा समारोप समारंभ होईल. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक, ‘पद्मभूषण’ अण्णा हजारे यांची विशेष उपस्थिती असेल. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीखंडेश्वर माध्यमिक विद्यालय, उखलगाव, ता. श्रीगोंदाचे संस्थापक-अध्यक्ष भगवान पाचपुते, शिर्डी पोलिस स्टेशनचे डी.वाय.एस.पी. संजय सातव, राज्याचे माजी शिक्षण संचालक (प्राथमिक शिक्षण) दिनकर टेमकर, ‘वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने सन्मानित ‘स्‍त्रीजन्माचे स्वागत करा’ चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉ. सुधा कांकरिया उपस्थित असतील. समारोप कार्यक्रमात औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि ‘जलदूत’ संस्थेचे अध्यक्ष किशोर शितोळे हे प्रमुख वक्ते असतील.

हे पर्यावरण संमेलन शिर्डीतील श्रीसाई आश्रम शताब्दी मंडप, साई आश्रम नंबर १ भक्तनिवास परिसर येथे संपन्न होईल. संमेलनाला पूर्वनोंदणी केलेले राज्यभरातील सुमारे पाचशे पर्यावरणप्रेमी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.या राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनासाठी  निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे  राज्याचे अध्यक्ष  प्रमोद मोरे ,पर्यावरण मंडळाचे मार्गदर्शक राज देशमुख , मंडळाचे राजुचे सचिव वनश्री मोरे , अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसूळ,मंडळाचे राज्याचे कार्याध्यक्ष प्रमोद काकडे ,धीरज वाटेकर,पर्यावरण सखी मंच राज्याचे अध्यक्षा प्रियवदा तांबोटकर, कार्याध्यक्ष छायाताई रजपूत, मंडळाचे वैभव मोरे ,प्रवीण गुणवरे, अनिल लोखंडे , बाळासाहेब जठार , पर्यावरण सखी मंच अहमदनगरच्या जिल्हाध्यक्षा शोभा भालसिंग, शारदा होशिंग ,मीनाक्षी जाधव परिश्रम घेत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

व्हिडिओ निर्मिती - संजना

स्टार्स (STARS) उपक्रमांतर्गत 2560  व्हिडिओ निर्मिती. -------------------------------------- पटकथा लेखन j ---------------------------------------- व्हिडिओ क्रमांक -22 इयत्ता  - नववी वदहावीच्या विषय - मराठी  पाठ घटक क्रमांक -१० पाठ घटकाचे नाव -  यंत्रांनी केलं बंड  उपघटक /पठ्यांश   - १) कथांचे विविध प्रकार सांगून विज्ञान कथेचा परिचय . २) पाठाचे प्रकट वाचन. वेळ -३५ मिनिट शिक्षकाचे नाव - श्रीमती संजना भगवंत चेमटे  पदनाम  - उपाध्यापिका  शाळेचे नाव -  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर तालुका -अहिल्यानगर  जिल्हा -अहिल्यानगर . ---------------------------------------- अध्ययन निष्पत्ती -  १)विविध साहित्य प्रकारांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. २)योग्य आरोह- अवरोह व विरामचिन्हे यांची दखल घेऊन अर्थपूर्ण प्रकट वाचन करतत. दिनदर्शिकेतील पाठ क्रमांक -१० निर्मिती कार्यालयाचे नाव - जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर  जिल्हा -  अहिल्यानगर  पाठाचे स्वरूप  -  विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्...