शिक्षकाच्या उत्कृष्ट कार्याची माहिती शाळेत पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा नवोपक्रम राबवून शाळेत प्रचंड प्रमाणात वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन करून शिक्षणाला पूरक आनंददायी असे निसर्गरम्य वातावरण तयार केले .विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे राष्ट्रहिताचे मूल्य रुजविले.विद्यार्थी वेळोवेळी घर व शेताच्या परिसरात वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन करतात .विद्यार्थी व पालक प्रदूषमुक्त सणसमारंभ साजरे करतात.शाळेचा उपक्रम गावाचा उपक्रम झाला. लोकसहभागातून शाळेत विद्यार्थ्यांसाठी एल.ई. डी ,लेझीम ,लाऊड स्पीकर ,पाण्याची मोटार /पंप ,मैदानावर सिमेंट बेंचेस ,विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची मोठी पाईपलाईन अशा विविध वस्तू मिळवून विद्यार्थ्यांसाठी सुविधा निर्माण केल्या.लोकसहभागातून शाळेची किरकोळ दुरुस्ती ,स्वच्छतागृह दुरुस्ती , हॅन्डवॉश स्टेशन ,रंगकाम व सुंदर चित्रकाम करून शाळा आकर्षक केली.त्यामुळे शाळा सुटली तरी विद्यार्थ्यांना घरी जाऊ वाटत नाही.अशी शाळा तयार केली. विविध ऑनलाईन /ऑफलाईन स्पर्धेत विद्यार्थी नेहमी कृतिशील सहभाग घेऊन यश मिळवितात. जिल्हा...
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ