मुख्य सामग्रीवर वगळा

प्रयोगातून विज्ञान शिक्षण

प्रयोगातून विज्ञान शिक्षण

    समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, संशोधक वृत्ती निर्माण होण्यासाठी,  पर्यावरण संवर्धनासाठी, प्रदूषण निवारण करण्यासाठी, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी, निरीक्षणशक्ती वाढविण्यासाठी, समाजातील अनिष्ठ रूढी दूर करण्यासाठी, अनुमान व निष्कर्ष काढण्यासाठी, परिसराविषयी आत्मीयता निर्माण होण्यासाठी, परिसराची जपणूक होण्यासाठी, आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी,  निरीक्षणशक्ती वाढण्यासाठी आम्ही शाळेत विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध  प्रयोग कृतिशीलपणे करून दाखविले. त्यासाठी आम्ही नेहमी प्रयोगशील व कृतिशील राहतो. विज्ञानातील विविध मूलभूत संकल्पना आणि घटक समजण्यासाठी विविध प्रयोग करून सिद्ध करणे किंवा त्याबाबतची वस्तुस्थिती प्रत्यक्ष प्रयोगातून समजावून देतो.  आम्ही शाळेत विज्ञान विषयातील  अध्यापन व प्रयोग आनंददायी करून विद्यार्थ्यांमध्ये  विज्ञानातील विविध प्रयोग करण्याची आवड निर्माण केली. विज्ञान विषयातील प्रयोगांची इतर विषयांशी सांगड घातली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विज्ञानातील ज्ञानाच्या कक्षा विस्तारित होऊन त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला आहे. माझ्या शाळेत विज्ञानातील विविध घटकांवर आधारित विज्ञान प्रयोगांचे अगोदर नियोजन केले जाते.  या नियोजनात प्रयोगाचा विषय, प्रयोगाचे नाव, दिनांक, वेळ, स्थळ, उददेश, प्रयोगासाठी लागणारे साहित्य, प्रयोगाची तपशीलवार कृती, इतर निरीक्षणे, निष्कर्ष या बाबींचा समावेश केला जातो.  या विविध प्रयोगासाठी शाळेत एका स्वतंत्र वर्गखोलीत विज्ञान प्रयोगशाळा आम्ही तयार केली आहे. या प्रयोगशाळेत विविध प्रयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून विज्ञानाचे विविध तयार केलेले मॉडेल, प्रतिकृती, विविध प्रयोगांचे साहित्य,  विविध विज्ञान प्रयोगांची पुस्तके, विज्ञान, गणित पेट्या यांचा समावेश आहे.

        विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे अध्यापन करताना प्रत्यक्ष कृतीद्वारे अध्यापन व प्रयोग करणे महत्वाचे असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो. आम्ही विज्ञान विषयाचे अध्यापन करताना विविध घटकांवर अनेक लहान लहान व सोपे प्रयोग केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीद्वारे विज्ञान शिक्षण मिळाले.  त्यांची निरीक्षण, अनुमानशक्ती वाढीस लागली. परिसर अभ्यास मधील पिण्याचे पाणी हा घटक शिकविताना काही पदार्थ पाण्यात विरघळतात तर काही पदार्थ पाण्यात विरघळत नाही हे प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे दाखवून देताना काचेच्या काही बाटल्या घेतल्या. त्या प्रत्येक बाटलीत पाणी टाकले. एका बाटलीत साखर, दुसऱ्या बाटलीत मीठ, धुण्याचा सोडा टाकला तर काही बाटलीत वाळू ,लाकडाचा भुसा टाकला. साखर, मीठ, धुण्याचा सोडा हे पाण्यात विरघळले तर वाळू, लाकडाचा भुसा हे पाण्यात विरघळले नाही. यावरून विद्यार्थ्यांना कोणते पदार्थ पाण्यात विरघळतात व कोणते विरघळत नाही हे प्रयोगाद्वारे समजले.

     काही वस्तू पाण्यात तरंगतात तर काही वस्तू पाण्यात तरंगत नाहीत. हे प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे दाखवून देण्यासाठी एका काचेच्या भांड्यात पाणी घेतले. त्यात खोडरबर, पेन्सिल, काड्या, खडे, नाणे, पाने, खिळा अशा एक एक वस्तू पाण्यात टाकल्या असता खोडरबर, खिळा, नाणे, खडे या वस्तू पाण्यात बुडाल्या तर पेन्सिल, काड्या, पाने या वस्तू पाण्यात बुडाल्या नाहीत. याचे ज्ञान विद्यार्थ्यांना या प्रयोगाद्वारे दिले.

    एका ठिकाणी साठवलेले पाणी नळाचा वापर करून निरनिराळ्या ठिकाणी नेता येते हे दाखविण्यासाठी एक प्लॅस्टिक बाटली घेतली. तिचा वरचा निमुळता भाग कापून टाकला. तळापासून काही अंतरावर चार छिद्रे पाडली. एक रिकामी रिफिल घेऊन तिचे चार तुकडे केले. हे चार तुकडे चार छिद्रात घट्ट बसवले. बाटलीत पाणी भरले. सर्व नळ्यामधून पाणी वाहू लागले. त्यामुळे एका ठिकाणी असलेले पाणी विविध ठिकाणी नेता येते हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष या प्रयोगातून घरोघरी पाणी या पाठातून समजले. हवा हा पाठ शिकविताना रिकाम्या भांड्यातही हवा असते हे दाखविण्यासाठी एका मोठ्या रिकाम्या भांड्यात पाणी घेतले. त्यानंतर एक उभट रिकामे भांडे घेतले. भांडे उपडे करून पृष्ठभागावर तसेच उभे करून पाण्यात खाली  दाबले. नंतर भांडे तिरपे केले. हवेचे बुडबुडे लगेच पाण्याच्या वर येऊ लागले. यावरून हवा पाण्यापेक्षा हलकी असते. म्हणून भांडे तिरपे झाले हवेचे बुडबुडे पाण्याबाहेर वर येतात व रिकाम्या भांड्यातही हवा असते हे विद्यार्थ्यांना या प्रयोगातून समजले.

    दिवस-रात्र कसे होतात हे प्रत्यक्ष कृतीतून समजावून दिले. एक बॅटरी व एक भोवरा घेतला. बॅटरी म्हणजे सूर्य आणि भोवरा म्हणजे पृथ्वी हे विद्यार्थ्यांना सांगितले. बॅटरी व भोवरा समोरासमोर ठेवले. भोवरा फिरवला व बॅटरी चालू करून तिचा प्रकाश भोवऱ्याच्या समोरच्या भागावर पडला. हा प्रकाश म्हणजे दिवस भोवरा फिरत असल्यामुळे पुन्हा उजेडातील भाग अंधारात गेला हा अंधार म्हणजे रात्र हे विद्यार्थ्यांना या प्रयोगातून दाखवून दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवस रात्र कसे होतात हे प्रत्यक्ष या प्रयोगातून समजले.

    विषारी वायू हवेत पसरल्यामुळे हवेचे प्रदूषण होते. त्यामुळे ही दूषित हवा सर्व सजीवांच्या जीवनास घातक असून त्यामुळे श्वसनाचे विविध आजार होतात हे प्रयोगातून समजावून दिले. विद्यार्थ्यांना हवेत धूर मिसळतो हे प्रयोगातून समजावून दिले. तसेच याबाबत निरीक्षण करण्यास सांगितले.विद्यार्थ्यांना हे समजले. त्यांनी या प्रयोगातून  आपले व सर्व सजीवांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रदूषणमुक्त सणसमारंभ साजरे करण्याची प्रतिज्ञा घेतली व प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करतात. हवेचे प्रदूषण होऊ देत नाहीत. पाण्याचे प्रदूषण कसे होते व परिसरातून आपल्या गरजा कशा पूर्ण होतात हे विद्यार्थ्यांना ओढ्यावर  परिसर भेट काढून प्रयोग करून दाखवून दिले. पाण्याचे निरीक्षण करण्यास सांगून प्रत्यक्ष प्रयोगातून हे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना प्रदूषणाचे दुष्परिणाम या दूषित पाण्यातून प्रयोग करून समजावून दिले. या प्रयोगामुळे त्यांनी पाण्याचे प्रदूषण न करण्याची प्रतिज्ञा घेतली. शाळेतील सर्व विद्यार्थी पाण्याचे प्रदूषण होऊ देत नाहीत. तसेच परिसरातून आपल्या गरजा कशा प्रकारे पूर्ण होतात हे त्यांना परिसरातील विविध  पिके, झाडे, व इतर परिसरास भेट देऊन प्रत्यक्ष प्रयोग करून समजावून दिले. अशा प्रकारे विज्ञानातील विविध बाबी विविध साध्या सोप्या प्रयोगातून समजावून दिल्या.

    काही पदार्थ पाण्यात विरघळतात तर काही पदार्थ पाण्यात विरघळत नाही हे विद्यार्थ्यांना प्रयोगातून समजावून दिले. शाळेत विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोगावरील विविध शास्त्रज्ञांची पुस्तके वाचण्यास दिली जातात. ही पुस्तके विद्यार्थी आवडीने वाचतात. प्रयोगाबाबत सारांश स्वतःच्या शब्दात सांगतात. सजीवना जगण्यासाठी हवा, पाणी, अन्न यांची गरज असते हे प्रयोगातून समजावून दिले. पाणी या पाठातून पाणी आडवा पाणी जिरवा, पाण्याचा वापर जपून करा हे प्रयोगातून समजावून दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये योग्य परिवर्तन झाले. तसेच या पाठातून कोणकोणते पदार्थ पाण्यात विरघळतात हे  प्रयोगातून समजावून दिले. तसेच पाण्याला वास, रंग, चव नसते हे प्रयोगातून समजावून दिले. ज्या पाण्याला वास, रंग, चव असते ते पाणी आरोग्याला घातक असते हे विद्यार्थ्यांना प्रयोगातून समजावून दिले. शाळेत विज्ञानातील कोणताही घटक हा आनंदाने व प्रयोगातून कृती करून समजावून दिला जातो. शाळेत प्रयोगासाठी लागणारे अनेक साहित्य विद्यार्थी आमच्या मार्गदर्शनाखाली तयार करतात. राष्ट्रीय विज्ञान खेळणी जत्रेत कृतिशील सहभाग घेतात. विज्ञानातील विविध प्रयोगातून विविध खेळणी तयार करतात. विविध वैज्ञानिकांविषयी व त्यांनी केलेल्या विविध प्रयोगांची माहिती विद्यार्थी सांगतात. शाळेत विज्ञान प्रदर्शन भरवले जाते. यामध्ये विद्यार्थी विविध प्रयोग करून त्यांचे सादरीकरण करतात. तसेच विज्ञानातील विविध प्रयोगांचा वापर इतर विविध विषयात आणि दैनंदिन जीवनात करतात. विज्ञानातील विविध प्रयोग करताना त्यांची मांडणी व कृती अचूकपणे करतात. निसर्गात एखादी घटना घडल्यास त्यामागे कोणते कारण आहे हे शोधतात. विज्ञान प्रयोगामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती रुजली आहे. प्रयोगामुळे त्यांच्यामधील सर्जनशीलता वाढीस लागली आहे.वर्तमान पत्रात विज्ञान प्रयोग व उपक्रम याविषयी आलेल्या भागाचे  आम्ही विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेतो. विज्ञानातील प्रयोग करताना सर्व प्रकारची काळजी घेतात. अशाप्रकारे विज्ञानातील अनेक प्रयोग राबवून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांचा सर्वांगीण विकास करीत आहोत. या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांची शालेय जीवनात योग्य प्रकारे जडणघडण झाली आहे.  त्यांच्यातील अनिष्ठ रूढी व परंपरा दूर झाल्या आहेत.

     आमच्या शाळेतील विद्यार्थी विविध विज्ञान प्रदर्शनात कृतिशील सहभाग घेतात. त्या प्रयोगांचे उत्कृष्टपणे सादरीकरण करतात. तसेच विज्ञान प्रयोगाबाबत विविध स्पर्धेत सहभागी होतात. अनेक विज्ञान प्रयोग, उपक्रम स्पधेत शाळेतील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. आम्ही शाळेत पाठ्यपुस्तकातील व पाठ्यपुस्तकाबाहेरील विविध प्रयोग विद्यार्थ्यांना करून दाखवतो. विद्यार्थी अनेक प्रयोग स्वतः करून निष्कर्ष काढतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्यातील अंधश्रद्धा, अज्ञान दूर होऊन त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला आहे. अशा प्रकारे आम्ही शाळेत विद्यार्थ्यांना प्रयोगातून विज्ञान शिक्षण उत्कृष्टपणे दिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

G 20 Summit विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर

G 20 Summit विषयावर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर येथे आमच्या शाळेत राबवित असलेल्या निरंतर वाचन उपक्रम बाबत ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमाचे सादरीकरण संगमनेर DIET प्राचार्य मा.भगवान खारके साहेब, जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय अशोक कडूस साहेब , जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब यांचे समोर सादरीकरण करताना एक आनंदाचा क्षण. G 20 Summit हा उपक्रम भारतासह जगातील 20 देशात राबविला जात आहे, यावर्षी या उपक्रमाचे यजमानपद भारताकडे आहे, दरवर्षी दुसऱ्या देशाकडे असणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. या कार्यशाळेसाठी पुढाकार घेणारे संगमनेर DIET प्राचार्य आदरणीय भगवान खारके साहेब व सर्व डाएट स्टाफ यांना खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏