मुख्य सामग्रीवर वगळा

माझी शाळा माझे विज्ञान प्रयोग

माझी शाळा माझे विज्ञान प्रयोग

माझ्या शाळेत  विज्ञानातील विविध घटकांची संकल्पना विद्यार्थ्यांना समजावी ,विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा ,त्यांना विज्ञानातील प्रयोगांची आवड निर्माण व्हावी , निरीक्षणशक्ती वाढावी ,आत्मविश्वास निर्माण व्हावा ,त्यांच्यातील अंधश्रद्धा व अज्ञान दूर व्हावे ,त्यांना सत्यता पटावी ,वस्तुस्थिती समजावी ,त्यांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे राष्ट्रहिताचे मूल्य रुजावे , त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा  म्हणून विज्ञानातील विविध  घटकांचे अध्यापन हे आनंददायी पद्धतीने करून विविध प्रयोगांचे कृतिशील अनुभव विद्यार्थ्यांना दिले जातात.विज्ञानातील विविध घटकांवर आधारित विज्ञान प्रयोगांचे अगोदर नियोजन केले जाते.या नियोजनात प्रयोगाचा विषय ,प्रयोगाचे नाव ,दिनांक ,वेळ ,स्थळ , उददेश ,प्रयोगासाठी लागणारे साहित्य ,प्रयोगाची तपशीलवार कृती ,इतर निरीक्षणे ,निष्कर्ष या बाबींचा समावेश केला जातो.या प्रयोगासाठी शाळेत एका स्वतंत्र वर्गखोलीत विज्ञान प्रयोगशाळा तयार केली आहे.या प्रयोगशाळेत विविध प्रयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून विज्ञानाचे विविध तयार केलेले  मॉडेल ,प्रतिकृती , विविध प्रयोगांचे साहित्य ,विविध विज्ञान प्रयोगांची पुस्तके ,विज्ञान गणित पेट्या  यांचा समावेश आहे.
 तसेच शासनाकडून आलेल्या विज्ञानपेटीतील साहित्याचा वेळोवेळी विज्ञानातील विविध प्रयोग करण्यासाठी वापर केला जातो.या प्रयोगातून निष्कर्ष काढतात .बालआनंद मेळावा आणि गणित विज्ञान प्रदर्शनात आमच्या शाळेतील विद्यार्थी विज्ञानातील विविध प्रयोग करून दाखवितात.विविध घटकांवर वेळोवेळी कृतिशील प्रयोग करतात.
     
आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आम्ही पाठयापुस्तकातील आणि पाठयपुस्तकाबाहेरील अनेक विज्ञान प्रयोग वेळोवेळी करून दाखवतो आणि हे प्रयोग पुन्हा त्यांच्याकडून करून घेतो.त्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोग बाबत विस्तृत ज्ञान मिळून त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे.तसेच परिसर व क्षेत्रभेटीतूनही विज्ञानातील विविध सोपे प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांना कृतिशील माहिती व अनुभव दिले जातात.
हवेचे प्रदूषण कसे होते समक्ष विद्यार्थ्यांना प्रयोगातून दाखविले जाते.त्याचे दुष्परिणाम प्रयोगातून सांगितले जातात.दूषित हवेमुळे अनेक प्रकारचे आजार सजीवांना होतात हे हवा या पाठाचे अध्यापन करताना प्रयोगातून विद्यार्थ्यांना समजावून दिले .या प्रयोगामुळे विद्यार्थी हवेचे प्रदूषण करीत नाहीत.प्रदूषणमुक्त सणसमारंभ साजरे करतात. झाडांमुळे आपल्याला शुद्ध हवा मिळते.या प्रयोगातून विद्यार्थ्यांना झाडांचे महत्व पटवून दिले.झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो .या ऑक्सिजन चे महत्व या विज्ञान प्रयोगातून समजल्यामुळे विद्यार्थी दरवर्षी प्रचंड प्रमाणात वृक्षारोपन करून त्यांचे संवर्धन करतात. पाण्याचे प्रदूषण कसे होते ?पाणी प्रदूषणाचे दुष्परिणाम हा प्रयोग विद्यार्थ्यांना  पाणी या पाठाचे अध्यापन करताना  प्रयोगातून समजावून दिले .त्यामुळे विद्यार्थी पाणी प्रदूषण करीत नाहीत.या विज्ञान प्रयोगातून मोलाचे अन्न हा पाठ शिकविताना  अन्नाचे प्रदूषण कसे होते?त्याचे दुष्परिणाम कोणते?हे  प्रयोगातून समजावून दिले.त्यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थी  हवा ,पाणी ,अन्न या आपल्या मूलभूत गरजांचे प्रदूषण होऊ देत नाहीत .सजीवांच्या वाढीसाठी हवा ,पाणी ,अन्न यांची गरज असते हे  सजीवांची वाढ हा घटक शिकविताना या प्रयोगातून विद्यार्थ्यांना समजावून दिले . दिले.  विज्ञान प्रयोगातून आम्ही पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे राष्ट्रहिताचे  व समाजहिताचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविले आहे .
या विज्ञान प्रयोगामुळे बालवयात शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांची योग्य जडण घडण होण्यास मोठी मदत झाली आहे.विद्यार्थ्यांमध्ये या प्रयोगामुळे योग्य परिवर्तन झाले आहे.
 विज्ञानातील सजीवांचे परस्परांशी नाते या पाठाचे अध्यापन करताना प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा जेथे पूर्ण होतात तेथेच ते सजीव आढळतात हा अनुभव विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करून दाखविला . या प्रयोगासाठी कुंडीतील दोन  पानवनस्पती घेऊन त्यांना पाणी दिले.एका कुंडीतील रोपाला सतत पाणी दिले व दुसऱ्या कुंडीतील रोपाला कमी पाणी दिले .कमी पाण्याच्या कुंडीतील पाणवनस्पती सुकून गेली.या प्रयोगातून पाणवनस्पती पाण्याच्या ठिकाणी आढळतात किंवा त्यांना जास्त पाणी लागते हे विद्यार्थ्यांना कृतिशीलपणे समजले कारण विद्यार्थी सर्व प्रयोगात कृतिशील सहभाग घेतात. हवा या पाठाचे अध्यापन करताना ज्वलनासाठी हवेची गरज असते हे समजावून देण्यासाठी  मेणबत्ती ,काचेचा ग्लास ,बशी काडीपेटी घेऊन मेणबत्ती पेटवून त्यावर काचेचा ग्लास ठेवला असता मेणबत्ती विझली गेली.यामधून ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते हे विद्यार्थ्यांना समजावून दिले .सजीवांचे परस्परांशी नाते या पाठाचे अध्यापन करताना गरजेपेक्षा जास्त पाणी दिले तर त्याचा सजीवांना दुष्परिणाम होतो हे प्रयोगातून विद्यार्थ्यांना समजावून दिले .कुंडीतील दोन रोपे घेऊन त्यांना पाणी देऊन हा प्रयोग विद्यार्थ्यांना समजावून दिला .साठवण पाण्याची या पाठाचे अध्यापन करताना पाणी आडवा पाणी जिरवा हा प्रयोग विद्यार्थ्यांना मातीचा ढीग करून त्यावर पावसासारखे पाणी सोडले .हे पाणी उताराच्या दिशेने वाहते ,जसा उतार असेल तशा वेगाने पाणी वाहते हे विद्यार्थ्यांना समजले.  त्यामुळे आपली पाण्याची गरज भागविण्यासाठी पाणी अडवणे व पाणी जिरवणे अत्यंत महत्वाचे आहे हे त्यांना समजावून दिले.पाणी अडवले नाही तर पाणी वाहून जाते .हे पण विद्यार्थ्यांना समजले . पाण्याचा वापर काटकसरीने करणे .पाणी ही आपली हवेनंतरची अतिशय महत्त्वाची गरज आहे .पाण्याचा जर आपण गैरवापर केला तर गोड्या पाण्याचे साठे मर्यादित आहेत ते संपून जाईल.तसेच काही ठिकाणी पाण्याअभावी दुष्काळ पडतो.त्यामुळे आपल्याला कायम पाणी लागत असते.म्हणून आपली पाण्याची गरज भागविण्यासाठी आपण पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे हे  या प्रयोगातून विद्यार्थ्यांना समजावून दिले . त्यामुळे ते पाण्याचा वापर जपून करतात.पिण्याचे पाणी या पाठाचे अध्यापन करताना काही पदार्थ पाण्यात विरघळतात ,काही पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत हे समजावून देताना या प्रयोगासाठी एका भांड्यात पाणी घेऊन साखर ,मीठ ,पाणी ,वाळू दगड ,लाकडी भुसा अशा वस्तू एका वेळी एक पाण्यात टाकून हा प्रयोग विद्यार्थ्यांना समजावून दिला .तसेच आणखी कोणकोणत्या वस्तू ,पदार्थ पाण्यात विरघळतात हे त्यांनी प्रयोग करून पाहिले . काही वस्तू पाण्यावर तरंगतात तर काही वस्तू पाण्यावर तरंगत नाहीत .या प्रयोगात पाण्यात विविध वस्तू व पदार्थ टाकून पाहिले असता काही वस्तू पाण्यावर तरंगल्या तर काही वस्तू पाण्यात बुडाल्या हे विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग करून अनुभवले.त्यामुळे त्यांना पाण्यावर तरंगणाऱ्या व पाण्यात बुडणाऱ्या वस्तू तसेच पदार्थ समजले .पिण्याचे पाणी या पाठातून गढूळ पाण्यात तुरटी फिरवल्याने मातीचे कण खाली बसतात हा प्रयोग करण्यासाठी गढूळ पाणी व तुरटी घेऊन त्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवून दाखवली असता मातीचे कण पाण्याच्या तळाशी जाऊन बसले .त्यामुळे गढूळ पाणी स्वच्छ कसे करावे हे विद्यार्थ्यांना या प्रयोगातून समजले . या पाठातून स्वच्छ व पारदर्शक पाणी निर्धोक असते असे नाही या प्रयोगासाठी हे पाणी एका काचेच्या भांड्यात घेऊन दाखविले .नंतर हे पाणी एका कापडी तुकड्याच्या साहाय्याने गाळून घेतले .त्यावेळी या कापडी तुकड्यावर काही कचरा,सूक्ष्म जीवजंतू जमा झालेला विद्यार्थ्यांना दाखवला .त्यामुळे या प्रयोगातून विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी  किंवा पारदर्शक पाणी निर्धोक असते असे नाही हे समजले.या पाठातून शुद्ध पाण्याला चव नसते ,रंग नसतो ,वास नसतो .हा प्रयोग विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानेंद्रियांचा वापर करून प्रत्यक्ष अनुभव देऊन समजावून दिला .त्यामुळे शुद्ध पाण्याला चव नसते . शुद्ध पाण्याला रंग नसतो .शुद्ध पाण्याला वास नसतो .हे विद्यार्थ्यांना या प्रयोगातून समजले.जर एखाद्या पाण्याला रंग ,चव आणि वास असेल तर ते पाणी पिण्यास आरोग्यास अपायकारक असते हे पण या प्रयोगातून विद्यार्थ्यांना कृतिशील पणे समजावून दिले. पाण्याला स्वतःचा आकार नसतो हे घरोघरी पाणी या पाठातून प्रयोग करून समजावून दिले.पाणी आपण ज्या भांड्यात ठेवू तसा आकार त्या पाण्याला तयार होतो.हे विद्यार्थ्यांना या प्रयोगातून समजले.पाणी संथ ठेवून निवळता येते हे या पाठातून प्रयोगाद्वारे समजावून दिले.एका काचेच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडी माती टाकुन ते पाणी गढूळ केले.नंतर बराच वेळ तसेच संथपणे ठेवले असता पाणी निवळले.  हा प्रयोग विद्यार्थ्यांनी स्वतः करून अनुभव घेतला.
घरोघरी पाणी या पाठाचे अध्यापन करताना एका ठिकाणी साठवलेले पाणी नळाचा वापर करून निरनिराळ्या ठिकाणी नेता येते हे प्रयोगातून दाखविले.हा प्रयोग समजावून देण्यासाठी एका बाटलीत पाणी घेऊन त्यास छिद्रे पाडून छोट्या नळ्या किंवा पाईप जोडून हे पाणी अनेक ठिकाणी नेऊन दाखविले .त्यामुळे विद्यार्थ्यांना एका ठिकाणी साठवलेले पाणी अनेक ठिकाणी नेता येते हे समजले  .मोलाचे अन्न या पाठाचे अध्यापन करताना यंत्राने कामे लवकर होते हे प्रयोगातून समजावून दिले .हा प्रयोग समजावून देण्यासाठी एक छोटे यंत्र आणून त्याद्वारे भुईमुगाच्या शेंगा फोडून दाखविल्या व विद्यार्थ्यांकडून  काही शेंगा फोडून घेतल्या .त्यामुळे शेंगा फोडण्यासाठी यंत्रास व  माणसांना लागणारा वेळ यामध्ये खूप तफावत आढळली .त्यामुळे यंत्राने कोणतेही काम लवकर होते हे या प्रयोगातून विद्यार्थ्यांना कृतिशीलपणे समजले .हवा या पाठाचे अध्यापन करताना हवा पाण्यापेक्षा हलकी असते हे प्रयोगातून समजावून दिले .हा प्रयोग समाजवून देण्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात ग्लास उलटा करून बुडविण्याचा प्रयत्न केला परंतु ग्लास पाण्यात बुडाला नाही .जेव्हा हा ग्लास थोडा तिरप्या केला तेव्हा त्यातून हवा बुडबुड्याच्या रूपाने बाहेर आली. मग ग्लास पाण्यात बुडाला.यावरून हवा पाण्यापेक्षा हलकी असते तसेच रिकाम्या ग्लास मध्येही हवा होती  हे विद्यार्थ्यांना समजले. म्हणजे हवा आपल्या अवतीभवती तसेच रिकाम्या भांड्यातही असते हे समजले.  वस्त्र या पाठातून  'धागे एकमेकांत गुंफून कापड किंवा वस्त्र तयार होते हे सध्या प्रयोगातून दाखवून दिले .एक कापडाचा तुकडा घेऊन तो कापला .कापलेल्या ठिकाणी असलेले धागे विद्यार्थ्यांना दाखविले.धाग्यांपासून कापड बनते हे विद्यार्थ्यांना समजले .अन्नातील विविधता या पाठाचे अध्यापन करताना एकाच अन्न घटकांपासून विविध अन्नपदार्थ तयार करतात हे प्रयोगातून दाखवून दिले .तांदळापासून भात बनवून दाखविला  .त्याच तांदळापासून खीर बनवून दाखविली.काही वस्तूंचा ढीग करता येतो तर काही वस्तूंचा ढीग करता येत नाही हा प्रयोग करताना विविध फळे घेऊन त्यांचा ढीग करून दाखविला तर  जे द्रव पदार्थ आहेत उदा-खीर याचा आपणास ढीग करता येत नाही .या पाठाचे अध्यापन करताना  विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंचे ढीग करून दाखविले.चांगल्या सवयी समजावून देताना  जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत  हे साध्या प्रयोगातून विद्यार्थ्यांना समजावून दिले.जेवणापूर्वीचे तळहात निरीक्षण करा त्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुतल्यावर हातावरील भागाचे निरीक्षण करा .यामध्ये लगेच फरक जाणवला .आपल्या आरोग्यासाठी व निरोगी राहण्यासाठी जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत हे विद्यार्थ्यांना  समजले .आमच्या शाळेतील विद्यार्थी जेवणापूर्वी  तसेच दिवसभर वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुतात .त्यामुळे ते निरोगी राहतात .शाळेतील अशा साध्या साध्या प्रयोगातून त्यांच्यामध्ये आरोग्याच्या चांगल्या सवयी बाबतचे विविध मूल्य रुजविली आहेत.हवा या पाठातून  हवेत बाष्प असते हे प्रयोगातून समजावून दिले .पिण्याचे पाणी हा घटक शिकविताना पाण्याला स्थायु ,वायू ,द्रव अशा तीन अवस्था असतात हे प्रयोगातून समजावून दिले .पारदर्शक व अपारदर्शक घटक शिकविताना पुठ्ठा अपारदर्शक आहे ,काच पारदर्शक आहे ,पाणी पारदर्शक आहे हे प्रयोग करून विद्यार्थ्यांना अनुभव दिला.पुठ्ठा घेऊन त्यासमोर पाहिले असता काहीही दिसले नाही म्हणजे पुठ्ठा अपारदर्शक आहे त्यांना समजले . काचेतून व पाण्यातून पलीकडचे दिसले म्हणजे हे पारदर्शक पदार्थ आहेत हे विद्यार्थ्यांना समजले.असे अनेक पदार्थ घेऊन विद्यार्थ्यांनी पारदर्शक व अपारदर्शक बाबत प्रयोग करून माहिती सांगितली. आहाराची पौष्टिकता या पाठाचे अध्यापन करताना  अन्न शिजवताना त्यावर झाकण ठेवावे. त्यामुळे अन्न लवकर शिजते हे प्रयोगातून समजावून दिले.शालेय पोषण आहार शिजवताना विद्यार्थ्यांना या प्रयोगाचा अनुभव दिला.या पाठातून विद्यार्थ्यांना एका जिभेने आपल्याला निरनिराळ्या चवी समजतात हा प्रयोग करताना विद्यार्थ्यांना विविध पदार्थ खाण्यासाठी, पिण्यासाठी दिले .यामधून त्यांना हा अनुभव मिळून एक वेगळा आनंद मिळाला.या पाठातून डोळ्याने आपल्याला निरनिराळे रंग समजतात याचाही अनुभव दिला.विद्यार्थ्यांनी विविध रंग ओळखले .लिंबू व काकडीच्या रसात पाणी असते हे लिंबू कापून पिळून दाखविले ,काकडी किसून पिळून दाखविली.
प्रयोगशाळेतील विविध प्रतिकृतीतून विद्यार्थ्यांना पाहू तरी शरीराच्या आत या पाठातील बाह्यइंद्रिये ,आंतरेन्द्रिये समजावून दिले.तसेच त्यांचे कार्य या प्रतिकृतीतून समजावून दिले.तसेच या पाठातून बंदिस्त जागेतील द्रवपदार्थांवर दाब दिला तर जागा मिळेल तेथून द्रवपदार्थ जोराने बाहेर पडतात हे प्रयोगातून समजावून दिले.विद्यार्थ्यांनी प्रयोग स्वतः केले व अनुभवले. आपण जेव्हा जोरजोराने पळतो तेव्हा आपल्या नाडीचे ठोके जलद गतीने पडत असतात हे प्रयोगातून स्वतः अनुभव घेऊन पाहू तरी शरीराच्या आत या पाठातून  समजावून दिले.विद्यार्थ्यांच्या धावण्याच्या स्पर्धा घेऊन या प्रयोगाचा अनुभव दिला.घसा दुखत असल्यास गरम पाण्याने गुळण्या कराव्यात ,सर्दी झाली तर गरम पाण्याने वाफ घ्यावी हे प्रयोग छोटे आजार व घरगुती उपचार या पाठाचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांना प्रयोगाद्वारे समजावून दिले.त्यामुळे या प्रयोगातून विद्यार्थ्यांना सर्दी कशामुळे होते ,घसा का दुखतो हे समजले.त्यामुळे विद्यार्थी हे आजार झाल्यावर प्रथम उपचार म्हणून वेळोवेळी असे प्रयोग आपापल्या घरी करतात .आजार बरा न झाल्यास डॉक्टरांना दाखवितात.अशा प्रकारे आमच्या शाळेत विज्ञान विषयाचे अध्यापन करताना पाठयपुस्तकातील आणि पाठयपुस्तकाच्या बाहेरील  असे अनेक प्रयोग विद्यार्थ्यांना वेळोवेळी करून दाखविले जातात .त्यानुसार विद्यार्थी हे प्रयोग करून निष्कर्ष काढतात.त्यांना सत्यता या विविध प्रयोगातून समजते.  त्यांना विज्ञानातील प्रयोगांची आवड निर्माण झाली . विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयातील ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत.विज्ञानातील विविध प्रयोगाबाबतच्या पुस्तकांचे आवडीने वाचन करतात.विज्ञान प्रयोगासाठी लागणारे काही साहित्य तयार करतात. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता वाढीस लागली. प्रयोगामुळे विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती वाढीस लागली.त्यांच्यामध्ये संशोधन मूल्य रुजले आहे. विज्ञानातील विविध प्रयोगांचा वापर विविध विषयात करतात .त्यामुळे त्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यास मोठी मदत झाली. विद्यार्थी विविध विज्ञान प्रयोग बाबत शास्त्रज्ञांची माहिती सांगतात व लेखन करतात.  प्रयोगामुळे विद्यार्थ्यांमधील अंधश्रद्धा नाहीशी झाली .त्यामुळे अज्ञान दूर होऊन त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य रुजले आहे. यामुळे विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनात कृतिशील सहभाग घेतात.
तसेच परिसरातून व निसर्गातून आपल्या गरजा पूर्ण होतात हे त्यांना समजले व तसे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजले आहे. त्यामुळे ते परिसराचे व निसर्गाचे रक्षण करू लागले .त्यामुळे राष्ट्र व समाजहिताचे परिवर्तन विद्यार्थ्यांमध्ये झाले.विविध विज्ञान विषयक स्पर्धेत विद्यार्थी कृतिशील सहभाग घेतात. तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथील  डॉ.ए. पी.जे .अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशन द्वारा  आयोजित केलेल्या विविध विज्ञान विषयक स्पर्धेत आमच्या शाळेतील नव्वद टक्के विद्यार्थ्यांनी कृतिशील सहभाग घेतला .या सर्व विद्यार्थ्यांना  या फौंडेशनच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

Development of Conversation skill of the Students.-Sunil Research

Developing the communication skills from an early age can benefit for the students in primary Education.This Research paper explores the significance of joyful learning enhancing the communication skill of the students.It investigates various activities for the joyful learning.This Research Paper discusses the potential benefits of joyful learning.In this Research Paper I used Drama and Role play ,Group Discussions , Storytelling,Collaborative projects , Various Technology Integration , show and tell  ,Role play interviews , Story' writing  and many different activities for communication skill of the students.The communication skills of the Students Developed very well.