मुख्य सामग्रीवर वगळा

यशोगाथा गितेवाडी शाळा

           मूल्यवर्धन यशोगाथा..       

     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी

केंद्र. चिंचोडी ,ता. पाथर्डी , जि. अहमदनगर

शिक्षक

श्री. तुकाराम अडसूळ

श्री. नवनाथ आंधळे

केंद्रप्रमुख

श्री. बाळासाहेब दळवी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

नगर- पाथर्डी तालुक्यातील सरहद्दीवरील डोंगराळ भागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ही एक सुंदर शाळा आहे. शाळेची स्थापना 2 जून 1946 मध्ये झालेले आहे. त्यामुळे सर्वात जुनी इमारत असलेली शाळा आज ही व्यवस्थित आहे .यात जुन्या इमारतीला अधिक उठावबाज केले आहे. येथे नव्याने आलेले दोन शिक्षक श्री तुकाराम अडसूळ व श्री नवनाथ आंधळे . या शिक्षकांनी लोकसहभाग ,विद्यार्थी, तरुण वर्ग यांना सोबत घेऊन संपूर्ण शाळेचा चेहरामोहराच बदलून  टाकला आहे. याच लोकसहभागातून शाळा  दुरुस्ती ,स्वच्छतागृह दुरुस्ती ,शाळा स्वच्छ, सुंदर ,निसर्गरम्य, डिजिटल,- लर्निंग ,पर्यावरण पूरक, प्लास्टिक मुक्त परिसर, असे विविध उपक्रम हाती घेतली आणि याच उपक्रमाला जोड मिळाली ती मूल्यवर्धन उपक्रमाची..

        पर्यावरण प्रेमी असलेले तसेच निसर्ग अभ्यासासाठी जगात पर्यावरण संवर्धनात  अग्रेसर असलेला भूतान देश   तसेच पर्यावरण क्षेत्रात अनेक पुरस्कार प्राप्त श्री तुकाराम अडसूळ सर व उपक्रमशील शिक्षक श्री नवनाथ आंधळे सर यांनी मूल्यवर्धन उपक्रमाचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग झाल्याचे  सांगितले.

शिक्षणाबरोबरच मूल्यशिक्षणाची गरज आहे आणि ही मूल्य शिकवले जात नाही तर ती रुजवली जातात. मूल्यवर्धन हा महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरु असलेला खूप प्रेरणादायी असा उपक्रम ठरत आहे .आज आपण पाहतो जगामध्ये नैतिक मूल्यांचा खूप  ‌ ह्वास  होताना दिसत आहे,आणि म्हणून हि  नैतिक मूल्य जर लहान वयातच मुलांमध्ये रुजवली तर जबाबदार, संवेदनशील, कर्तबगार असा भारताचा नागरिक  तयार होण्यास मदत होईल तसेच स्वातंत्र्य, न्याय ,समता ,बंधुता ही मूल्य लहान वयातच रुजण्यास या उपक्रमामुळे खूप मदत होत आहे व प्रोत्साहन मिळत आहे.

वृक्षसंवर्धन ,प्रदूषण ,पाण्याचा काटकसरीने वापर ,चांगले-वाईट, योग्य सवयी, माझे नियम, सर्वांचा आदर करणे, झाडांची काळजी घेणे ,असे विविध उपक्रम मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकेमध्ये दिलेले आहेत या उपक्रमामुळे पर्यावरण विषयक उपक्रम राबवताना या उपक्रमांचा चांगल्या पद्धतीने उपयोग आम्हाला शाळेमध्ये झाला . यामुळे मुलांमध्ये पर्यावरण विषयक प्रेम ,आवड निर्माण झाली. आज शाळेमध्ये विविध निसर्ग उपयोगी असे झाडे लावण्यात आली आहेत .विद्यार्थी या सर्व झाडांची चांगल्या पद्धतीने काळजी घेतात , तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या घरी ,शेतात देखील ५ ते १५ झाडे लावलेली आहेत. त्यांचे संवर्धन करत आहे .

त्यामुळे मुलांमध्ये पर्यावरणविषयक प्रेम निर्माण झाले आहे. हे सर्व करत असताना मूल्यवर्धन उपक्रमाचा निश्चित फायदा झाला आहे. मुले शालेय परिसर स्वच्छ ठेवतात .शाळेमध्ये अजिबात रा करत नाहीत. या सर्व गोष्टीमुळे एक पर्यावरण पूरक स्वछ  शाळा म्हणून या शाळेकडे पाहिले जाते.

राज्याचे शिक्षण सहसंचालक श्री दिनकर टेमकर साहेब, गटशिक्षणाधिकारी तृप्तीताई कोलते ,प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री शिवाजीराव कराड साहेब, विस्तार अधिकारी श्री अभयकुमार वाव्हळ साहेब , केंद्रप्रमुख श्री संतोष नरवडे सर, बाळासाहेब  दळवी सर , माजी केंद्रप्रमुख देविदास  ससे सर,मूल्यवर्धन विभागाचे सुनील भाकरे सर   यांनी आत्तापर्यंत शाळेला भेटी देऊन शाळेचे मूल्यवर्धन कार्यक्रमाबद्दल  शाळेच्या  विविध उपक्रमाचे कौतुक केले आहे..

 शाळेचे मुख्याध्यापक श्री. तुकाराम अडसूळ सर यांनी मूल्यवर्धन उपक्रमामुळे काय  फायदे झाले या विषयी मत व्यक्त केले आहे.

मुल्यवर्धन कार्यक्रमातील उपक्रमांतून  पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ...

 

आज संपूर्ण जगापुढे पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही फार मोठी समस्या निर्माण झाली आहे .पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्यासाठी अनेक देशात विविध उपाययोजना केल्या जात आहेत .त्याप्रमाणे  आपल्या देशात पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. हवा ,पाणी ,अन्न या आपल्या मूलभूत गरजा आहेत .यामधील एका बाबीचे  जरी प्रदूषण झाले तरी मानवी जीवन व इतर सजीव यांना जीवन जगण्यास बाधा  निर्माण होते .

राज्यातील प्राथमिक शाळेत मागील वर्षांपासून मुल्यवर्धन कार्यक्रम सुरू केलेला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये बालपणी व प्राथमिक शिक्षणात रुजलेली मूल्ये ही कायम टिकणारी असतात.शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार ,संवेदनशील आणि आदर्श नागरिक बानावेत म्हणून संविधानातील मूल्ये व त्या सबंधित कौशल्य विकसित करण्यासाठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मुल्यवर्धन कार्यक्रमातील उपक्रमात नियोजित संधी दिली आहे.देशाच्या गरजा ,प्राधान्यक्रम ,उपलब्ध असणारी साधनसामग्री यानुसार आवश्यक वाटतील असे बदल करून राबविता येणारा लवचिक कार्यक्रम म्हणजे मुल्यवर्धन उपक्रम  आहे.

जीवन जगत असताना समाज व देशहितासाठी आवश्यक असलेले मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी हा मुल्यवर्धन कार्यक्रम प्रेरणादायी ,मार्गदर्शक व उपयुक्त आहे.

 हवा ,पाणी ,अन्न यांचे प्रदूषण थांबण्यासाठी मुल्यवर्धन कार्यक्रमात  विविध प्रकारचे उपयुक्त उपक्रम दिलेले आहेत .ते उपक्रम यशस्वीपणे राबविल्याने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्याचे खूप महत्वाचे मूल्ये रुजले आहेत .या पुस्तिकेत असलेल्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारचे चांगले गुण व मूल्ये रुजून  विद्यार्थी देशाचा आदर्श नागरिक तयार होईल असे नियोजित उपक्रम आहे.

 संवर्धनासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्यासाठी यामध्ये अनेक उपक्रम दिलेले  आहेत .त्यामुळे विद्यार्थ्यांना झाडांचे  महत्त्व समजले  ते वेळोवेळी वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन करतात . पर्यावरण संवर्धन म्हणजे जीवन जगण्यास आपल्या सभोवतालची नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असणे. यामधून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल आत्मीयता निर्माण होऊन ते हवा ,पाणी ,अन्न यांचे प्रदूषण होणार नाही म्हणून विशेष काळजी घेतात .त्यांच्यात योग्य परिवर्तन झाले आहे.आज प्रदूषण वाढत आहे व हे प्रदूषण थांबविण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज निर्माण झाली आहे .म्हणून शिक्षणातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्यासाठी या मुल्यवर्धन  कार्यक्रमात  असलेल्या विविध उपक्रमांचा फार मोठा उपयोग  होत आहे.हवेचे प्रदूषण थांबविण्यासाठी यामध्ये  मी नियम पाळणार ,योग्य की अयोग्य ,चांगल्या वाईट सवयी ,झाडांचे चित्र रंगवा ,निसर्गचित्र रंगवा ,कुटुंबाचे झाड,आपण झाडे कशी वाचवू शकतो ,कॅलेंडर पाहून सणसमारंभ साजरे करणे ,,,,,,,असे अनेक उपक्रम दिलेले आहेत .यामुळे विद्यार्थी प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करतात .

उदा.विद्यार्थी फटाकेमुक्त दिवाळी आनंदाने साजरी करतात.

झाडांमुळे सर्वात महत्वाचे  म्हणजे झाडांमुळे प्राणवायू मिळतो .जगातील सर्व पैसे एकत्र केले तरी प्राणवायूची निर्मिती आपण करू शकत नाही. म्हणून यामध्ये  असलेल्या उपक्रमातून  वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्याचे पर्यावरण संवर्धनाचे  महत्वाचे मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजले आहे.निसर्गाबद्दल आत्मीयता निर्माण झाली आहे.तसेच गावातील ग्रामस्थानाही शाळेच्या वतीने विविध झाडांची अनेक रोपे वाटून त्यांनीही या झाडांची लागवड करून संवर्धन केले आहे म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर गावातील लोकांनाही पर्यावरणप्रेमी बनविले आहे .

 

पाणी प्रदूषण थांबविण्यासाठी यामध्ये विविध उपक्रम  दिलेले आहेत.मी नियम पाळणार ,आपण पाणी कसे वापरायला हवे,आपण पाणी कसे वाचवू शकतो ,पाणी वाचवा जीवन वाचवा ,,,,,अशा अनेक उपक्रमातून पाण्याचा वापर जपून करावा ,दूषित पाणी पिऊ नये ,पाण्याचा गैरवापर करू नये ,पाण्याचे प्रदूषण करू नये ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजली आहेत .

अन्न प्रदूषण थांबविण्यासाठी योग्य की अयोग्य ,चांगल्या वाईट सवयी ,हे असे का होते , स्वयंमुल्यमापन ,मी नियम  पाळणार अशा विविध  उपक्रमातून सकस आहार घेणे,दूषित अन्न खाऊ नये ,तेलकट पदार्थ खाऊ नये ,अन्नामध्ये भेसळ करू नये ,शिल्लक अन्नाची योग्य विल्हेवाट लावणे ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजली आहेत .

प्रदूषण निवारण करण्यासाठी कचऱ्याचा गुणाकार ,विघटणास लागणारा कालावधी , स्वयंमूल्यमापन ,सणसमारंभ ,चांगल्या वाईट सवयी या उपक्रमातून हवा ,अन्न ,पाणी यांचे प्रदूषण करू नये .प्लास्टिक चा वापर टाळणे कारण त्यामुळे मुक्या प्राण्यांच्या  जीवितास  धोका निर्माण  होतो .तसेच प्लास्टिक मुळे मानवी जीवनास धोका निर्माण होत आहे.असे अनेक उपयुक्त मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजले आहेत .यामध्ये  असलेल्या विविध उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व देशहिताचे विविध मूल्ये रुजली आहेत .मूल्ये शिकविली जात नाहीत तर  ती आनंददायी पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये रुजविली आहेत. त्यासाठी हा मुल्यवर्धन कार्यक्रम , उपक्रम प्राथमिक शाळांमधून   खूप गरजेचा आहे.शाळेच्या या परिवर्तनाबद्दल जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे साहेब ,गटशिक्षणाधिकारी तृप्तीताई कोलते ,प्रभारी गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड साहेब ,विस्तार अधिकारी अभयकुमार वाव्हळ साहेब विस्तार अधिकारी अनिल भवार साहेब  ,केंद्रप्रमुख बाळासाहेब दळवी सर  ,मूल्यवर्धनचे सुनील भाकरे सर ,पत्रकार  आणि गावातील पदाधिकारी ,ग्रामस्थ ,पालक यांनी शाळेचे विशेष अभिनंदन केले आहे.

   

      शब्दांकन

   श्री.तुकाराम अडसूळ

  उपक्रमशील शिक्षक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता. पाथर्डी जि.अहमदनगर

मो.7588168948

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

G 20 Summit विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर

G 20 Summit विषयावर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर येथे आमच्या शाळेत राबवित असलेल्या निरंतर वाचन उपक्रम बाबत ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमाचे सादरीकरण संगमनेर DIET प्राचार्य मा.भगवान खारके साहेब, जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय अशोक कडूस साहेब , जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब यांचे समोर सादरीकरण करताना एक आनंदाचा क्षण. G 20 Summit हा उपक्रम भारतासह जगातील 20 देशात राबविला जात आहे, यावर्षी या उपक्रमाचे यजमानपद भारताकडे आहे, दरवर्षी दुसऱ्या देशाकडे असणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. या कार्यशाळेसाठी पुढाकार घेणारे संगमनेर DIET प्राचार्य आदरणीय भगवान खारके साहेब व सर्व डाएट स्टाफ यांना खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏