उपक्रमाचे नाव- व्हिडीओ कॉन्फरन्स
उद्देश -विद्यार्थ्यांना जगाची माहिती होणे
उपक्रम कार्यवाही -जिल्हा परिषद अहमदनगर व ग्लोबल नगरी फाउंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जातो ग्लोबल नगरी व्हिडिओ म्हणून व्हाट्सअप ग्रुप तयार केलेला आहे यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जे जे भूमिपुत्र जगातील विविध देशात कार्यरत आहेत त्यांना एकत्र करण्याचे कार्य इंजिनियर डॉक्टर किशोर गोरे यांनी केले त्याचा फायदा अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांना झाला पाहिजे त्यासाठी या शाळेतील विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ यांचे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून चर्चा करून मार्गदर्शन करणे या ग्रुप मध्ये त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील परदेशातील भूमिपुत्र एकत्र करून त्यांना भारत देशासाठी आपण शैक्षणिक सामाजिक कार्य करण्याचे मार्गदर्शन करून प्रेरणा दिली त्यानुसार हे सर्व प्रदेशातील भूमिपुत्र आणि ज्यांना उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे असे काही कृतिशील शिक्षक यांना व्हाट्सअप व्हाट्सअप चा ग्रुप तयार करून त्यामधून वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्स साठी नियोजन करण्यात आले त्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार ग्लोबल नगरी फाउंडेशन अमेरिका यांना नियोजन करून शाळांना मार्गदर्शक मेंटर उपलब्ध करून दिले म्हणजे एका शाळेला व्हिडिओ कॉन्फरन्स साठी एक परदेशातील अहमदनगर चे भूमिपुत्र उपलब्ध करून दिले त्यात आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीते वाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर शाळेला अहमदनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र कॅनडातील टोरांटो शहरातील रहिवासी गौरांग राग हे उपलब्ध करून दिले यासाठी ग्लोबल नगरी परिवारा मधील अनेकांनी परिश्रम घेतले शनिवार दिनांक 22 2 2020 रोजी हा उपक्रम आमच्या शाळेत राबविण्यात आला ज्यावेळी आपल्या देशात दिवस असतो त्यावेळी तिकडे रात्र असते या व्हिडिओ कॉन्फरन्स साठी दोन दिवस अगोदर ट्रायल घेतली ती यशस्वी झाली शनिवारी सकाळी नऊ वाजता ही कॉन्फरन्स सुरू झाली तेव्हा कॅनडात रात्रीचे अकरा वाजले होते यावेळी आमच्या शाळेत आमच्या बीडचे विस्तार अधिकारी अभय कुमार वावळ केंद्रप्रमुख बाळासाहेब दळवी सरपंच उपसरपंच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ग्रामस्थ व पालक इतर शाळेतील उपक्रमशील शिक्षक विजय अकोलकर मूल्यवर्धन चे सुनील भाकरे व इतर शिक्षक उपस्थित होते सकाळी नऊ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू करण्यात आली यामध्ये शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी चौथी मधील सर्व विद्यार्थी सहभागी झाले विद्यार्थ्यांनी कॅनडा देशातील गौरान शहा यांच्याशी विविध विषयावर चर्चा करून प्रश्न विचारून आनंदाने संवाद साधला सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ यांनी गौरव शहा यांचे स्वागत करून शाळेतील मुलींनी ऑप्शन केले त्यानंतर सर्वांचा परिचय करून दिला त्यानंतर चर्चेत सहभागी होताना प्रत्येक विद्यार्थ्याने विविध प्रकारचे प्रश्न विचारून त्यांच्याशी संवाद साधला यामध्ये काही विद्यार्थ्यांनी त्यांचे बालपण शिक्षण भारतातून कॅनडा देशात झालेला प्रवास त्या देशाचे हवामान जीवनपद्धती व्यवसाय शिक्षण पद्धती शेती पिके फळे जमीन प्राणी प्रदूषण पर्यावरण संवर्धन वैद्यकीय सुविधा सामाजिक जीवन त्या देशाचा विकास त्या देशातील पाण्याची व्यवस्था व्यापार अशा विविध बाबींवर प्रश्न विचारून संवाद साधला हा संवाद नऊ वाजता सुरु झाला तो अकरा वाजेपर्यंत चालला त्यावेळी तेथे रात्रीचे एक वाजले होते तरीही हे कॉन्फरन्स पार पडली शेवटी विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातील साभिनय कविता गायन करून शेवटी शिक्षक नवनाथ आंधळे यांनी सर्वांचे आभार मानले उपक्रमाची निष्पत्ती या व्हिडीओ कॉन्फरन्स उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्स विषयी प्रत्यक्ष अनुभव मिळाला प्रत्यक्ष संवाद साधल यामुळे त्यांना कॅनडा देशातील विविध विषयावर सविस्तर माहिती ज्ञान मिळाले कॅनडा देशातील जीवनपद्धती शिक्षण पद्धती व्यवसाय शेती पर्यावरण प्रदूषण अशा अनेक बाबींची माहिती मिळाली तेव्हा दिवस रात्र कसे होतात म्हणजे एकाच वेळी एका देशात दिवस तर दुसऱ्या देशात रात्र अनुभवायचा आनंद या उपक्रमातून मिळाला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा