मुख्य सामग्रीवर वगळा

शैक्षणिक कार्य

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे .म्हणून शिक्षण क्षेत्रात कार्य करण्यासाठी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहून ते पूर्ण केले. अत्यंत गरीब परिस्थितीत हे शिक्षण पूर्ण केले . दिनांक ३१ डिसेंबर १९९६ रोजी शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीवाडा  येथे शिक्षक म्हणून प्रथम रुजू झालो. या शाळेत शिक्षक म्हणून काम करताना उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करण्याची संधी मिळाली .विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नेहमी मार्गदर्शन केले .या शाळेत वृक्षारोपन करून शालेय परिसर सुशोभित केला.  शैक्षणिक कार्याबद्दल गोपनीय अभिलेखात अतिउत्कृष्ट नोंद झाल्याबद्दल  जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी त्याबद्दल विशेष पत्र पाठवून अभिनंदन केले .  सन २००२ मध्ये नगर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोसपुरी  येथे बदली झाली . ही शाळा पहिलीपासून सातवी पर्यंत आहे. या  शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लोकसहभागातून लाकडी बेंचेस उपलब्ध केले. लोकसहभागातून शाळेला विविध साहित्य मिळविले. या शाळेत  शिष्यवृत्ती परीक्षेसाठी  ज्यादा तास घेऊन विद्यार्थ्यांना नियमितपणे मार्गदर्शन केले. शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचा  शंभर टक्के निकाल लागला. शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल सन २००६ मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी , शिक्षणाधिकारी  यांनी विशेष  विशेष प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले . त्यानंतर १ जून २०१३ नगर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर येथे बदली झाली .या शाळेत शिक्षणाला पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी शाळेत परिवर्तन करणे अत्यंत गरजेचे होते.म्हणून यासाठी स्वतःच्या वेतनातील काही रक्कम खर्च केली. सहकारी शिक्षक आणि गावाच्या लोकसहभागातून शाळेचे परिवर्तन केले. शाळेत प्रचंड प्रमाणात वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन केले .शाळेत कुंडीतील झाडांची लागवड ,लॉन , परसबाग तयार केली .शाळा इमारतीला रंग काम करून त्यावर सुंदर चित्र काम केले. लोकसहभागातून विद्यार्थ्यांसाठी विविध वस्तू मिळविल्या.शाळेत शिक्षणाला पूरक असे निसर्गरम्य व आनंददायी  वातावरण तयार केले. पर्यावरणपूरक शाळा तयार केली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन हे मूल्य कृतिशील उपक्रमांमधून रुजविले .शाळेमध्ये उत्कृष्ट प्रकारचे  स्नेहसंमेलन आयोजित केले. शाळा परिवर्तन झाल्यामुळे शाळेचा विद्यार्थी पट वाढला .शिक्षक संख्या वाढली. गावाला शाळेचा  आणि शाळेला गावाचा अभिमान वाटू लागला. सन २०१८ मध्ये या शाळेला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  ,जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश , जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक ,जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी ,जिल्हा उपवनसंरक्षक  व इतर अनेक  अधिकारी , मान्यवर यांनी शाळेला भेटी देऊन शाळा परिवर्तन बद्दल अभिनंदन केले.  २९ मे २०१८ रोजी रोजी  पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी  या ठिकाणी बदली झाली .या शाळेत शिक्षणाला पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी शाळेत प्रचंड प्रमाणात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन केले. स्वतःच्या  वेतनातून  तसेच  गावाच्या लोकसहभागातून शाळेचे परिवर्तन केले .लोकसहभागातून  स्वच्छतागृहाची  दुरुस्ती केली. लोकसहभागातून शाळा इमारतीला रंगकाम करून चित्र काम केले. लोकसहभागातून विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य मिळविले.शाळेला  एल.ई.डी., लाऊड स्पीकर ,लेझीम , मैदानावर सिमेंट बेंचेस ,विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची मोठी पाईपलाईन ,झाडांना पाणी देण्यासाठी मोटार/ पंप  व इतर विविध साहित्य मिळविले .शाळा सुंदर व आकर्षक दिसू लागली.शाळेत पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा नवोपक्रम राबविला .विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे मूल्य या कृतिशील उपक्रमातून रुजविले. शाळेत निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले. शाळा सुटली तरी विद्यार्थ्यांना घरी जाऊ वाटत नाही अशी एक आदर्श शाळा निर्माण केली  . या शाळेला राज्याचे शिक्षण सहसंचालक  यांनी भेट देऊन शाळेतील विविध उपक्रमांची पाहणी करून विशेष  अभिनंदन केले. शाळा परिवर्तन झाल्यामुळे गावाला शाळेचा आणि शाळेला गावाचा अभिमान वाटू लागला. शाळेत राबविलेल्या पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण निवारण उपक्रमात गावाचा कृतिशील सहभाग घेतल्यामुळे शाळेचा उपक्रम गावाचा उपक्रम झाला. शिक्षणातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा नवोपक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला सादर केला .त्याबद्दल उल्लेखनीय नवोपक्रम म्हणून विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. हैद्राबादच्या येथे झालेल्या  आंतरराष्ट्रीय इंग्रजी शिक्षण परिषदेमध्ये  जगातील विविध देशातील शिक्षकांपुढे इंग्रजी विषयावर सादरीकरण केले. शिक्षण व पर्यावरण या क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विविध प्रकारचे जिल्हा राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कोरोना काळात शाळा बंद असला तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण उत्कृष्टपणे चालू ठेवले .त्यासाठी गुगल मीटर  सर्व विद्यार्थ्यांना नियमितपणे ऑनलाइन अध्यापन केले जाते. तसेच वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या ग्रह भेटी घेऊन त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांसाठी  विविध उपक्रम  ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने यशस्वीपणे राबविले जातात . त्यांना विविध ऑनलाईन स्पर्धेत जिल्हा , राज्य व  आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध ऑनलाईन स्पर्धेत कृतिशील सहभाग घेतल्याबद्दल विविध ऑनलाईन  प्रमाणपत्रे मिळाली आहेत .  शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमामुळे शाळेची विद्यार्थी संख्या वाढली आहे .इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील काही विद्यार्थी आमच्या शाळेत दाखल झाले आहेत . एकच ध्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास  हे ध्येय समोर ठेवून कार्य करीत आहे . उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे तज्ञ मार्गदर्शक म्हणून जून २०२१ मध्ये निवड झाली .तेथे ऑनलाईन पद्धतीने गणित विषयावर कार्य करीत आहे .शासनाच्या शिकू आनंदे या उपक्रमात १० जुलै २०२१ रोजी राज्यातील विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने पर्यावरणावर पाठाचे कृतिशील सादरीकरण केले. तसेच शाळा स्वच्छता कृती आराखडा यामध्ये शासनाने मास्टर ट्रेनर म्हणून  जून २०२१ मध्ये निवड केली .शिक्षण क्षेत्रात अविरतपणे कार्य करताना  सहकारी शिक्षक, ग्रामस्थ ,विविध अधिकारी  व शिक्षक बंधू-भगिनी यांचे अनमोल सहकार्य मिळत आहे .याबद्दल सर्वांचा खूप खूप ऋणी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

G 20 Summit विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर

G 20 Summit विषयावर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर येथे आमच्या शाळेत राबवित असलेल्या निरंतर वाचन उपक्रम बाबत ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमाचे सादरीकरण संगमनेर DIET प्राचार्य मा.भगवान खारके साहेब, जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय अशोक कडूस साहेब , जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब यांचे समोर सादरीकरण करताना एक आनंदाचा क्षण. G 20 Summit हा उपक्रम भारतासह जगातील 20 देशात राबविला जात आहे, यावर्षी या उपक्रमाचे यजमानपद भारताकडे आहे, दरवर्षी दुसऱ्या देशाकडे असणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. या कार्यशाळेसाठी पुढाकार घेणारे संगमनेर DIET प्राचार्य आदरणीय भगवान खारके साहेब व सर्व डाएट स्टाफ यांना खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏