कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय शिक्षण संमेलन उत्साहात संपन्न अहमदनगर- कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात ATM परिवाराचे राष्ट्रीय शिक्षण संमेलन दिनांक २० मे २१ मे रोजी संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे कोल्हापूर या निसर्गरम्य शैक्षणिक संकुलात अतिशय उत्साहात व आनंददायी चैतन्यमय वातावरणात कृतिशील शिक्षक महाराष्ट्र चे राष्ट्रीय संयोजक विक्रमदादा अडसूळ सर ,ज्योती ताई बेलवले यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. संमेलनाचे उद्घाटन पूर्व शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे,पूर्व शिक्षण संचालक दिनकर टेमकर,शिक्षण उपसंचालक डॉ.नेहा बेलसरे, मा.शिक्षणमंत्री यांचे मा.ओ. एस.डी.डॉ.प्राची साठे,प्राचार्य विराट गिरी, मा.कुलगुरू कुलदीपचंद्र अग्निहोत्री, राकेश पटेल, शशांक हजारीका,स्नेहल पांडे ,SCERT मधील योगेश सोनवणे,कृतिशील शिक्षक महाराष्ट्र चे विक्रम आडसूळ,ज्योती बेलवले ,नारायण मंगलारम ,ज्ञानदेव नवसारे व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. संमेलनात डॉ. कुलदीप अग्निहोत्री राकेश पटेल डॉ. नेहा बेलसरे डॉ.प्राची साठे,स्नेहील पांडे, शशांक हजारिका यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धो...
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ