मुख्य सामग्रीवर वगळा

उन्हाळ्यात पक्षांना पाणी पिण्यासाठी मातीची भांडी वाटप उपक्रम

उन्हाळ्यात पक्षांना पाणी पिण्यासाठी मातीची भांडी वाटप उपक्रम

अहमदनगर- उन्हाळ्यात पक्षांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे ,अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष तुकाराम अडसूळ सर , कार्याध्यक्षा छायाताई राजपूत ,अनिल लोखंडे  ,पोपट पवार यांनी  अहमदनगर येथील अनेक नागरिकांना नुकतीच मातीची भांडी  वाटप  केली आहे. या भांडी वाटप कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक महेंद्र (भैय्या) गंधे ,सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी सचिन कंद ,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अहमदनगरचे उपप्रादेशिक  अधिकारी चंद्रकांत शिंदे , अहमदनगरच्या हास्य क्लबच्या अध्यक्षा छायाताई बंडगर  यांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.आपल्याला व इतर सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करणे गरजेचे आहे.पर्यावरण संवर्धनात पक्षी अतिशय महत्वाचे कार्य करतात.उन्हाळ्यात पक्षांसाठी चारा पाणी मिळणे अवघड होते म्हणून  दरवर्षी संपूर्ण राज्यात पक्षांसाठी घोटभर पाणी मुठभर धान्य हे अभियान  राबविले जाते,त्यामुळे पक्षी संवर्धन होत आहे, तसेच जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम वेळोवेळी राबविले जातात .पर्यावरण संवर्धन ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.सर्व सजीवांना चांगले जीवन जगता यावे म्हणून प्रमोद मोरे  ,तुकाराम अडसूळ ,छायाताई रजपूत ,अनिल लोखंडे  ,पोपट पवार आणि त्यांच्या पर्यावरण मंडळातील सर्व सदस्य राज्यात पर्यावरण संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य करीत आहे असे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  बोलताना भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे यांनी सांगितले. आपले सर्वांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून प्रमोद मोरे ,तुकाराम अडसूळ ,छायाताई राजपूत ,अनिल लोखंडे ,पोपट पवार आणि त्यांच्या पर्यावरण मंडळातील सर्व सदस्य राबवित असलेले विविध उपक्रम हे  समाजाला व सर्व सजीवांना  उपयुक्त आहेत असे यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहमदनगरचे उपप्रादेशिक अधिकारी चंद्रकांत शिंदे यांनी सांगितले.पक्षी संवर्धनासाठी हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी संचिन कंद यांनी सांगितले. यावेळी अहमदनगर शहरातील नागरिकांना  पर्यावरण संवर्धन ,प्रदूषण निवारण ,पक्षी संवर्धन याबाबत  प्रमोद मोरे ,तुकाराम अडसूळ ,छायाताई राजपूत ,अनिल लोखंडे , पोपट पवार यांनी सविस्तर  मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये जनजागृती करून पक्षांसाठी मातीची भांडी वाटप केली. मंडळाच्या  .या कार्यक्रमासाठी  वैभव मोरे ,वनश्री मोरे ,शर्मिला कदम ,शांता ठुबे ,पत्रकार आण्णासाहेब साबळे ,अशोक भोसले , मीनाक्षी जाधव ,स्वाती अहिरे ,उत्तम पवार ,अर्जुन खंडागळे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.या उपक्रमासाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे , पर्यावरण मंडळाचे अहमदनगर  जिल्ह्याचे अध्यक्ष तुकाराम अडसूळ सर  ,पर्यावरण मंडळाचे छायाताई रजपूत ,अनिल लोखंडे ,पोपट पवार ,प्रकाश केदारी यांनी परिश्रम घेतले.या सामाजिक उपक्रमाबद्दल समाजातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

नवनीत एज्युकेशन लिमिटेडच्या वतीने सन्मानपत्र

नवनीत एज्युकेशन  लिमिटेड मुंबई ही संस्था महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी व शिक्षकांसाठी नेहमी कार्य करते. विद्यार्थ्यांना  विविध शैक्षणिक बाबतीत ज्ञान मिळावे त्यासाठी  विविध मार्गदर्शक पुस्तिका तयार करते. महाराष्ट्र शासनाने राज्यातील 108 शिक्षकांना राज्य पुरस्कार प्रदान केला. राज्यातील या सर्व पुरस्कार्थी शिक्षकांना नवनीत लिमिटेडच्या वतीने आज सन्मानचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे, आज  आमच्या गीतेवाडी येथे मला नवनीत एज्युकेशन लिमिटेड मुंबईच्या वतीने विशेष सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करताना नवनीतचे प्रतिनिधी मा.औटी साहेब ,गीतेवाडी सरपंच मा.भाऊसाहेब पोटे,उपसरपंच राजेंद्र गीते ,धारवाडीचे सरपंच बापूसाहेब गोरे ,अजिंक्य भारत या वृत्तपत्राचे पत्रकार आंबादास गोरे साहेब ,गीतेवाडी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष महादेव गीते ,नवनीतचे  लिमिटेडचे होळकर साहेब .  आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏

Research Paper Tukaram Co -Presentor Sunil Nagpur 15/11/2024 -Writing Skill

Listening, speaking, reading and writing are very important language skills in a child's life. Among them writing skill is very important. In this research paper I have given priority to English writing skill .My Research paper is Development of writing skill of the students using different tools.My school is in a rural area in a poor locality.My school is from 1st to 4th standard.I presented and wrote this research essay to improve the English writing skills in my class IV students.  .I conducted this research essay because the English writing skills of these poor children were not improved as much as they should have been.For this I practiced by creating many materials like letter cards, word cards, sentences cards, paragraph cards and picture cards. Also for this computer ,LED was used effectively to improve students' writing.So the students' English writing improved.A confidence was created in the minds of the students about writing.