कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय शिक्षण संमेलन उत्साहात संपन्न
अहमदनगर-
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात ATM परिवाराचे राष्ट्रीय शिक्षण संमेलन दिनांक २० मे २१ मे रोजी संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे कोल्हापूर या निसर्गरम्य शैक्षणिक संकुलात अतिशय उत्साहात व आनंददायी चैतन्यमय वातावरणात कृतिशील शिक्षक महाराष्ट्र चे राष्ट्रीय संयोजक विक्रमदादा अडसूळ सर ,ज्योती ताई बेलवले यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
संमेलनाचे उद्घाटन पूर्व शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे,पूर्व शिक्षण संचालक दिनकर टेमकर,शिक्षण उपसंचालक डॉ.नेहा बेलसरे, मा.शिक्षणमंत्री यांचे मा.ओ. एस.डी.डॉ.प्राची साठे,प्राचार्य विराट गिरी, मा.कुलगुरू कुलदीपचंद्र अग्निहोत्री, राकेश पटेल, शशांक हजारीका,स्नेहल पांडे ,SCERT मधील योगेश सोनवणे,कृतिशील शिक्षक महाराष्ट्र चे विक्रम आडसूळ,ज्योती बेलवले ,नारायण मंगलारम ,ज्ञानदेव नवसारे व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. संमेलनात डॉ. कुलदीप अग्निहोत्री राकेश पटेल डॉ. नेहा बेलसरे डॉ.प्राची साठे,स्नेहील पांडे, शशांक हजारिका यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शाळेतील नवीन उपक्रम याविषयी माहिती दिली . यावेळी राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची प्रकट मुलाखत विक्रम आडसूळ आणि ज्योती बेलवले यांनी घेतली.शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या मुलाखतीने राज्यातील शिक्षकांना आणखी नाविन्यपूर्ण कार्य करण्याची प्रेरण व मार्गदर्शन मिळाले. सायंकाळी स्व. कल्पना महाडिक कवी कट्टा संपन्न झाला. यावेळी कोल्हापूर एटीएम टीमने कोल्हापूर दर्शन हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील उपक्रम शिक्षक आणि राबवलेल्या उपक्रमाची सादरीकरण त्याचबरोबर महाराष्ट्रातील उपक्रमशील शाळांची माहिती दिली गेली त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील वि. म.दानोळी नं.२ शाळेचे सादरीकरण विजय भोसले आणि स्वाती भोसले यांनी केले. तसेच आयटी विभाग प्रमुख योगेश सोनवणे यांनी नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली. या राष्ट्रीय संमेलनात अहमदनगर येथील पाथर्डी तालुक्यातील गीतेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी त्यांच्या शाळेत राबवित असलेल्या वाचन उपक्रमाचे उत्कृष्टपणे सादरीकरण केले .निलम सुंबे ,अमोल पेंसलवार ,स्पृहा इंदू ,विनीत पद्मावार ,स्वाती अहिरे ,प्रकाश चव्हाण यांचेसह अनेक शिक्षकांनी आपल्या उपक्रमाचे पोस्टारदरे सादरीकरण केले.संमेलन यशस्वीतेसाठी कृतिशील शिक्षक महाराष्ट्र चे विक्रमदादा अडसूळ सर ,ज्योती ताई बेलवले ,नारायण मंगलारम ,ज्ञानदेव नवसरे ,तुकाराम अडसूळ , संजय जगताप, सुरेखा कुंभार, विजय भोसले ,स्वाती भोसले, बाबासाहेब डोळे, तानाजी पोवार, राहूल भोसले,नीता सूर्यवंशी, पद्मभूषण शेट्टी , उमेश नेवसे, सारिका बद्दे, रोहिणी लोखंडे,संतोष तळेकर , आदींनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा