आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी येथे कोरोनाकाळात ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी उपक्रमात विद्यार्थ्यांच्या घरी आठवड्यातून एकदा पुस्तकांचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन केले,
तसेच
कोरोनानंतर शाळा सुरू झाल्यावर शाळेत आठवड्यातून एकदा शाळेत पुस्तकांचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना वाचनासाठी अनेक पुस्तके दिली जातात,वर्षभरात एक विद्यार्थी किमान ३० ते ४० पुस्तकांचे वाचन करतात,
हा उपक्रम कायमस्वरूपी निरंतर चालू आहे ,याचा परिणाम म्हणून आमच्या शाळेला लोकसहभागातून म्हणजे मिशन आपुलकीतुन ग्रामस्थांनी ,गावाबाहेरील मान्यवरांनी आणि विविध लेखकांनी ,प्रकाशकांनी विद्यार्थ्यांना वाचनासाठी अनेक पुस्तके पाठवली आहे,मिशन आपुलकीतून शाळेचे ग्रंथालय आणि विद्यार्थ्यांचे ज्ञान समृद्ध झाले आहे.
वाचन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वाचनासाठी विवेकानंद प्रकाशन पुणे यांनी पोस्टाने काही पुस्तके पाठवली. पोस्टाचे अधिकारी श्रीमती दरकुंडे मॅडम यांनी दिनांक 4 मे 2023 रोजी फोन करून गीतेवाडीचे पोस्ट ऑफिस चिचोंडी येथे ही पुस्तके दिली.सुट्टीत विद्यार्थ्यांना वाचनासाठी ही पुस्तके दिली जाणार आहेत.
धन्यवाद
🙏
Thanks for all.🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा