अहमदनगर येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी विद्यालयात उन्हाळ्यात पक्षांना पाणी पिण्यासाठी मातीची भांडी वाटप उपक्रम
अहमदनगर- उन्हाळ्यात पक्षांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने पर्यावरण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे , उपक्रमशिल शिक्षक अहमदनगर जिल्ह्याचे पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष तुकाराम अडसूळ सर ,पर्यावरण मंडळाच्या छायाताई रजपूत ,उपक्रमशील शिक्षक पर्यावरण मंडळाचे पोपट पवार सर यांनी अहमदनगर येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी विद्यालय येथे अनेक नागरिकांना नुकतीच मातीची भांडी वाटप केली.यावेळी अहमदनगर येथील ब्रह्माकुमारी विद्यालय प्रमुख राजयोगिनी राजेश्वरी दिदी , निर्मला दिदी ,सीमा दीदी ,सुप्रभा दिदी , साईनाथ भाई ,दादा वाघ यांचेसह विविध नागरिक उपस्थित होते,
आपल्याला व इतर सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करणे गरजेचे आहे.पर्यावरण संवर्धनात पक्षी अतिशय महत्वाचे कार्य करतात.उन्हाळ्यात पक्षांसाठी चारा पाणी मिळणे अवघड होते म्हणून दरवर्षी संपूर्ण राज्यात पक्षांसाठी घोटभर पाणी मुठभर धान्य हे अभियान राबविले जाते असे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष असे प्रमोद मोरे , तुकाराम अडसूळ ,छायाताई रजपूत ,पोपट पवार यांनी सांगितले ,त्यामुळे पक्षी संवर्धन होण्यास मोठी मदत होत आहे, तसेच जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम वेळोवेळी राबविले जातात .पर्यावरण संवर्धन ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.सर्व सजीवांना चांगले जीवन जगता यावे म्हणून प्रमोद मोरे ,तुकाराम अडसूळ ,छायाताई रजपूत ,पोपट पवार आणि त्यांच्या पर्यावरण मंडळातील सर्व सदस्य राज्यात पर्यावरण संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य करीत आहे असे यावेळी अनेकांनी सांगितले. यावेळी नागरिकांना पर्यावरण संवर्धन ,प्रदूषण निवारण ,पक्षी संवर्धन याबाबत प्रमोद मोरे ,तुकाराम अडसूळ ,छायाताई राजपूत , पोपट पवार यांनी सविस्तर मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये जनजागृती करून पक्षांसाठी मातीची भांडी वाटप केली.या उपक्रमासाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे , पर्यावरण मंडळाचे अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष तुकाराम अडसूळ सर ,पर्यावरण मंडळाचे छायाताई रजपूत ,पोपट पवार यांनी परिश्रम घेतले.या पर्यावरण संवर्धन उपक्रमाबद्दल समाजातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा