Search Search... बालशतकाची सुरुवात Published on April 29, 2025 ज्या नूतन बालशिक्षण संघाची मी एक सदस्य आहे तो संघ कै. गिजुभाई यांनी स्थापिला व वाढविला आहे. हा संघ गेली वीस वर्षे बालशिक्षणाचे आपले कार्य मोठ्या श्रद्धेने अविरत करीत आहे. संघाला त्यावेळी कोणाचीहि कसलीहि मदत नव्हती. राष्ट्रीय पुढाऱ्यांचे लक्ष त्याकडे गेले नव्हते. ज्या मुलांच्या शिक्षणाकरिता तो काढण्यांत आला त्यांच्या पालकांनाही त्याचेबद्दल काही आस्था नव्हती. आणि असे असूनहि आम्ही मात्र त्याचे कार्यात दंग झालो होतो. काही झाले तरी मागे फिरायचे नाही अशा नेटाने आम्ही पुढे जात होतो. नियतकालिकें, बाल मंदिर व अध्यापनवर्ग चालविले, परिषदा व पालकांच्या सभा भरविल्या, शहरांतल्या आणि खेड्यांतल्या मुलांच्या शिक्षणासंबंधी निरनिराळे प्रयोग केले व आणखीहि कितीतरी गोष्टी केल्या. हे सर्व करायला आम्हाला कोणी स्फूर्ती दिली, कोणी प्रवृत्त कले असे तुम्हाला वाटते ? ही स्फूर्ती आम्हांला बालकांपासून मिळाली, त्यानेच आम्हाला या कामी प्रवृत्त केले. बालकांचे ते कृतिमय जीवन, जीवनांतील संस्काराच्या प्रतिक्रिया म्हणून झालेल्या त्याच्या स्वयंस्फूर्त हालचाली, त...
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ