मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाचन उपक्रम

📙वाचन उपक्रम 📘 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी ता. पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे दर शनिवारी विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना शाळेत व घरी वाचनासाठी अनेक पुस्तके दिली जातात. काल पुन्हा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचेकडून समग्र शिक्षा अंतर्गत शाळेला प्राप्त झालेली पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून दिली.

माता पालक गट विद्यार्थी अभ्यास

शासनाने निपुण भारत अभियान मध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी  त्यांना अभ्यासबाबत मार्गदर्शन करण्यासाठी माता पालक गटाची स्थापना केली आहे .आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी  येथे माता पालक गट वेळोवेळी विद्यार्थ्यांना अभ्यासबाबत मार्गदर्शन करतात.आज शनिवारी शाळा सुटल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या घरी याबाबत  भेट दिली असता माता पालक गटाच्या गटप्रमुख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या. विद्यार्थी गटाने अभ्यास करत होते.माता पालक गट त्यांचा अभ्यास घेत होते.आपल्या मुलांबरोबर इतर मुलांचा अभ्यास पाहून त्यांना मार्गदर्शन करत होते.खूप समाधान वाटले.आमच्या माता पालकांना खूप खूप धन्यवाद.🙏🙏🙏📘📙

तीस वर्षानी आले पत्र

📘तीस वर्षांनी आले  पत्र📙 मी सन १९९१ ते १९९३ या काळात नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालय करमाळा जिल्हा सोलापूर येथे डी.एड.ला होतो.डी.एड.ला असताना घरी पत्रव्यवहाराचे साधन होते पोस्ट कार्ड.  त्यावेळी मला आई वडिलांकडून खुशाली बाबत पत्र येत असे व त्यांना त्याबाबत पत्राने कळवत असे .तेव्हा  पोस्टकार्ड द्वारे सर्व नातेवाईकांची  खुशाली कळत असे. पत्र आले की अनेकजण जमा व्हायचे  त्यांना पत्रामुळे खुशाली समजत असे. त्यानंतर काळ बदलत गेला. अनेक वेगवान सुविधा निर्माण झाल्या.त्यानुसार गतिमान जगात अनेक गतिमान माध्यमांचा वापर सुरू झाला. पोस्टकार्ड, पत्रलेखन हे दुर्मिळ झाले. आता तर सोशल मिडिया ,तंत्रज्ञान साधने यामुळे एकमेकांची खुशाली पटकन समजते. परंतु जुन्या अनेक बाबी आजही अनुभवात आल्या की त्यांचे महत्व पुन्हा समजते .पुन्हा  जुना काळ आठवतो. आपण सर्वजण आपापल्या क्षेत्रात चांगले कार्य करत आहोत.हे कार्य करताना एकमेकांची प्रेरणा मिळून आपण आणखी कार्य करत राहतो. शेवटी आपल्यामागे आपले कार्य राहते. शाळेत राबवित असलेल्या एका  उपक्रमाबद्दल आज तीस वर्षांनी प...

वाचन उपक्रम पुस्तके भेट

कोरोनापूर्वी , कोरोनाकाळात आणि  कोरोनानंतर आमच्या शाळेत वाचन उपक्रम नेहमी राबविला  जातो.कोरोनाकाळात  नेहमी विद्यार्थ्यांच्या घरी विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरवून त्यांना वाचनासाठी अनेक पुस्तके उपलब्ध करून दिली.शाळेतही आठवड्यातून एकदा  पुस्तकांचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून दिली जातात.विद्यार्थ्यांना दिलेली पुस्तके विद्यार्थी ,त्यांचे भाऊ ,बहीण ,आई ,वडील पुस्तके वाचतात.त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होऊन  घराघरात वाचन संस्कृती रुजली आहे.याबाबत शासनाच्या जीवन शिक्षण मासिकातुन आणि दैनिक सकाळ मुख्य कार्यालय पुणे यांनी सकाळ मधून  या उपक्रमास संपूर्ण राज्यात प्रसिद्धी दिली.हे वृत्त वाचून राज्यातून अनेकांनी फोनवर संपर्क करून अभिनंदन केले. दैनिक सकाळ मधील हा उपक्रम वाचून प्रसिद्ध लेखक/साहित्यिक प्रा.ब.वा.बोधे सर,पुरंदर ,पुणे यांनी त्यांची पुस्तके भेट म्हणून पाठवली.त्यांनी आतापर्यंत ७२ पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांनी पुस्तकासोबत अभिनंदन पत्र पाठवले. आदरणीय प्रा.ब.वा. बोधे सर आणि यासा...