📘तीस वर्षांनी आले पत्र📙
मी सन १९९१ ते १९९३ या काळात नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालय करमाळा जिल्हा सोलापूर येथे डी.एड.ला होतो.डी.एड.ला असताना घरी पत्रव्यवहाराचे साधन होते पोस्ट कार्ड. त्यावेळी मला आई वडिलांकडून खुशाली बाबत पत्र येत असे व त्यांना त्याबाबत पत्राने कळवत असे .तेव्हा पोस्टकार्ड द्वारे सर्व नातेवाईकांची खुशाली कळत असे. पत्र आले की अनेकजण जमा व्हायचे त्यांना पत्रामुळे खुशाली समजत असे.
त्यानंतर काळ बदलत गेला.
अनेक वेगवान सुविधा निर्माण झाल्या.त्यानुसार गतिमान जगात अनेक गतिमान माध्यमांचा वापर सुरू झाला. पोस्टकार्ड, पत्रलेखन हे दुर्मिळ झाले.
आता तर सोशल मिडिया ,तंत्रज्ञान साधने यामुळे एकमेकांची खुशाली पटकन समजते.
परंतु जुन्या अनेक बाबी आजही अनुभवात आल्या की त्यांचे महत्व पुन्हा समजते .पुन्हा जुना काळ आठवतो.
आपण सर्वजण आपापल्या क्षेत्रात चांगले कार्य करत आहोत.हे कार्य करताना एकमेकांची प्रेरणा मिळून आपण आणखी कार्य करत राहतो.
शेवटी आपल्यामागे आपले कार्य राहते.
शाळेत राबवित असलेल्या एका उपक्रमाबद्दल आज तीस वर्षांनी पुन्हा पत्र आले.पत्र आल्याचे समजताच पत्राबाबत निरोप आला म्हणून शेजारच्या गावात पत्र आणायला गेलो.पत्र पाहून जुना तीस वर्षापूर्वीचा काळ आठवला.
पत्र वाचून एक वेगळा आनंद झाला.
हे पत्र लिहिणारे व वाचणारे आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा