कोरोनापूर्वी , कोरोनाकाळात आणि कोरोनानंतर आमच्या शाळेत वाचन उपक्रम नेहमी राबविला जातो.कोरोनाकाळात नेहमी विद्यार्थ्यांच्या घरी विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरवून त्यांना वाचनासाठी अनेक पुस्तके उपलब्ध करून दिली.शाळेतही आठवड्यातून एकदा पुस्तकांचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून दिली जातात.विद्यार्थ्यांना दिलेली पुस्तके विद्यार्थी ,त्यांचे भाऊ ,बहीण ,आई ,वडील पुस्तके वाचतात.त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होऊन घराघरात वाचन संस्कृती रुजली आहे.याबाबत शासनाच्या जीवन शिक्षण मासिकातुन आणि दैनिक सकाळ मुख्य कार्यालय पुणे यांनी सकाळ मधून या उपक्रमास संपूर्ण राज्यात प्रसिद्धी दिली.हे वृत्त वाचून राज्यातून अनेकांनी फोनवर संपर्क करून अभिनंदन केले.
दैनिक सकाळ मधील हा उपक्रम वाचून प्रसिद्ध लेखक/साहित्यिक प्रा.ब.वा.बोधे सर,पुरंदर ,पुणे यांनी त्यांची पुस्तके भेट म्हणून पाठवली.त्यांनी आतापर्यंत ७२ पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांनी पुस्तकासोबत अभिनंदन पत्र पाठवले.
आदरणीय प्रा.ब.वा. बोधे सर आणि यासाठी प्रेरणा देणाऱ्या आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद
🙏📙📘📕📙📘📕📙📘📕
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा