उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी गितेवाडी शाळेत राबविला ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी नवोपक्रम
अहमदनगर -- पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी कोरोनाकाळात ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा नवोपक्रम यशस्वीपणे राबविला आहे. सध्या वाचन संस्कृती कमी होताना दिसते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी ,त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती विकसित व्हावी म्हणून कोरोनाकाळात ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा नवोपक्रम यशस्वीपणे राबवून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण केली. कोरोनाकाळात सर्व विद्यार्थ्यांच्या घरी वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विविध प्रकारच्या अनेक पुस्तकांचे प्रदर्शन भरविले.यामधून विद्यार्थ्यांना वाचनासाठी अनेक पुस्तके उपलब्ध करून दिली.विद्यार्थ्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन केले. वाचलेल्या पुस्तकांचा सारांश सांगितला.एका आठवड्यात विद्यार्थ्यांना दोन पुस्तके देण्यात आली.वर्षभर एका विद्यार्थ्याने किमान तीस ते चाळीस पुस्तकांचे आनंदाने वाचन केले.याबाबत सर्व विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांबरोबर घरातील इतर लोकांनीही या पुस्तकाचे वाचन केले.त्यामुळे विद्...