अहमदनगर - कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात एटीएम परिवार आयोजित शिक्षकांच्या अहदनगर येथील राज्यस्तरीय साहित्यसंमेलनात पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी राज्यातील शिक्षकांना पिपीटीद्वारे कोरोनाकाळातील शिक्षण याविषयी मार्गदर्शन केले.शासनाच्या किशोर मासिकाचे संपादक व साहित्यिक किरण केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली एटीएमचे राज्य संयोजक विक्रम अडसूळ सर यांच्या मार्गदर्शनाखालीअहमदनगर शहरात नंदनवन लॉन येथे राज्यातील कृतिशील शिक्षकांचे साहित्य संमेलन सत्तावीस फेब्रुवारी रोजी पार पडले.या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर ,राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे,शासनाच्या किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे ,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालिका डॉ.नेहा बेलसरे ,उपसंचलिका डॉ.कमलादेवी आवटे, अहदनगर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील ,नागपूरचे शिक्षणाधिकारी अरुण धामणे,बीड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी ,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे कला व सामाजिक शास्त्र विभागाचे उपविभाग प्रमुख सचिन चव्हाण ,कृतिशील शिक्षक महाराष्ट्र चे राज्य संयोजक विक्रम अडसूळ ,ज्योती बेलवले ,नारायण मंगलारम,ज्ञानदेव नवसरे यांचे शुभहस्ते झाले.हे सर्व मान्यवर या साहित्य संमेलनास पूर्ण वेळ उपस्थित होते.या साहित्य संमेलनात परिसंवाद मध्ये विविध विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक गडचिरोली जिल्ह्यातील खुर्शीद शेख , अहमदनगर जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ ,बीड जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक सी.एस.फुटके ,पुणे जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक उमेश नेवसे या चार शिक्षकांची निवड करण्यात आली होती. कोरोनाकाळात शाळा जरी बंद असल्या तरी गितेवाडी शाळेतील उपक्रमशिल शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालू ठेवले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोरोनाकाळात विविध कृतिशील उपक्रम त्यांनी राबविले.त्यामुळे शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण त्यांनी उत्कृष्टपणे चालू ठेवले. यामध्ये गुगलमिटवर ऑनलाईन तास ,विद्यार्थी गृहभेटीद्वारे अध्यापन ,ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी , विविध ऑनलाईन स्पर्धा व उपक्रमात विद्यार्थ्यांचा कृतिशील सहभाग ,पाठ्यपुस्तकातील लेखिका विद्यार्थ्यांच्या भेटीला व त्यांचेसमवेत विद्यार्थ्यांचा ऑनलाईन संवाद व मुलाखत ,किशोर मासिक विद्यार्थ्यांच्या दारी ,किशोर गोष्टी ,ऑनलाईन स्वाध्याय ,गोष्टीचा शनिवार ,शिकू आनंदे, कोरोनाकाळात विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी योग प्राणायाम शिबिर , पर्यावरण पूरक वस्तू निर्मिती व त्यांचे विद्यार्थ्यांच्या घरी प्रदर्शन , वृक्षारोपनसाठी रोपे विद्यार्थ्यांच्या दारी ,बियांपासून घरच्या घरी रोपे तयार करणे ,,,,असे अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविले. कोरोनाकाळातील राबविलेल्या या विविध उपक्रमांचे त्यांनी पिपिटी द्वारे राज्यातील शिक्षकांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले.याबद्दल राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर ,साहित्य संमेलनाचे अध्यक्ष किरण केंद्रे , माजी शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे, उपसंचालिका डॉ.नेहा बेलसरे , उपसंचालिका डॉ.कमलादेवी आवटे ,शिक्षणाधिकारी अरुण धामणे ,शिक्षणाधिकारी भास्कर पाटील ,शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी ,कृतिशील शिक्षक महाराष्ट्र संयोजक विक्रम अडसूळ ,संयोजिका ज्योती बेलवले व राज्यातील शिक्षकांनी उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांचे विशेष अभिनंदन केले.याबद्दल शिक्षक तुकाराम अडसूळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.
*मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन* *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा