अहमदनगर-- विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी ,त्यांच्यात वाचन संस्कृती विकसित व्हावी म्हणून कोरोनाकाळात पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ सर यांनी ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला.सर्व विद्यार्थ्यांच्या घरी वेळोवेळी पुस्तकांचे प्रदर्शन भरविले.विद्यार्थ्यांना वाचनासाठी त्यांच्या आवडीची विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करून दिली.त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होवून त्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन केले.विद्यार्थ्यांबरोबर घरातील सर्वांनी या पुस्तकांचे वाचन केले.त्यामुळे घराघरात वाचन संस्कृती विकसित झाली.या उपक्रमास गाव पातळीवर प्रसिद्धी देवून गावालाही वाचनाचे समजावून दिले. तुकाराम अडसूळ यांनी विद्यार्थ्यांना वाचनासाठी शाळेच्या ग्रंथालयास पुस्तके दान करण्याचे ग्रामस्थांनाआवाहन केले.त्यामुळे गावातील अनेकांनी विद्यार्थ्यांना वाचनासाठी शाळेच्या ग्रंथालयास लोकसहभाग म्हणून पुस्तके दान केली. नगर तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक बाबासाहेब आव्हाड सर यांना गितेवाडी शाळेतील हा उपक्रम समजला. त्यांनी या उपक्रमाचे अभिनंदन करून वीस मार्च रोजी अहदनगर येथे आपल्या कन्येच्या शुभविवाहमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांचे हस्ते गितेवाडी शाळेला विद्यार्थ्यांच्या आवडीची सुमारे शंभर पुस्तके दान केली.या शुभविवाहमध्ये उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी उपस्थित लोकांना वाचनाचे महत्व सांगितले. त्यासाठी शाळेच्या ग्रंथालयास पुस्तके दान करण्याचे आवाहन केले. या उपक्रमाचे शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी विशेष अभिनंदन केले. या उपक्रमामुळे बाबासाहेब आव्हाड यांनी शुभविवाह मध्ये मजलेचिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , जावळेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , गितेवाडी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा या तीन शाळेच्या ग्रंथालयास विद्यार्थ्यांच्या आवडीची विविध प्रकारची पुस्तके लोकसहभाग म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथील सहसंचालक रमाकांत काठमोरे यांचे शुभहस्ते वितरीत केली.देशाचे भवितव्य शाळेत घडत आहे.उद्याचे भावी नागरिक शाळेतून तयार होत आहेत,शाळेतून त्यांच्या जीवनाची जडणघडण होत आहे.म्हणून शाळेत त्यांना या पुस्तकांची वाचनाची सुविधा निर्माण होणार आहे.शाळेतून उद्याचे लेखक ,साहित्यिक ,कवी ,डॉक्टर ,इंजिनियर विविध अधिकारी तयार होणार आहेत .यासाठी त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी या पुस्तकांचा उपयोग होईल .असे उपक्रम सार्वजनिक कार्यक्रमात राबविले गेले पाहिजेत असे अनेकांनी सांगितले.या शुभविवाहास राज्यातील विविध अधिकारी ,राज्यातील विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी ,विविध शिक्षक बंधू भगिनi , विविध गावातील सरपंच ,उपसरपंच ,ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी या उपक्रमाचे अभिनंदन केले.या शुभविवाहमध्ये तुकाराम अडसूळ यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
*मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन* *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा