📕📘तीस वर्षांनी आली मनी ऑर्डर 📙📘
महाराष्ट्र शासन ,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे कडून आज मला चारशे रुपये मनीऑर्डर मिळाली.१९९१ व १९९२ मध्ये डी.एड.ला सोलापूर जिल्ह्यात असताना शिक्षणासाठी मामांकडून काही वेळा मनीऑर्डर यायची .त्यानंतर आज पहिल्यांदा तीस वर्षांनी शासनाकडून मनी ऑर्डर आली.मनी ऑर्डर बद्दल माहीती -
कोरोना काळात विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती विकसित व्हावी म्हणून ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा नवोपक्रम राबविला. वेळोवेळी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी त्यांच्या आवडीच्या पुस्तकांचे प्रदर्शन भरविले.त्यामधून विद्यार्थ्यांना वाचनासाठी विविध पुस्तके उपलब्ध करून दिली. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची अनेक पुस्तके वाचली .यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.वर्षभरात एका विद्यार्थ्याने किमान तीस पुस्तके वाचली.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांबरोबर घरातील सर्वांनी या पुस्तकांचे वाचन केले.त्यामुळे घराघरात वाचन संस्कृती रुजली आहे.
या उपक्रमाबाबत यशोगाथा लेखन करून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेस पाठविली.त्यांनी या उपक्रमाची दखल घेवून संपर्क करून या उपक्रमाची माहिती घेवून अभिनंदन करून जीवन शिक्षण मासिक मध्ये जानेवारी २०२२ च्या अंकात या उपक्रमास प्रसिद्धी दिली.याबद्दल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचेकडून आज चारशे रुपये मनी ऑर्डर मिळाली.ही मनीऑर्डर देताना आमच्या चिचोंडी येथील पोस्ट ऑफिसर दारकुंडे मॅडम.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा